Monday, 21 February 2022

आयुर्वेद चिकित्सा व अर्वाचीन चिकित्सा (allopathy) यामध्ये तुलनात्मक विचार-

**********

संदर्भ - ग्रंथ आयुर्वेद भास्कर - page no 242, वैद्य मामा गोखले

*********

1) विशेषतः जंतु शास्त्राच्या शोधामुळे प्रतिबंधक उपायामध्ये व काही वेळा रोगनाशक उपायामध्ये विलक्षण क्रांती झाली आहे. 

2) जी साध्या डोळ्यांना दिसत नाही ते सूक्ष्म दर्शकाच्या साहाय्याने दिसते आणि ते आपण नाकारु शकत नाही. 

3) जंतूचे ज्ञान हेआयुर्वेदामध्ये सुद्धा अनुमानाने त्यांची लक्षणे सांगितली आहेत. 

4) अर्वाचीन शास्त्रानुसार जंतूंना मारक औषधे(antibiotics) आहेत. पण ती विषारी आहेत 

5) आयुर्वेदाला ते मान्य नाही कारण विषारी द्रव्ये ही तात्पुरती फायदा देतील परंतु त्यांचे दुष्परिणाम मागे ठेवूनच. 

6) मनुष्य शरीरामध्ये सवयी निर्माण करणारी द्रव्ये ही प्रायः विषारी च द्रव्ये असतात. उदा. अफू, गांजा, भांग, मद्य, antibiotics, यामुळे शरीराला चटक लागते, शीघ्र उत्तेजन व सुख मिळते आणि म्हणून तेथे आकर्षिला जातो.


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu, 

Obstetrics and gynecology 8766740253

आज वसंत पंचमी.

-माता 'सरस्वती' ला नमन. 

-वसंत ऋतुला भारत वर्षात फार महत्व आहे.

 - भगवान श्रीकृष्ण  गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात  'ऋतु मध्ये मी वसंत आहे'. 

- माता सरस्वती पृथ्वी वर  वसंत पंचमीला अवतीर्ण झाली. म्हणून ह्यादिवशी विशेष पूजन केले जाते. 

-वसंत ऋतुत मध्ये पृथ्वी माता स्वतःमध्ये असलेल्या अग्नि चे सृजन शक्ती रुपांतर करते,वनस्पती भरपूर फुले फळांनी युक्त होतात. 

-वसंतात कोकीळेला सुद्धा कंठ फुटतो. 

-संपूर्ण सृष्टीत असलेली मळभ दूर होऊन टवटवीतपणा येतो. 

-प्रत्येकाने मनातील व शरीरातील मळभ दूर करण्यासाठी माता सरस्वतीचे दर्शन पुजन करावे ,तसेच वमन कर्म करुन ब्राम्हीप्राश औषध घ्यावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

स्रीरोग मध्ये उपयोगी टेंबुरणी / तेंदु (Diospyros embryopteris)

1) चरक-संहितेत  उदर्द प्रशमन महाकषाय व सुश्रुत-संहिता के न्यग्रोध्रादि-गण मध्ये समावेश केलेला आहे. 

2) ह्या झाडांच्या पानाला तेंदूपाने म्हणतात व त्यापासून बिडी बनवतात 

3) फळे जवळपास चिकू सारखी लागतात व बियासुद्धा चिकूप्रमाणे दिसतात. 

गर्भिणी अवस्थेत ही फळे खाणे चांगले आहे 

4) विशेषतः गर्भिणी अवस्थेत मुतखड्याचा त्रास होत असेल  तर ही फळे खाल्याने मुतखडे बारीक होऊन बाहेर पडून जातात

5) गर्भाशयाला, गर्भाशय मुखाला सूज (cervicitis) ह्यामुळे स्राव, खाज येत असेल तर vaginal douching साठी फळे फार गुणकारी आहेत.

