*गुद मार्गाने निरनिराळी औषधी युक्त तेल, काढा,दूध , दिली जातात. रोग्याचे वय, आजाराचे स्वरुप,ऋतु, इत्यादींचा विचार करुन ती दिली जातात.
*बस्ती बालक, युवा, वृद्ध सर्वांना देता येते.
*निरोगी व्यक्तिला सुद्धा लवकर वृद्धावस्था येऊ नये ह्यासाठी बस्ती चिकित्सा अवश्य करावी.
*बस्ती ही वयाचे स्थापन करते. म्हणजे वय वाढण्याची चिन्हे लवकर दिसत नाही,
जसे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे,
वांग, केश पांढरे होणे, इंद्रिय शक्ती कमी होणे.
*बस्ती मुळे विशेषतः शुक्र वाढते तसेच शरीरातील ताकद वाढते(शुक्रबलप्रदश्च).
शरीराचा वर्ण सुधारतो. चेहऱ्याला टवटवीत पणा येतो.
*बस्ती मुळे शरीरात साठलेले सर्व विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात. सर्व शरीर त्यामुळे शुध्द होते . भूक योग्य प्रकारे लागते.शरीराला हलकेपणा येतो. मल मूत्र प्रवृत्ती योग्य प्रकारे होते.
* झाडाच्या मूळाला योग्य प्रकारे सिंचन केले,पाणी घातले तर त्याला छान कोवळी पालवी येते, योग्य वेळी फुले फळे येतात ,त्याचप्रमाणे योग्य प्रकारे बस्ती घेतल्यास शरीरातील प्रजोत्पादन शक्ती, शरीरातील सर्व अवयावघटक यांचे सर्व क्रिया सुरळीत होतात.
*पावसाळ्यात नक्कीच सर्वांनी बस्ती कर्म करावे.
****************
संदर्भ:- च. चि.1/27-28, च. सि.1/29-31
***************
Vd Pratibha Bhave
BAMS Ayu MD Obstetrics and Gynaecology
8766740253
No comments:
Post a Comment