Sunday, 4 June 2023

रोज डोक्याला तेल का लावावे?


# आयुर्वेद मते -

1) जो मनुष्य रोज डोक्याला तेल लावून डोके थोडे ओलसर ठेवतो त्याचे डोके कधीच दुखत नाही

2) वयाच्या आधी पिकत नाही , गळत नाही तसेच लवकर टक्कल पडत नाही

3) डोक्याची हाडे अधिक मजबूत होतात

4) केस लांब, काळे व मजबूत होतात

5) ज्ञानेंद्रिये शक्तियुक्त, प्रसन्न होतात.

6) त्वचा सुंदर व निर्मळ होते

7) डोक्याला तेलाने #मालीश केल्यास छान झोप येते.


संदर्भ - च.सू.5/81-83

***********

डोक्याला तेल लावण्याच्या चार पद्धती आचार्य वाग्भट यांनी सांगितल्या आहेत -

1) #शिरोभ्यंग - म्हणजे डोक्याला तेलाने मालिश करणे

2) #शिरोधारा - डोक्यावर तेलाची धार सोडणे

3) #शिरोपिचू - कापसाचा बोळा तेलात भिजवून तो डोक्यावर ठेवणे

4) #शिरोबस्ति -  डोक्यावर उंच  टोपी घालून त्यात तेल भरले जाते 

आजारपण ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे ते ठरवले जाते 


Vd. Pratibha Bhave,Pune

पंचकर्म

शरीरात घातक, विषारी पदार्थ साठले की पंचकर्मातील वमन, विरेचन हे कर्म करावे.

# वमन म्हणजे आयुर्वेदिक औषधाने शरीरातील विषारी पदार्थ उलटी करून बाहेर काढणे.

# विरेचन म्हणजे विषारी पदार्थ शौचावाटे बाहेर काढणे.


* आपल्या शरीरात खूप दोष,विषारी पदार्थ साठले आहेत हे लक्षणाने कसे ओळखायचे हे आयुर्वेदात सांगितले आहे.

ही लक्षणे पुढील प्रमाणे –

  • अन्नाचे पचन न होणे, अन्न बेचव वाटणे
  • लठ्ठपणा येणे, त्वचेचा पांढरटपणा,शरीर जड वाटणे, विनाकारण थकवा येणे,थोडे काम केले तरी थकवा वाटणे, दुर्बलता येणे
  • शरीरावर छोट्या छोट्या पुळ्या येणे,चट्टे येणे,खाज येणे, दुर्गंध येणे
  • शरीर व मनात उदासीनता येणे, 
  • मळमळ होणे,उलटी होणे, पित्त कफ पडणे
  • झोप न येणे किंवा खूप झोप येणे, सारखे झोपावे असे वाटणे,
  • नपुंसकत्व 
  • बुध्दी न चालणे,
  • अशुभ स्वप्न पडणे
  • पौष्टिक पदार्थांचे भरपूर सेवन केले तरी शरीरातील ताकद कमी होणे, तेज कमी होणे.


ही सर्व  लक्षणांना आयुर्वेदात  'बहुदोषा ' म्हटले आहे. संदर्भ च. सू.16/16

अशा व्यक्तींना त्याचे बळ व दोष कसे आहेत ह्याचे परीक्षण करून मग वमन विरेचन केले जाते.


Vd Pratibha Bhave,Pune 8766740253

बल, ताकत # रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक


आयुर्वेदात बल वाढवणारे 13 घटक सूत्र रुपात सांगितले आहेत.संदर्भ च. शा.6/13

1) बलवान व्यक्तींच्या देशात जन्म

 (देशाचा -वातावरणाचा परिणाम) जसे पंजाब

2) बलवान व्यक्तींच्या घरात जन्म (माता- पिता प्रमाणे)

3) बलवान काळात जन्म 

     (विसर्ग काळ-वर्षा शरद हेमंत ऋतु  )

4) काळ,ऋतु चे योग्य असणे. समयोग असणे

5) स्त्रीबीज,पुरुषबीज, व गर्भाशय उत्तम गुणाने युक्त असणे. ह्यात कुठलाही आजार नसावा