6) पिकायला आलेली फळे ठेचून त्यातील गर साफ करुन उन्हात सुकवावा. त्याचे लाल रंगाचे बारीक पातळ तुकडे बनतात. ते तुकडे काचेच्या बरणीत भरुन कोरड्या जागी ठेवून हवे तेव्हा vaginal douch साठी वापरता येतात . 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology 

8766740253

तरुण राहण्यासाठी चिकित्सा- (रसायन चिकित्सा)

व्याख्या - 

'यज्जराव्याधिविध्वंसि भेषजं तद्रसायनम् ll भै. र. रसायनप्रकरण

*जे औषध `जरा व्याधी `म्हणजे म्हातारपण नावाच्या आजाराला नष्ट करतो, म्हातारपण येऊ देत नाही त्याला रसायन म्हणतात. 

*ही चिकित्सा करण्याचे योग्य वय-

18 ते 45 हे वय योग्य होय. 

म्हणजेच युवावस्थेचा प्रारंभ झालयावर प्रौढावस्था येईपर्यंत रसायन चिकित्सा करावी

*रसायन चिकित्सेचे फायदे-

1) दीर्घ आयुष्य, स्मरणशक्ती, धारणाशक्ति, आरोग्य, मनाचे तारुण्य भाव, त्वचेची चकाकी,कांती, उत्तम स्वर, शरीर व इंद्रिय शक्ती वाढणे, वाणी ला सिद्धी, सकुशलकार्य सिद्धी प्राप्त होते. 

2) शरीरातील सर्व घटक पदार्थ , अवयव उत्तम प्रतीचे निर्माण होतात. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology 

8766740253

डायबेटिस पेशंटसाठी

1) डायबेटिस पेशंट मध्ये अनेक विषारी पदार्थ शरीरात तयार होतात, रक्तात चिकटपणा वाढतो, प्रत्येक पेशीमध्ये अजीर्ण, अपचन(indigestion and disturbed metabolism) निर्माण झालेले असते. पेशी स्वतः चे अन्न घेण्यास असमर्थ असतात (insulin resistance). 

2) वसंत ऋतुत नैसर्गिक पणे शरीरात साठलेला कफ पातळ होऊ लागतो. शरीरातील कफासोबत मिसळलेले चिकट दुषित शरीर घटक सुद्धा कफामध्ये सुटू लागतात. 

3)  असा नैसर्गिक पणे पातळ झालेले, तरंगणारे विषारी घटकपदार्थ वसंत ऋतुंमध्ये वमन ह्या पंचकर्मापैकी एका कर्माने सहज बाहेर काढता येतात. 

4) वमनाने पचन सुधारते,अतिरिक्त वाढलेली चरबी पातळ होऊन निघून जाते. 

Insulin-Resistance कमी होतो,

5) ह्याशिवाय हातापायांची आग होणे, मुंग्या येणे,डोळ्यांच्या तक्रारी, चिडचिडपणा, ताकद कमी झाल्यासारखी वाटणे, पित्त होणे, पोट साफ न होणे, अॅसिडीटी अशा अनेक डायबिटीस रुग्णांच्या तक्रारी वमन केल्याने दूर होतात. 

6) खरे तर आयुर्वेदात निरोगी व रोगी सर्वांना सर्वांना वसंत ऋतुत वमन करावे असे सांगितले आहे, परंतु डायबेटिस चा रुग्णांनी विशेषतः करुन घ्यावे व आनंदाने आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Prasutitantra Streeroga 8766740253

पोटात कृमी, जंत

 पोटात कृमी, जंत (intestinal parasites infestations) असणाऱ्यांनी औषधासोबत आहाराचे नियम पाळले तर आजारापासून लवकर सुटका होते. 


1) जंत असणाऱ्यांनी दूध, तूप, दही खाऊ नये

2) मैद्याचे पदार्थ,  आंबट पदार्थ जसे लिंबू चिंचा लोणची असे पदार्थ खाऊ नये, गोड पदार्थ खाऊ नये. 

3) विरुद्ध अन्न जसे फ्रूट शेक, शिक्रण, दुध मासे एकत्रपणे खाऊ नये

4) उडीदडाळ, पालेभाज्या टाळाव्या

भै. र. कृमिरोगचिकित्सा

Vd Pratibha Bhave 8766740253

सूतिकेच्या आरोग्यासाठी

1) पहिल्या दिवसापासून सूतिकेला संपूर्ण अंगाला मालिश व हलका शेक घ्यावा

2) सकाळी कोमट पाण्यात 10ml नारळाचेतेल किंवा तिळतेल प्यावे(तैलपान)

3) सुंठ मिरे पिंपळी लसूण हिंग असे भूक वाढवणारे, पचवणारे उष्ण पदार्थ पहिल्या दिवसापासून खावे. 

