Thursday, 17 January 2019

“सूरण”

मुळव्याधीवरिल सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषध

1) सूरण हे गुणाने उष्ण , भुक वाढवणारे व अन्नाचे पाचन करणारे आहे
2) पाचनशक्ति कमजोर होऊन अन्नमार्गातिल रस रक्तवाहिन्यांच्या मार्गाला अवरोध झाल्यास अर्श/मुळव्याध हा आजार होतो.सूरणाने अन्नाचे पचन व्यवस्थित पार पडते,तसेच रसरक्तवाहिन्यांचे विस्तार होऊन मार्ग मोकळा होतो.
3) बद्धकोष्ठता साठी उपयुक्त आहे
4) यकृत प्लिहा वृद्धी(enlarged liver/spleen) मध्ये सूरण फार उपयोगी आहे
5) सर्दी,खोकला,दमा,सुज येणे ह्या आजारात सूरणाची भाजी खावी
6) डायबिटीस ,ग्रहणी(IBS),भगंदर(fistula)मध्ये उपयोग होतो
7) मासिक पाळी उशीरा उशीरा येत असल्यास;  नियमीत येण्यासाठी सूरणाची भाजी आठवड्यात दोनवेळा घ्यावी
8) अकाली केस पांढरे होण्याची तक्रारींसाठी सूरण वटक ह्या आयुर्वेदिक औषधाचा उपयोग केला जातो

****सूरण उष्ण गुणात्मक असल्यामुळे पित्ताची तक्रारी असणाऱ्यांनी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे.********

Saturday, 8 December 2018

Retroverted Uterus and it's Ayurvedic Correlation

Retroverted uterus  and it's Ayurvedic correlation:-

Rretroverted  Uterus may correlate with Antarmukhi Yonivyapad

According to conventional science(modern science) retroverted  uterus occurs by two ways
1-Congenital-
 retroversion of the uterus is the normal uterine position for about 20% percent of women
2-Acquired –
There are a few causes of this condition in women who did not have previously retroverted uterus and it occurs due to the  following causes:-
• Weakening pelvic ligaments associated with menopause
• Enlargement of the uterus, either as the result of pregnancy or tumour
•  pelvic adhesions can also keep the uterus retroverted position, may be caused by endometriosis ,pelvic inflammatory disease or pelvic surgery. 

CAUSE OF ANTARMUKHI YONIVYAPAD ACCORDING TO ACHARYA CHARAK

1-If a woman having a heavy,full meal and after it she enters into sexual intercourse  then Vata located in the reproductive system/organ gets suppressed by food. 
2-This aggravated Vata causes distortion of Yonimukh(Cervix) .Due to this change occurred in cervx she suffers from pain in the bones and muscles.
3- Due to sever pain coital act becomes intolerable for her. This disease of Yoni(Uterus and Cervix) is called ANTARMUKHI YONIVYAPAD. च.चि.30/29-31

गर्भिणी साठी “आवळापाक”

गर्भिणी साठी “आवळापाक”

1) आवळे स्वच्छ धुऊन त्याचा रस 1 लिटर घेऊन मंद आचेवर शिजवून 125 मिली होईल एवढे आटवावे
2) बीजरहित मनुका 200 ग्रॅम घेऊन बारीक कराव्या व आवळ्याच्या आटवलेल्या रसात टाकून मिसळून घ्याव्या.
3) पिंपळी 200 ग्रॅम, जेष्ठमध 25 ग्रॅम, वंशलोचन 25 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम, ह्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून आवळ्याच्या आटवलेल्या रसात टाकावे.
4) खडीसाखर 750 ग्रॅम घेऊन दोन तारी पाक करावा व त्यात वरील औषधी युक्त आवळ्याचा रस ओतावा.
5) दोन तारी पाक झाल्यावर थंड होऊ द्यावे
6) थंड झाल्यावर त्यात 250मिली एवढे शुद्ध मध मिसळून घ्यावे.
7) काचेच्या बरणीत भरून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
9) गर्भिणी अवस्थेत 5मिली एवढे रोज द्यावे
10) हे आवळापाक  गर्भिणी त होणारी वांती, अम्लपित्त, मलबद्धता, अजीर्ण,  तोंडाला पाणी सुटणे, फार तहान लागणे, छातीत धडधड होणे, रक्ताची कमतरता ह्यासाठी उपयोगी आहे

Monday, 26 November 2018

PATRANGA (पत्रांग)

PATRANGA (पत्रांग)
AYURVEDIC MEDICINAL PLANT

The most useful  for Ladies:-
It’s dried wood chips are useful for medicinal purposes.
 **Every women should take it orally at least for 2months in a year regularly to prevent uterus related diseases.

Characteristics of PATRANGA:-
1) Strong antioxidant
2) Antiviral, against Herpis simplex l,Hipatitis B
3) It is potentially  nontoxic radioprotective
4) Anti-inflammatory
5) Antitumour
6) The medicine ” PATRANGASAVA” is useful in the treatment of non-specific leucorrhoea
7) If someone is suffering from leucorrhoea after IUD(intrauterine contraceptive device like Cu-T) Patrangasava gives very good relief.
8) It is very much advisable in  stopping of bleeding after IUD insertion.
9) It has very strong healing capacity and therefore it is also useful in chronic cervical erosion.
10) It improve menstrual flow and reduces inflammation therefore it is useful in menstrual disorders, dysmenorrhoea, leucorrhoea.
11) Patrangasav is useful in uterine fibroids.
12) It is very effective in Women having tendency of habitual abortion due to  infections. It should be taken 3months before pregnacy with CHANDRAPRABHAVATI.
****As it causes abortion ,it should not be taken during pregnancy.*********
13) As it  also improves blood quality and RBCs , useful in anemia.
14) It  improves complexion .
15) The wood chips contents colouring capacity, therefore it is very good to colour hairs with out side effects.
16) As it has  blood-vitalizing activity it's wood chips decoction is used in the treatment of toxic side effects  from radiation and chemotherapy.