6) पथ्यकर आहार निरंतर घेणे

7) शरीराचे संपूर्ण अवयव परिपूर्ण असणे

8) पौष्टीक आहार पचवण्यास समर्थ असणे

9) मन सद्गुण युक्त असणे

10) नैसर्गिकपणे  बल निर्माण होणे

11) युवावस्था

12) बल वाढवण्यासाठी व्यायाम,आसन इत्यादी कर्म करणे

13) प्रसन्न असणे. चिंता शोक इत्यादींपासून दूर राहून नेहमी निरंतर प्रसन्न राहणे.


ह्या सर्व घटकांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की बलवान अपत्य जन्माला येण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर शक्य आहे. कोणत्या महिन्यात गर्भधारणा करावी, कधी करावी, आहार कसा घ्यावा, पथ्यकर आहार म्हणजे काय हे भावी पालकाने समजून घ्यावे.

#पंचकर्म #उत्तरबस्ती, आहाराने  शरीर,मन,बीज, #गर्भाशय शुद्धी करुन मगच गर्भधारणा करावी.

Vd Pratibha Bhave Pune

8766740253

Tuesday, 2 May 2023

आरोग्यासाठी

रुग्णांचा  नेहमीचा प्रश्न ,

'कुठलेही आजार होऊ नये म्हणून काय करावे '? 

ह्याचे #आयुर्वेदात आचार्य चरक यांनी अगदी सुटसुटीत संक्षेपात उत्तर दिलेले आहे. 

हे तंतोतंत पाळणे अवघड आहे पण आजारी पडल्यावर जो त्रास होतो त्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून प्रयत्न करायला हवे.

1) कल्याणकारी,हितकर, स्वास्थ्यवर्धक असा आहार, विहार(lifestyle) करावा.

2) परीक्षण करून विचारपूर्वक कार्य करावे .

3) डोळे,कान इत्यादी 11इंद्रियांचा संतुलितपणे उपयोग करावा 

4) यथाशक्ती दान करावे 

5) सर्वांच्याप्रती समान बुद्धी ठेवावी 

6) सत्य बोलावे

7) क्षमावान, सहनशील गुण युक्त असावे 

8) गुरुजन, आप्तजन ह्यांचे अनुसरण करावे 

ह्याचे पालन केले तर मनुष्य आजारी पडत नाही.


**तसेच  शुद्ध बुद्धी, सुखदायक वाणी,सुखदायक आहारविहार, आज्ञाधारकपणा, ज्ञान, तप दृढ संकल्प,योग ह्यासाठी नेहमीच तप्तर असा व्यक्ती नेहमीच निरोगी राहतो.

संदर्भ च. शा.2/46-47

Vd Pratibha Bhave,Pune

उत्तम आरोग्यासाठी

*रोगप्रतिकारशक्ती

*आरोग्य

*आयुष्य

*प्राण

-हे चारही शरीरात असलेल्या  अग्नि वर अवलंबून आहेत  असे #आयुर्वेदाचे मत आहे.

-अग्नि म्हणजे पचनशक्ती. 

-अन्नपान हे पाचन करणाऱ्या अग्निचे इंधन आहे.

-हे इंधन योग्य रुपात मिळाले तर अग्नि उत्तम राहतो. इंधन योग्य नसेल तर अग्नि नष्ट होतो. म्हणून अन्न हे नियम पूर्वक घ्यावे. आपले प्राण अन्नावर अवलंबून आहे.

-अग्नि बिघडला की रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आरोग्य बिघडते. आयुष्य कमी होते. प्राणज्योत नष्ट होते. 

