1) दालचीनी 10gm
2) छोटी विलायची बिया 20gm
3) पिंपळी 40gm
4) वंशलोचन 80gm
5) खडीसाखर 160gm
एकत्र पीठाप्रमाणे बारीक करुन घ्यावे
(संदर्भ भै. र.)
मात्रा dose
*****
-वय 12वर्ष पुढे - 2gm दिवसातून 2वेळा सकाळी व रात्री जेवणानंतर. मधातून द्यावे. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा अर्धी मात्रा द्यावी.
उपयोग -
*****
-खोकला, दमा, डोके दुखणे, बारीक ताप असल्याप्रमाणे वाटणे, हातापायांची आग होणे, भूक न लागणे, जीभेला बधिरपणा येणे, जेवणाची इच्छा न होणे, ह्यासाठी उपयोगी आहे
-सर्दी चे औषध घेतल्यावर कोरडेपणा येऊन डोकं दुखत असेल, जड झाले असेल तर बनप्सा सरबत बरोबर सितोपलादी चूर्ण घेतले तर कफ मोकळा होतो व बरे वाटते.
-लहान मुलांना टॉनिक म्हणून सितोपलादी चूर्ण प्रवाळ युक्त गुलकंदातून द्यावे, हाडे मजबुत होतात व पचनशक्ति वाढते.
-हे औषधी चुर्ण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसेच सूतिका गर्भिणी सर्वांना देता येते.
टीप-
****
चुर्ण बनवण्यासाठी वापरायची सर्व सामग्री चांगल्या प्रतीचे असणे आवश्यक आहे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynaecology
No comments:
Post a Comment