मज्जा ( #bone marrow) चे आयुर्वेद शास्त्रानुसार गुण व त्याचा शरीरासाठी उपयोग:-
*************
- आहार,औषध, बस्ती रुपात मज्जा उपयोगी आहे. मज्जा शरीरात कफ, मेद (fat), रस, मज्जा ताकद, बल, वीर्य वाढवतो
- विशेषतः हाडे मजबूत करतो.
- संपुर्ण शरीर स्निग्ध करतो.
***पण मज्जा कुणी खावी ह्याचे नियम आहेत.
विशेषत:
- ज्याला कडकडून भूक लागते.
- जो सतत शारीरिक कष्टाची कामे करतो
- उन्हात काम करणारे ,नेहमीच स्नेहपदार्थ खाणारे
- ज्याला वात रोग आहेत
- तसेच ज्यांना नेहमीच शौचाला कठीण होते, क्रूरकोष्ठी आहेत ह्यांनी मज्जा ह्या प्राणिज पदार्थाचा आहारात समावेश करता येतो.
- #आयुर्वेद मते सर्व स्निग्ध पदार्थ हे प्राणिज व वनस्पति जन्य आहेत .
आयुर्वेदात ह्याचे मुख्यतः 4प्रकार केले आहेत.
1) घृत( ghreet )
2) तेल (oil)
3) वसा (animal fat)
4) मज्जा(bone marrow)
हे सर्व स्निग्ध पदार्थांत हे 4 प्रकार उत्तम आहेत कारण कोणतेही पदार्थ ह्या स्निग्ध पदार्थांमध्ये मिसळले की त्यांचे गुणधर्म ह्या स्निग्ध पदार्थात उतरतात .
संदर्भ- चरक सूत्र 13/13
**ह्या चार स्निग्ध पदार्थांमध्ये घृत सर्वात श्रेष्ठ व त्यामानाने क्रमाने तेल,वसा, मज्जा कमी गुणवान आहेत.
**हे स्निग्ध पदार्थ औषधी स्वरुपात पोटात घेणे,मालिश, नस्य, बस्ति, साठी उपयोगी आहेत.
Vd Pratibha Bhave Pune,8766740253
No comments:
Post a Comment