Tuesday, 10 August 2021

चातुर्मासाच्या निमित्ताने : 'आपले आरोग्य आपल्याच हातात आहे'

1) आजपासून चातुर्मासाला सुरवात झाली आहे. आषाढ शुद्ध एकदशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे चार महिने-श्रावण,भाद्रपद, आश्विन व कार्तिक. 

2) आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने हे चार महिने विशेष महत्वाचे आहेत. 

3) ह्या महिन्यांत ऋतुचा परिणाम म्हणून शरीराची रोगप्रतिकारशक्ति, पाचन शक्ति कमी होते.

4) ढगाळ वातावरण व पाऊस ह्यामुळे जल व अन्न सुद्धा दूषित होते.

5) माशा, डास,किटक, साप, विंचू आदींचा प्रादुर्भाव वाढतो.

 6) वैदीक काळापासून चातुर्मासात उपवास, व्रत, यज्ञ, होम, हवन  केली जातात.

7) उपवास, व्रत ह्यामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते. तसेच यज्ञ, होम, हवन, ह्यामुळे  वातावरणाची शुद्धी होते.  

8) आयुर्वेदानुसार ह्या चार महिन्यांत वर्षा  व शरद ऋतुचर्येचे पालन करावे. 

9) वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाऋतुमध्ये बस्ति व शरद ऋतुत विरेचन हे उपचार करुन घ्यावे. 


Vd. Pratibha Bhave 

BAMS, MD

( Prasutitantra Streeroga)

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...