1) आजार नविन असतांनाच वमन विरेचन, चुर्ण मसाज, लंघन करुन त्यासोबत डायबेटिस कमी होईल असे अन्नपदार्थ व औषधी घ्यावी
2) ह्या आहारात जुने धान्य म्हणजे 6महिने जुना परंतु 1 वर्षाच्या आत असलेले तांदुळ, कुळीथ/हुलगे, गहू वापरावा. (कुठलेही नविन धान्य नको)
3) कुळीथ, मूग, तूर, चणा ह्याचे कढण, बार्ली ची पेज प्यावी
4) तिळ,धानाच्या लाह्या, भेसळरहित मध,घ्यावे
5) लोणी नसलेले ताक उत्तम
6) शेवगा,पडवळ,कारले,कर्टोली, उंबराचे कच्चे फळ, कच्चे केळ, पातूरची भाजी,गोखरु, लसूण हे भाजीसाठी उपयोगी आहेत. जंगली पशू पक्षांचे मांस मांसाहारी व्यक्ती ने खावे.
7) गुळवेल,त्रिफळा, कवठ, जांभूळ, सुंठ,मिरे, पिंपळी, तेंदूफळ, कमलकंद, खजूर, कशेरुक खावे
8) टरबूजा चे सर्व प्रकार ह्या रुग्णांना चालतात
9) सर्व कडू व तूरट पदार्थ खावे
10) घोडेसवारी करणे, खूप चालणे, सूर्यप्रकाशात फिरणे, व्यायाम करणे.
*ह्या सर्व गोष्टी डायबेटिस च्या रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी आहेत.
संदर्भ - भैषज्य रत्नावली प्रमेह चिकित्सा
Vd Pratibha Bhave
8766740253
No comments:
Post a Comment