गर्भिणी साठी “आवळापाक”
1) आवळे स्वच्छ धुऊन त्याचा रस 1 लिटर घेऊन मंद आचेवर शिजवून 125 मिली होईल एवढे आटवावे
2) बीजरहित मनुका 200 ग्रॅम घेऊन बारीक कराव्या व आवळ्याच्या आटवलेल्या रसात टाकून मिसळून घ्याव्या.
3) पिंपळी 200 ग्रॅम, जेष्ठमध 25 ग्रॅम, वंशलोचन 25 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम, ह्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून आवळ्याच्या आटवलेल्या रसात टाकावे.
4) खडीसाखर 750 ग्रॅम घेऊन दोन तारी पाक करावा व त्यात वरील औषधी युक्त आवळ्याचा रस ओतावा.
5) दोन तारी पाक झाल्यावर थंड होऊ द्यावे
6) थंड झाल्यावर त्यात 250मिली एवढे शुद्ध मध मिसळून घ्यावे.
7) काचेच्या बरणीत भरून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
9) गर्भिणी अवस्थेत 5मिली एवढे रोज द्यावे
10) हे आवळापाक गर्भिणी त होणारी वांती, अम्लपित्त, मलबद्धता, अजीर्ण, तोंडाला पाणी सुटणे, फार तहान लागणे, छातीत धडधड होणे, रक्ताची कमतरता ह्यासाठी उपयोगी आहे
No comments:
Post a Comment