शरीरात घातक, विषारी पदार्थ साठले की पंचकर्मातील वमन, विरेचन हे कर्म करावे.
# वमन म्हणजे आयुर्वेदिक औषधाने शरीरातील विषारी पदार्थ उलटी करून बाहेर काढणे.
# विरेचन म्हणजे विषारी पदार्थ शौचावाटे बाहेर काढणे.
* आपल्या शरीरात खूप दोष,विषारी पदार्थ साठले आहेत हे लक्षणाने कसे ओळखायचे हे आयुर्वेदात सांगितले आहे.
ही लक्षणे पुढील प्रमाणे –
- अन्नाचे पचन न होणे, अन्न बेचव वाटणे
- लठ्ठपणा येणे, त्वचेचा पांढरटपणा,शरीर जड वाटणे, विनाकारण थकवा येणे,थोडे काम केले तरी थकवा वाटणे, दुर्बलता येणे
- शरीरावर छोट्या छोट्या पुळ्या येणे,चट्टे येणे,खाज येणे, दुर्गंध येणे
- शरीर व मनात उदासीनता येणे,
- मळमळ होणे,उलटी होणे, पित्त कफ पडणे
- झोप न येणे किंवा खूप झोप येणे, सारखे झोपावे असे वाटणे,
- नपुंसकत्व
- बुध्दी न चालणे,
- अशुभ स्वप्न पडणे
- पौष्टिक पदार्थांचे भरपूर सेवन केले तरी शरीरातील ताकद कमी होणे, तेज कमी होणे.
ही सर्व लक्षणांना आयुर्वेदात 'बहुदोषा ' म्हटले आहे. संदर्भ च. सू.16/16
अशा व्यक्तींना त्याचे बळ व दोष कसे आहेत ह्याचे परीक्षण करून मग वमन विरेचन केले जाते.
Vd Pratibha Bhave,Pune 8766740253
No comments:
Post a Comment