Tuesday, 10 August 2021

त्रिभुवन किर्ती

ताप सर्दी साठी मेडीकल मध्ये जाऊन मनानेच इंग्रजी गोळ्या घेता का? मग त्याऐवजी त्रिभुवन किर्ती ही आयुर्वेदिक 1गोळी दिवसातून 3वेळा, 1चमचा आल्याचा रस व 1चमचा मधातून तीन दिवस घ्या. 

ताप असेल, अधिक प्रमाणात शिंका येत असतिल, हात, पाय, पाठ दुखत असतिल, चालले असता दुखणे वाढत असेल, थंडी वाटत असेल, गरम पदार्थ खावेसे वाटत असतिल, तोंडाची चव गेली असेल, कोरडा खोकला येत असेल, घसा दुखत असेल, पाणी पितांना सुद्धा त्रास होत असेल अशा वेळी त्रिभुवन किर्ती खूपच उपयोगी आहे.

कृत्रिम केमिकल्स शरीरात जाणार नाही ह्याची काळजी आपण स्वत:च घेतली पाहिजे. 


टीप - त्रिभुवन किर्ती लहान मुलांना देऊ नये. 


Vd Pratibha Bhave

Acidity

अॅसिडीटी झाली तर तुम्ही मेडीकल मध्ये जाऊन मनानेच इंग्रजी औषध घेता का?

 मग आयुर्वेदातील लघुसूतशेखर ची 1गोळी दिवसातून 3वेळा घ्या. 

*छातीत जळजळ, अर्धे डोके दुखणे, अर्ध शिशी, तोंडाला वारंवार फोड येत असतिल,वारंवार शौचास जावे लागणे ह्यापैकी कोणत्याही तक्रारींसाठी लघुसूतशेखर फारच उपयोगी आहे. 

*आंबवलेले, तिखट, शिळे पदार्थ, जसे ब्रेड, कढी, वडापाव, मिसळ, मांसाहार इत्यादी खाल्ल्यावर अॅसिडीटी होत असेल तर लघू सूतशेखर च्या गोळी ने आराम पडतो. कोणतेही केमिकल्स त्यात नाही त्यामुळे अतिशय निर्धोक असे औषध आहे. 

**टीप-कृत्रिम विषारी औषधे जेवढे टाळता येईल तेवढे टाळणे हे खूप महत्वाचे आहे. ******


Vd. Pratibha Bhave 

8766740253

पावसाळ्यात वारंवार द्रवमलप्रवृत्ती (loose motions). आयुर्वेदिक औषध

पावसाळ्यात पातळ शौचाला दिवसातून 5ते 6 वेळ होत असेल, पोट दुखत असेल, व आरोग्य तज्ञाकडून तपासणी न करता मेडीकल मधून  इंग्रजी औषध घेण्याची सवय असेल  तर ते न घेता आयुर्वेदिक सल्ला घ्या. 

1) संजीवनी वटी ही गोळी 2 ह्या प्रमाणात दिवसातून 6वेळा घ्या. असे तीन दिवस घ्यावी.

2) तसेच त्यासोबत

2 चिमूट शुंठी   2चिमूट ओवा व 2चिमूट सैंधव मीठ(rock salt) 1ग्लास पाण्यात टाकून कोमट करुन दिवसातून 3 वेळा प्यावे

3) उकळून गार केलेल्या पाण्यात मीठ साखर घालून लिंबू सरबत बनवून प्यावे.

4) उकळून गार केलेले पाणी प्यावे.

5) भूक लागली तर साळीच्या, राजगिऱ्या च्या लाह्या खाव्या. 

 ताजे  पातळ वरण व नरम भात खावा. 

6) 8ते 12 वर्षे वय असल्यास 1गोळी दिवसातून 6वेळा असे द्यावी

7) 5 ते 7वर्षे वय असेल तर अर्धी गोळी दिवसातून 6 वेळा हे प्रमाण योग्य आहे.

8) साधारणपणे तीन डोझ गेल्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी होते. तसे न होता प्रमाण वाढले तर लगेच आरोग्य तज्ञाकडून तपासणी करुन घ्यावी

9) ह्या आजारात शरीरातील साखर मीठ पाणी झपाटय़ाने कमी होऊन जीव सुद्धा जायची शक्यता असते. त्यामुळे हे प्रमाण संतुलित राखणे  आवश्यक आहे. 

**महत्त्वाचे हे की Antibiotics न घेता सुद्धा तूम्ही बरे होऊ शकता.  मेडीकल मधुन विषारी औषध घेण्यापेक्षा अशा आजारात आयुर्वेद तज्ञांकडून उपचार करा. 


Vd. Pratibha Bhave 

8766740253 Pune

खर्जुरादी वटी -

रक्तस्राव, खाॅंसी, प्यास मे, करोना के बाद आने वाली कमजोरी मे गुणकारी

**********

  1. खारिक (छुहारा) 40gm
  2. मुनक्का 40
  3. जेष्ठमध 40gm
  4. खडीसाखर 40gm
  5. पिंपळी 20gm
  6. दालचिनी 20gm
  7. छोटी इलायची 20gm
  8. तेजपान 20gm

मुनक्का छोडकर सभी औषधीयॉं मिक्सर मे बारीक कर ले. छान ले. औषधी चुर्ण को मुनक्का के साथ मिलाकर मिक्सर मे बारीक कर ले. 

