उन्माद हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे.
हा आजार टाळता येण्यासारखा आहे.
************
उन्माद कशामुळे व कसा होतो ? ह्याचे उत्तर संक्षेपात आयुर्वेदात पुढील प्रमाणे आहे.:-
संदर्भ:- अष्टांग हृदय उत्तरस्थान 6/2-5,59-60
*विकृत,अहितकर ,मलिन , न पचणारे , विषम अन्न खाणे, विष युक्त अन्नपान.
त्यामुळे शारीरिक वात, पित्त ,कफ बिघडल्याने
* रज तम गुण वाढवल्यामुळे मन दूषित होतात.
* शरीर व मनाने दुर्बल असलेली व्यक्ती, चिंताग्रस्त ,शोक युक्त असेल, चित्त चंचल असेल तर मन आणखी दुर्बल होते.
*हे शारीरीक व मानसिक दूषित दोष दुर्बल मनाच्या मनुष्याच्या हृदयात जाऊन मग बुद्धीला दूषित करतात.
ह्यामुळे मनाचे कार्य करण्याची पूर्ण प्रणाली नष्ट होते.
* त्यामुळे व्यक्ती ची बुद्धि, विज्ञान,स्मरणशक्ती भ्रमित होते.व त्याला सुख - दुःख ह्यातील भेद कळत नाही व
विनाकारण निरनिराळ्या विचित्र क्रिया करत राहतो.
***************
आयुर्वेद मते उन्माद हा मानसिक आजार आहे.
त्याचे 6प्रकार सांगितले आहेत.
वातपित्त बिघडल्याने होणारे- 4प्रकार
मानसिक दुःखामुळे होणारा -1
विषामुळे होणारा -1
असे 6 प्रकार.
************
असे मानसिक आजार होऊ नये म्हणून:-
1)हितकर,ताजे,पवित्र, पचायला हलके, नियम पूर्वक भोजन करावे.मांस मद्य सेवन करु नये.
2)प्रयत्न पूर्वक पवित्र राहावे. मनाचा सत्व गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.
*****************
Vd Pratibha Bhave Pune
8766740253
No comments:
Post a Comment