*****Medicine should be taken under  ayurvedic doctor's supervision******

आरोग्यासाठी शतावरी घृत

आरोग्यासाठी शतावरी घृत

1) हे औषधी तूप मेधाकर असल्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
2) शुक्राणू कमकुवत असलेल्या रुग्णांना हे औषध खडीसाखर, पिंपळी व मधातून दिल्यास फायदा होतो.
3)मासिक पाळी च्या तक्रारीं साठी स्त्रियांनी रोज आहारात ह्या घृताचा समावेश करावा.
4) विशेषतः वारंवार मुत्रसंसर्ग , मुतखडा ह्या तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी हे औषध घेतल्यास फायदा होतो.
5) रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे घृत रोज खडीसाखर घालून सेवन करावे.
6) पित्त वाढल्यामुळे छातीत जळजळ होत असल्यास, हातापायांची आग होत असल्यास ,रक्तयुक्त मलप्रवृत्ती होत असल्यास हे खूपच गुणकारी आहे.
7) वारंवार गर्भपात ह्या  तक्रारी साठी गर्भधारणा होण्याआधी हे औषध दिल्यास, तसेच संपूर्ण गर्भिणी अवस्थेत दिल्यास फायदा होतो.
8) डेलिव्हेरी झाल्यावर आहारात साध्या तूपाच्या ऐवजी हेच औषधी तूप वापरावे, त्यामुळे भरपूर प्रमाणात दुध येण्यास मदत होते.दुधाची प्रत चांगली असल्याने बाळाची वाढ चांगली होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
9) मेनोपॉज मधिल तक्रारींमध्ये ह्या औषधाने चांगला आराम मिळतो.

*****वरिल औषध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या च्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप घ्यावे*******

लहान मुलांसाठी कुमारकल्याण घृत (Kumar Kalyan Ghritam)

लहान मुलांसाठी कुमारकल्याण घृत (Kumar Kalyan Ghritam)

1-हे आयुर्वेदिक औषधी युक्त तूप आहे.
2-साधारणतः   मुलांचे वय सहामहिने एवढे झाल्यावर  ह्या औषधाचा उपयोग केला जातो.
3-लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी अतिशय उत्तम आहे.
4- ह्या औषधाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
5-अन्न पचवण्यासाठी मदत करणारे आहे.
6-बुद्धी, स्मृती, ग्रहणशक्ति वाढविण्यासाठी उपयोगी आहे.
7-हया औषधाचे नियमीत सेवन केलेल्या बाळाचा वर्ण सुधारतो.
8-हे औषध दिल्यास दात येताना बाळाला अजिबात त्रास होत नाही.
9-बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढत नसल्यास हे औषध  गोदन्ती भस्मासोबत देतात.
10-बाळाला वारंवार सर्दी, खोकला होत असल्यास हे औषध सितोपलादी चुर्णासोबत देतात.
11-लहानमुलांची पाचनशक्ति वाढण्यासाठी,पोटाच्या तक्रारींसाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी  पोळीवर,भातावर,खीर,शिरा इत्यादी आहार पदार्थांमध्ये मिसळून दररोज दिल्याने फायदा होतो.

****औषध वैद्यांच्या सल्ल्याने योग्य मात्रेत घ्यावे.*******

Nirgundi

निर्गुंडी

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी बहुगुणी अशी ही वनस्पती आहे.
पानांचा उपयोग औषधांसाठी केला जातो.

1-वेदनायुक्त सुज असल्यास पानांचा रस 10मिली प्रमाणात मधासोबत घ्यावा.
2-आमवातात(Rheumatoid arthritis)मध्ये निर्गुंडीचा काढा सुंठीसोबत घ्यावा.तसेच काढ्याने शेकावे.
3-मार लागल्याने जखम होऊन सुज आली
 असल्यास काढ्याने धुवावे व काढा मधासोबत प्यावा.
4-केसांमध्ये उवा,लिखांसाठी पाने वाटून केसांना,माथ्याला  लेप करावा.
5-PCOD ,प्रमेह,लठ्ठपणा, थायरॉईड ह्या आजारात  केश गळत असल्यास  निर्गुंडी पानांचे  1ग्रॅम चुर्ण मधातुन घ्यावे.
6-ही वनस्पती विशेषत:स्मरणशक्ति वाढवणारी आहे व त्यामुळे मनोविकृतीत फार बडबड करणे,भ्रम,अपस्मार(epilepsy),झोप न येणे इत्यादींसाठी उपयोग होतो.
7-ज्वरामध्ये पानांचा रस प्यावा.
8-व्रणात पुय झाल्यास निर्गुंडी काढ्याने स्वच्छ धुऊन निर्गुंडी तेल लावावे.
9-ढगाळ वातावरणात डोके जड झाले असेल,दुखत असेल तर पाने वाटून ते माथ्यावर ठेवावे.
10-प्रमेह,स्थौल्यात त्वचेचे आजार असतिल तर त्याचा काढा बाहेरुन धुण्यासाठी व पिण्यासाठी वापरावा. 

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...