Monday, 26 November 2018

Nirgundi

निर्गुंडी

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी बहुगुणी अशी ही वनस्पती आहे.
पानांचा उपयोग औषधांसाठी केला जातो.

1-वेदनायुक्त सुज असल्यास पानांचा रस 10मिली प्रमाणात मधासोबत घ्यावा.
2-आमवातात(Rheumatoid arthritis)मध्ये निर्गुंडीचा काढा सुंठीसोबत घ्यावा.तसेच काढ्याने शेकावे.
3-मार लागल्याने जखम होऊन सुज आली
 असल्यास काढ्याने धुवावे व काढा मधासोबत प्यावा.
4-केसांमध्ये उवा,लिखांसाठी पाने वाटून केसांना,माथ्याला  लेप करावा.
5-PCOD ,प्रमेह,लठ्ठपणा, थायरॉईड ह्या आजारात  केश गळत असल्यास  निर्गुंडी पानांचे  1ग्रॅम चुर्ण मधातुन घ्यावे.
6-ही वनस्पती विशेषत:स्मरणशक्ति वाढवणारी आहे व त्यामुळे मनोविकृतीत फार बडबड करणे,भ्रम,अपस्मार(epilepsy),झोप न येणे इत्यादींसाठी उपयोग होतो.
7-ज्वरामध्ये पानांचा रस प्यावा.
8-व्रणात पुय झाल्यास निर्गुंडी काढ्याने स्वच्छ धुऊन निर्गुंडी तेल लावावे.
9-ढगाळ वातावरणात डोके जड झाले असेल,दुखत असेल तर पाने वाटून ते माथ्यावर ठेवावे.
10-प्रमेह,स्थौल्यात त्वचेचे आजार असतिल तर त्याचा काढा बाहेरुन धुण्यासाठी व पिण्यासाठी वापरावा. 

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...