1) डायबेटिस पेशंट मध्ये अनेक विषारी पदार्थ शरीरात तयार होतात, रक्तात चिकटपणा वाढतो, प्रत्येक पेशीमध्ये अजीर्ण, अपचन(indigestion and disturbed metabolism) निर्माण झालेले असते. पेशी स्वतः चे अन्न घेण्यास असमर्थ असतात (insulin resistance).
2) वसंत ऋतुत नैसर्गिक पणे शरीरात साठलेला कफ पातळ होऊ लागतो. शरीरातील कफासोबत मिसळलेले चिकट दुषित शरीर घटक सुद्धा कफामध्ये सुटू लागतात.
3) असा नैसर्गिक पणे पातळ झालेले, तरंगणारे विषारी घटकपदार्थ वसंत ऋतुंमध्ये वमन ह्या पंचकर्मापैकी एका कर्माने सहज बाहेर काढता येतात.
4) वमनाने पचन सुधारते,अतिरिक्त वाढलेली चरबी पातळ होऊन निघून जाते.
Insulin-Resistance कमी होतो,
5) ह्याशिवाय हातापायांची आग होणे, मुंग्या येणे,डोळ्यांच्या तक्रारी, चिडचिडपणा, ताकद कमी झाल्यासारखी वाटणे, पित्त होणे, पोट साफ न होणे, अॅसिडीटी अशा अनेक डायबिटीस रुग्णांच्या तक्रारी वमन केल्याने दूर होतात.
6) खरे तर आयुर्वेदात निरोगी व रोगी सर्वांना सर्वांना वसंत ऋतुत वमन करावे असे सांगितले आहे, परंतु डायबेटिस चा रुग्णांनी विशेषतः करुन घ्यावे व आनंदाने आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Prasutitantra Streeroga 8766740253
No comments:
Post a Comment