1) तिळाचे काळा, पांढरा व तांबडा असे 3 प्रकार आहेत. औषधासाठी काळा उत्तम समजल्या जातो.
2) निरोगी व्यक्तिंसाठी साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी (हेमंत व शिशिर ऋतुत) हे महिने भरपूर तीळाचे पदार्थ खाण्यासाठी योग्य आहेत.
3) रोज तिळ तेल तोंडात धरुन ठेवण्याची क्रिया(गंडुष) केल्यास दात मजबूत होतात.
4) मुळव्याधीत मलप्रवृत्ति ला खडा होत असेल तर तिळतेलाच्या मात्रा बस्ति ने गुण येतो
5) वाताचे अनेक आजारात मलसंचय हे महत्वाचे कारण असते अशावेळी मात्रा बस्ति ने गुण येतो
6) स्त्रियांनी केस चांगले वाढावे,केस सुदृढ व्हावे, पाळी नियमितपणे यावी ह्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात तीळगुळ खायलाच हवे. ह्यामुळे गर्भाशयाच्या तक्रारी कमी होतात.
7) बाळाला दूध पाजणाऱ्या सर्व स्त्रियांनी सुद्धा तिळगुळ खाल्ल्याने दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढते
8) तिळ उष्ण आहे व ते गर्भाशयत साचलेले रक्त बाहेर काढते. त्यामुळे पाळीच्यावेळी पोट कंबर दुखणे(dismenorrhoea), पाळीचे प्रमाण कमी असणे ह्यासाठी तिळ फार उपयोगी आहे. मात्र गर्भिणी ने तिळ खाऊ नये, गर्भपाताची शक्यता वाढते.
9) हिवाळ्यात तिळ वाटून त्याचा लेप अंगाला लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो
10) मुत्र दाह, मुत्रकृच्छ(cystitis) मध्ये तिळाचा काढयाने वेदना थांबतात
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment