Thursday, 17 January 2019

“सूरण”

मुळव्याधीवरिल सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषध

1) सूरण हे गुणाने उष्ण , भुक वाढवणारे व अन्नाचे पाचन करणारे आहे
2) पाचनशक्ति कमजोर होऊन अन्नमार्गातिल रस रक्तवाहिन्यांच्या मार्गाला अवरोध झाल्यास अर्श/मुळव्याध हा आजार होतो.सूरणाने अन्नाचे पचन व्यवस्थित पार पडते,तसेच रसरक्तवाहिन्यांचे विस्तार होऊन मार्ग मोकळा होतो.
3) बद्धकोष्ठता साठी उपयुक्त आहे
4) यकृत प्लिहा वृद्धी(enlarged liver/spleen) मध्ये सूरण फार उपयोगी आहे
5) सर्दी,खोकला,दमा,सुज येणे ह्या आजारात सूरणाची भाजी खावी
6) डायबिटीस ,ग्रहणी(IBS),भगंदर(fistula)मध्ये उपयोग होतो
7) मासिक पाळी उशीरा उशीरा येत असल्यास;  नियमीत येण्यासाठी सूरणाची भाजी आठवड्यात दोनवेळा घ्यावी
8) अकाली केस पांढरे होण्याची तक्रारींसाठी सूरण वटक ह्या आयुर्वेदिक औषधाचा उपयोग केला जातो

****सूरण उष्ण गुणात्मक असल्यामुळे पित्ताची तक्रारी असणाऱ्यांनी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे.********

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...