Tuesday, 10 August 2021

औषधी वनस्पती 'पुनर्नवा/खापरखुटी'.

1) पुनर्नवा ही पावसाळ्यात येत असल्याने वर्षाभू सुद्धा म्हणतात.  महाराष्ट्रात हिला घेंटुळी, खेडा भाजी सुद्धा म्हणतात. 

2) लाल व श्वेत असे दोन प्रकार असतात. लाल पुनर्नवा चे देठ फुले लाल असतात तर श्वेत पुनर्नवा चे देठ फुले पांढऱ्या रंगाची असतात. श्वेत पुनर्नवा उष्ण व रक्त पुनर्नवा शीत गुणाची आहे. 

3) ही औषधी शरीरात साठलेले अनावश्यक मलिन पदार्थ मलप्रवृत्ती, मुत्र प्रवृत्ती व घाम ह्या मार्गाने बाहेर काढते. 

4) तारुण्य टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे. शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढून रस, रक्त इत्यादी वाहिन्यांचा मार्ग मोकळा करते.  

4) हृदय, मुत्राशय(urinary bladder) , यकृत (liver),ग्रहणी(duodenum, jejunum , ileum), प्लिहा (spleen) शिर(brain), सिरा धमन्या (veins, arteries, neurons ), स्नायु (muscles, ligaments) इत्यादी अवयवांची शुद्धी करते. शरीरात साठलेले अतिरिक्त पाणी व चिकटपणा काढून टाकते. 

5) ही औषधी  वैद्यांच्या सल्ल्यानुसार रसायन पद्धतीने घेतली तर मधुमेह,सूज येणे,हृदय रोग, किडनी, मुत्राशयाचे आजार, पोटात वायु साठणे, दमा, इत्यादी आजार होत नाही. 

टीप : ह्या वनस्पती ची भाजी तुम्ही नक्कीच करत असाल. कशी करता ते  नक्की कळवा. 

संदर्भ - वैद्य गो. आ. फडके 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD

 (Prasutitantra Streeroga)

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...