4) जुने तांदुळ, कुळीथ आहारात असावा 

5) शेवगा,वांगी, लहान मूळा, परवल, ह्या भाज्यांचा समावेश करावा 

6) डाळींब खावे. जेवणानंतर विडा खावा. 

7) कफ व वात कमी करणारे सर्व पदार्थ खावे. 

8) डेलिव्हेरी होऊन 7दिवस झाल्यावर पौष्टिक डिंक लाडू खावे

9) सूतिकेला 12दिवसांनंतर मांसाहार देता येतो. 

10) दिड महिना सूतिकेने नियमांचे पालन करावे


संदर्भ - भैषज्य रत्नावली सूतिका रोग चिकित्सा 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology 

8766740253

डायबेटिस (Diabetes ) असलेल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी

1) आजार नविन असतांनाच वमन विरेचन, चुर्ण मसाज, लंघन करुन त्यासोबत डायबेटिस कमी होईल असे अन्नपदार्थ व औषधी घ्यावी 

2) ह्या आहारात जुने धान्य म्हणजे 6महिने जुना परंतु 1 वर्षाच्या आत असलेले तांदुळ, कुळीथ/हुलगे, गहू वापरावा. (कुठलेही नविन धान्य नको) 

3) कुळीथ, मूग, तूर, चणा ह्याचे कढण, बार्ली ची पेज प्यावी

4) तिळ,धानाच्या लाह्या, भेसळरहित मध,घ्यावे 

5) लोणी नसलेले ताक उत्तम 

6)  शेवगा,पडवळ,कारले,कर्टोली, उंबराचे कच्चे फळ, कच्चे केळ, पातूरची भाजी,गोखरु, लसूण हे भाजीसाठी उपयोगी आहेत. जंगली पशू पक्षांचे मांस मांसाहारी व्यक्ती ने खावे. 

7) गुळवेल,त्रिफळा, कवठ, जांभूळ, सुंठ,मिरे, पिंपळी, तेंदूफळ, कमलकंद, खजूर, कशेरुक खावे 

8) टरबूजा चे सर्व प्रकार ह्या रुग्णांना चालतात 

9) सर्व कडू व तूरट पदार्थ खावे

10) घोडेसवारी करणे, खूप चालणे, सूर्यप्रकाशात फिरणे, व्यायाम करणे. 


*ह्या सर्व गोष्टी डायबेटिस च्या रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी आहेत. 

संदर्भ - भैषज्य रत्नावली प्रमेह चिकित्सा 


Vd Pratibha Bhave 

8766740253

ग्रहणी /Sprue/IBS (irritable bowel syndrome) ह्या आजारात खाण्याजोगे पदार्थ.

1) जुन्या तांदळाचा भात, लाह्यांचे सूप, 

2) तूर व मसूर डाळीच्या वरणाचे पाणी, - 3)गायीच्या दूधाचे ताक ज्यातील लोणी पूर्णपणे काढलेले आहे, 

4) बकरीच्या दूधाचे लोणी, बकरीच्या दूधाचे तूप, दूध, 

5) तिळाचे तेल, मध, ताक

6) बकुलफळ, डाळिंब, कोवळे भोकरांची फळे, केळफूल, कच्चे केळ,जांभूळ, कच्चे बेलफळ, शिंगडा,कशेरुक, 

7) कवठ, कुड्याची साल, मंजिष्ठा, 

8) जिरे, जायफळ,धने, 

9) सर्व प्रकारचे लहान मासे 

10) सर्व तुरट पदार्थ 


संदर्भ - भैषज्य रत्नावली ग्रहणी रोग चिकित्सा


Vd Pratibha Bhave 

8766740253

मुळव्याध (Piles)


असलेल्या रुग्णांना खाण्याजोगे अन्नपदार्थ 

1) कुळीथ (हुलगे) 

2) बार्ली, गहू, तांदूळ 

3) पुनर्नवा (खापरखुटी), सूरण, वांगी, परवल, चंदन बटवा ह्या भाज्या 

4) आवळा,पिकलेले कवठ,

5) ताक,लोणी,काळे मिरे, कांजी

7) बकरीचे दूध, 

8) हरणाचे मांस

मुळव्याध असणाऱ्यांनी वरील अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा.

