आरोग्यासाठी शतावरी घृत
1) हे औषधी तूप मेधाकर असल्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
2) शुक्राणू कमकुवत असलेल्या रुग्णांना हे औषध खडीसाखर, पिंपळी व मधातून दिल्यास फायदा होतो.
3)मासिक पाळी च्या तक्रारीं साठी स्त्रियांनी रोज आहारात ह्या घृताचा समावेश करावा.
4) विशेषतः वारंवार मुत्रसंसर्ग , मुतखडा ह्या तक्रारींसाठी सकाळी उपाशीपोटी हे औषध घेतल्यास फायदा होतो.
5) रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे घृत रोज खडीसाखर घालून सेवन करावे.
6) पित्त वाढल्यामुळे छातीत जळजळ होत असल्यास, हातापायांची आग होत असल्यास ,रक्तयुक्त मलप्रवृत्ती होत असल्यास हे खूपच गुणकारी आहे.
7) वारंवार गर्भपात ह्या तक्रारी साठी गर्भधारणा होण्याआधी हे औषध दिल्यास, तसेच संपूर्ण गर्भिणी अवस्थेत दिल्यास फायदा होतो.
8) डेलिव्हेरी झाल्यावर आहारात साध्या तूपाच्या ऐवजी हेच औषधी तूप वापरावे, त्यामुळे भरपूर प्रमाणात दुध येण्यास मदत होते.दुधाची प्रत चांगली असल्याने बाळाची वाढ चांगली होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
9) मेनोपॉज मधिल तक्रारींमध्ये ह्या औषधाने चांगला आराम मिळतो.
*****वरिल औषध आयुर्वेदिक डॉक्टरांच्या च्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप घ्यावे*******
No comments:
Post a Comment