इस चुर्ण को प्लेट मे निकाल ले. इसमे थोडा  शहद मिलाकर मसूर दाने के आकार की छोटी गोली बना ले. सुखने के बाद काच की बरणी मे रख दे. Ref (बृ. नि. र.) 

मात्रा -1गोली दिनरात भर मे 6बार  मुंह मे रखकर चूसें

उपयोग - इससे प्यास,मूख सूकना,गर्मी, जलन, पित्त बढना, रक्तनिकलना, खाॅंसी,इसमे राहत मिलती हैl

-करोना होने के बाद शरीर मे बढी हुयी गर्मी को कम करने मे और शक्ती बढानेके लिए लाभदायक हैl

-स्रियोंमे रक्तप्रदर लाभदायक हैl

-बच्चे से बुढे तक को दे सकते हैl


Vd Pratibha Bhave 

BAMS MD

औषधी वनस्पती 'पुनर्नवा/खापरखुटी'.

1) पुनर्नवा ही पावसाळ्यात येत असल्याने वर्षाभू सुद्धा म्हणतात.  महाराष्ट्रात हिला घेंटुळी, खेडा भाजी सुद्धा म्हणतात. 

2) लाल व श्वेत असे दोन प्रकार असतात. लाल पुनर्नवा चे देठ फुले लाल असतात तर श्वेत पुनर्नवा चे देठ फुले पांढऱ्या रंगाची असतात. श्वेत पुनर्नवा उष्ण व रक्त पुनर्नवा शीत गुणाची आहे. 

3) ही औषधी शरीरात साठलेले अनावश्यक मलिन पदार्थ मलप्रवृत्ती, मुत्र प्रवृत्ती व घाम ह्या मार्गाने बाहेर काढते. 

4) तारुण्य टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे. शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढून रस, रक्त इत्यादी वाहिन्यांचा मार्ग मोकळा करते.  

4) हृदय, मुत्राशय(urinary bladder) , यकृत (liver),ग्रहणी(duodenum, jejunum , ileum), प्लिहा (spleen) शिर(brain), सिरा धमन्या (veins, arteries, neurons ), स्नायु (muscles, ligaments) इत्यादी अवयवांची शुद्धी करते. शरीरात साठलेले अतिरिक्त पाणी व चिकटपणा काढून टाकते. 

5) ही औषधी  वैद्यांच्या सल्ल्यानुसार रसायन पद्धतीने घेतली तर मधुमेह,सूज येणे,हृदय रोग, किडनी, मुत्राशयाचे आजार, पोटात वायु साठणे, दमा, इत्यादी आजार होत नाही. 

टीप : ह्या वनस्पती ची भाजी तुम्ही नक्कीच करत असाल. कशी करता ते  नक्की कळवा. 

संदर्भ - वैद्य गो. आ. फडके 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD

 (Prasutitantra Streeroga)

PCOD/PCOS असणाऱ्यांनी पाळावयाचे आहाराचे नियम

PCOD, obesity, Diabetes ह्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांनी रोज च्या आहारात बार्ली  (यव/सत्तू) चा समावेश करावा. ह्याच्या पीठाचे पातळ सूप प्यावे. तसेच ज्वारीच्या पीठात मध्ये मिसळून भाकरी करुन खाव्या. तांदुळ, गहू, मैदा,साखर आहारात घेऊ नये.  तेल व मीठाचे प्रमाण जेवढे कमी करता येईल तेवढे बघावे. रोज एक तास उपाशीपोटी चालावे.

Vd Pratibha Bhave

BAMS MD Prasutitantra Streeroga

चातुर्मासाच्या निमित्ताने : 'आपले आरोग्य आपल्याच हातात आहे'

1) आजपासून चातुर्मासाला सुरवात झाली आहे. आषाढ शुद्ध एकदशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे चार महिने-श्रावण,भाद्रपद, आश्विन व कार्तिक. 

2) आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने हे चार महिने विशेष महत्वाचे आहेत. 

3) ह्या महिन्यांत ऋतुचा परिणाम म्हणून शरीराची रोगप्रतिकारशक्ति, पाचन शक्ति कमी होते.

4) ढगाळ वातावरण व पाऊस ह्यामुळे जल व अन्न सुद्धा दूषित होते.

5) माशा, डास,किटक, साप, विंचू आदींचा प्रादुर्भाव वाढतो.

 6) वैदीक काळापासून चातुर्मासात उपवास, व्रत, यज्ञ, होम, हवन  केली जातात.

7) उपवास, व्रत ह्यामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते. तसेच यज्ञ, होम, हवन, ह्यामुळे  वातावरणाची शुद्धी होते.  

8) आयुर्वेदानुसार ह्या चार महिन्यांत वर्षा  व शरद ऋतुचर्येचे पालन करावे. 

9) वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाऋतुमध्ये बस्ति व शरद ऋतुत विरेचन हे उपचार करुन घ्यावे. 


Vd. Pratibha Bhave 

BAMS, MD

( Prasutitantra Streeroga)

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...