म्हणूनच -

*अन्नाला' ब्रम्ह '

*शरीरातील अग्निला 'यज्ञ' 

*अन्न खाणे,जेवण करणे ह्याला 'यज्ञकर्म 'म्हटले आहे 

***********

'बलमारोग्यमायुश्च प्राणाश्चlग्नौ प्रतिष्टिता: l

अन्नपान इंधनैश्चlग्निर्ज्वलति व्येति चान्यथा ll 342ll '

च. सू.27


Vd Pratibha Bhave,Pune

मद्याचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी (Healthy Juice to treat bad effects of #Alcohol)

मन्थ : खर्जूरमृद्वीकावृक्षाम्लाम्लीकदाडिमैं : l

परुषकै: सामलकैर्युक्तो मद्यविकारनूत् ll

संदर्भ- च. सूत्रस्थान 23/38

*सतत , अधिक प्रमाणात , नियम न पाळता  मद्य पिल्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजार होतात. *अन्नाचे पचन बिघडते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, शरीराची कांती प्रभा नष्ट होते,शुक्र कमी होते,अंगावरील मांस कमी होऊ लागते, ताकद कमी होते, ओजक्षय होतो.उन्माद,प्रलाप, व्यर्थ बडबड करणे, अंगदुखी, छाती,पोट दुखणे, अंगावर सूज येणे,पोट फुगणे, मलमुत्र प्रवृत्ति का अडथळा येणे सांधेदुखी, हाडे दुखणे,वाताचे आजार अशा अनेक तक्रारी सूरू होतात.

*मद्याचा शरीरावर होणारा दुष्परिणाम दूर करण्यासाठी खजूर, मनुका, कोकम, चिंच,डाळिंब ,फालसा व आवळा ह्यापासून बनवलेला मंथ प्यावा असे #आयुर्वेदात सांगितले आहे.

**#मंथ म्हणजे सरबत /मिक्स फ्रूट ज्यूस म्हणता येईल.

***************.

कृती -

-ही सर्व फळे प्रत्येकी 5gm घ्यावी. 

-त्याच्या 14पट माठातील पाणी, म्हणजे साधारणपणे 500ml पाणी 

- खजूर,मनुका,  कोकम,  चिंच , फालसा, आवळा,डाळिंब दाणे सुकलेल हे सर्व अर्धा तास पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर कुस्करून बिया काढून घ्याव्या. मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. त्यात पाणी मिसळून पुन्हा मिक्सर मध्ये फिरवावे. छान गुलाबी लाल रंग आला की गाळून प्यावे.

- हा मंथ अतिशय पौष्टिक, ओज, बल कांती, मांस, रक्त वाढवणारा. तात्काळ वातपित्त कमी करणारा आहे. पचन सुधारते, मलमुत्र प्रवृत्ती योग्य प्रकारे होते. तात्काळ तरतरी येते. उन्हाळ्यात तर प्यायलाच हवा.

Vd. Pratibha Bhave,Pune

8766740253

आजारपण शरीराचे व मनाचे

-#आयुर्वेदानुसार  मनुष्यात कधी शरीराला तर कधी मनाला आजार होतात.

  •  वात, पित्त, कफ ह्यांचे संतुलन बिघडले की शरीराला आजार होतात. जसे सर्दी,खोकला, मलब्धता , उलटी,इत्यादी 
  • मनात रज व तम वाढल्यावर  मनाला आजार होतात. जसे उन्माद,अपस्मार,उदासीनता, इत्यादी 
  •  शारीरिक आजार मनाला दुःख देतात व मानसिक आजार सुद्धा शरीरावर परिणाम करतात. 
  • शारीरिक आजारासाठी वात पित्त कफ संतुलित करण्यासाठी उपाय केल्या जाते. मानसिक आजारात सत्व गुण वाढवण्याकरता उपाय केल्या जातात.
  • पंचकर्म उपचार हे शारीरिक व मानसिक दोन्ही आजारासाठी उपयुक्त आहेत. पंचकर्म केल्याने शरीर शुद्धी होते त्याचबरोबर #मानसिक शुद्धी होते.
  • - रोगाचे स्वरूप,,रोगाचे कारण, रोग्याचे बल,ऋतू, अशा अनेक कारणांचा विचार करून पंचकर्म,औषधे, पथ्यापथ्य, आहार,विहार,दिनचर्या ठरवली जाते.


Vd Pratibha Bhave,Pune

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...