पावसाळ्यात पातळ शौचाला दिवसातून 5ते 6 वेळ होत असेल, पोट दुखत असेल, व आरोग्य तज्ञाकडून तपासणी न करता मेडीकल मधून इंग्रजी औषध घेण्याची सवय असेल तर ते न घेता आयुर्वेदिक सल्ला घ्या.
1) संजीवनी वटी ही गोळी 2 ह्या प्रमाणात दिवसातून 6वेळा घ्या. असे तीन दिवस घ्यावी.
2) तसेच त्यासोबत
2 चिमूट शुंठी 2चिमूट ओवा व 2चिमूट सैंधव मीठ(rock salt) 1ग्लास पाण्यात टाकून कोमट करुन दिवसातून 3 वेळा प्यावे
3) उकळून गार केलेल्या पाण्यात मीठ साखर घालून लिंबू सरबत बनवून प्यावे.
4) उकळून गार केलेले पाणी प्यावे.
5) भूक लागली तर साळीच्या, राजगिऱ्या च्या लाह्या खाव्या.
ताजे पातळ वरण व नरम भात खावा.
6) 8ते 12 वर्षे वय असल्यास 1गोळी दिवसातून 6वेळा असे द्यावी
7) 5 ते 7वर्षे वय असेल तर अर्धी गोळी दिवसातून 6 वेळा हे प्रमाण योग्य आहे.
8) साधारणपणे तीन डोझ गेल्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी होते. तसे न होता प्रमाण वाढले तर लगेच आरोग्य तज्ञाकडून तपासणी करुन घ्यावी
9) ह्या आजारात शरीरातील साखर मीठ पाणी झपाटय़ाने कमी होऊन जीव सुद्धा जायची शक्यता असते. त्यामुळे हे प्रमाण संतुलित राखणे आवश्यक आहे.
**महत्त्वाचे हे की Antibiotics न घेता सुद्धा तूम्ही बरे होऊ शकता. मेडीकल मधुन विषारी औषध घेण्यापेक्षा अशा आजारात आयुर्वेद तज्ञांकडून उपचार करा.
Vd. Pratibha Bhave
8766740253 Pune
No comments:
Post a Comment