संदर्भ :भैषज्य रत्नावली अर्शरोगचिकित्सा

*आहाराचे नियम पाळून रोगमुक्त होणे महत्त्वाचे असते. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology

8766740253

आरोग्यासाठी तिळ खावे

1) तिळाचे काळा, पांढरा व तांबडा असे 3 प्रकार आहेत. औषधासाठी काळा उत्तम समजल्या जातो. 

2) निरोगी व्यक्तिंसाठी साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी (हेमंत व शिशिर ऋतुत) हे महिने भरपूर तीळाचे पदार्थ खाण्यासाठी योग्य आहेत.

3) रोज तिळ तेल तोंडात धरुन ठेवण्याची क्रिया(गंडुष) केल्यास दात मजबूत होतात. 

4) मुळव्याधीत मलप्रवृत्ति ला खडा होत असेल तर तिळतेलाच्या मात्रा बस्ति ने गुण येतो 

5) वाताचे अनेक आजारात मलसंचय हे महत्वाचे कारण असते अशावेळी मात्रा बस्ति ने गुण येतो

6) स्त्रियांनी केस चांगले वाढावे,केस सुदृढ व्हावे, पाळी नियमितपणे यावी ह्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात तीळगुळ खायलाच हवे. ह्यामुळे गर्भाशयाच्या तक्रारी कमी होतात. 

7) बाळाला दूध पाजणाऱ्या सर्व स्त्रियांनी सुद्धा तिळगुळ खाल्ल्याने दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढते

8) तिळ उष्ण आहे व ते गर्भाशयत साचलेले रक्त बाहेर काढते. त्यामुळे पाळीच्यावेळी पोट कंबर दुखणे(dismenorrhoea), पाळीचे प्रमाण कमी असणे ह्यासाठी  तिळ फार उपयोगी आहे. मात्र गर्भिणी ने तिळ खाऊ नये, गर्भपाताची शक्यता वाढते. 

9) हिवाळ्यात तिळ वाटून त्याचा लेप अंगाला लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो 

10) मुत्र दाह, मुत्रकृच्छ(cystitis) मध्ये तिळाचा काढयाने वेदना थांबतात 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology 

8766740253

सितोपलादी चूर्ण स्वतः बनवा

1) दालचीनी 10gm

2) छोटी विलायची बिया 20gm

3) पिंपळी 40gm

4) वंशलोचन 80gm

5) खडीसाखर 160gm

एकत्र पीठाप्रमाणे बारीक करुन घ्यावे

(संदर्भ भै. र.) 

मात्रा dose 

*****

-वय  12वर्ष पुढे - 2gm दिवसातून 2वेळा सकाळी व रात्री जेवणानंतर. मधातून द्यावे. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा अर्धी मात्रा द्यावी. 

 उपयोग - 

*****

-खोकला, दमा, डोके दुखणे, बारीक ताप असल्याप्रमाणे वाटणे, हातापायांची आग होणे, भूक न लागणे, जीभेला बधिरपणा येणे, जेवणाची इच्छा न होणे, ह्यासाठी उपयोगी आहे 

-सर्दी चे औषध घेतल्यावर कोरडेपणा येऊन डोकं दुखत असेल, जड झाले असेल तर बनप्सा सरबत बरोबर सितोपलादी चूर्ण  घेतले तर कफ मोकळा होतो व बरे वाटते. 

-लहान मुलांना टॉनिक म्हणून सितोपलादी चूर्ण प्रवाळ युक्त गुलकंदातून द्यावे, हाडे मजबुत होतात व पचनशक्ति वाढते. 

-हे औषधी चुर्ण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसेच सूतिका गर्भिणी सर्वांना देता येते. 

टीप-

****

चुर्ण बनवण्यासाठी वापरायची सर्व सामग्री चांगल्या प्रतीचे असणे आवश्यक आहे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynaecology

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...