Wednesday, 1 September 2021

नावात बरेच काही असते

वयानुसार शारीरिक बदल घडून येतो त्यानुसार आचार्यांनी स्त्रियांना निरनिराळी नावे दिली आहेत. जसे

  1. गौरी------ वय 8 वर्षेपर्यंत 
  2. रोहिणी --  वय 9 वर्षेपर्यंत 
  3. कन्या - - - वय 10 वर्षेपर्यंत 
  4. रजस्वला-- वय10वर्षांपेक्षा 

अधिक 

'अष्टवर्षा भवेत् गौरी नववर्षा तु रोहिणी l

दशवर्षा भवेत् कन्या अत ऊर्ध्वं रजस्वला ll' 

Ref - पाराशर स्मृति 7/6


वैद्या प्रतिभा भावे 

प्रसूति व स्रीरोग तज्ञ 

8766740253

स्वास्थ्य हे मुख्यतः 3 गोष्टींवर अवलंबून असते

  1. प्राण :  शुद्ध वायू मिळणे, त्या वायुचे संपूर्ण शरीरात पसरवून  संतुलन राखणे. 
  2. अन्न : आहार सेवन पद्धती, प्रकार व त्याचे पाचन
  3. उदक : पाणी व त्याचे योग्य प्रकारे पाचन. 


आयुर्वेद शास्त्रानुसार ही तिन्ही अंतर्मुख स्रोतस (channel) आहेत.

**प्राणवह स्रोतस हे प्राणशक्ति, जीवशक्ति संपूर्ण शरीरात पोहचवतो. 

**अन्नवह स्रोतस - अन्नाचे ग्रहण करुन योग्य प्रकारे रुपांतर करुन पूर्ण शरीरात पोहचवतो.

**उदकवह स्रोतस –पाण्याचे ग्रहण करुन त्याचे वहन करतो व शरीरात त्याचे संतुलन राखतो

गर्भाशयाच्या आजारांसाठी उत्तरबस्ति

  1. गर्भाशयाच्या सर्व प्रकारच्या आजारात उत्तर बस्ति अतिशय उपयोगी आहे 
  2. उत्तरबस्ति ने ही पाळीच्या तक्रारी दूर होतात 
  3. अंगावर पांढरे जाणे, खाज येणे, त्वचा रुक्ष होणे ह्यासाठी सुद्धा उत्तरबस्ति ने फायदा होतो
  4. गर्भाशयात गाठी निर्माण होणे, लाल अंगावर अधिक प्रमाणात जाणे ह्यासाठी उपयोग होतो
  5. वारंवार गर्भपात होणे, गर्भ न राहणे, अशा तक्रारींसाठी  फायदा होतो
  6. लवकर लवकर पाळी येणे, गाठी पडणे, गळून जाणे, खूप दिवस पर्यंत पाळी लांबवणे, पाळीच्या वेळी दुखणे ह्या तक्रारी  दूर होतात. 
  7. गर्भाशयावर सूज येणे ह्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. 
  8. पोट पूर्णपणे निरुह नावाचा बस्ति देऊन स्वच्छ झाल्यावर तेलाचा बस्ति व उत्तर बस्ति दिला जातो
  9. उत्तरबस्ति ही पंचकर्मापैकी एक आहे. रोगानुसार निरनिराळ्या औषधांचा उपयोग उपयोग करुन उत्तर बस्ति दिला जातो.

Vd Pratibha Bhave 

BAMS MD 

(Prasutitantra Streeroga)

दूर्वा

  1. दूर्वा चांगली स्वच्छ धुऊन वाटून पिळून रस काढावा. अंगावर अधिक प्रमाणात पाळीत रक्त जात असल्यास 5ml एवढ्या प्रमाणात साखर व मध मिसळून घ्यावे. रक्तस्राव कमी होतो. 
  2. एक भाग तूप व त्याच्या 4पट दुर्वा रस घेऊन फक्त तूप राहिल एवढे आटवावे. पुरुषांमध्ये शुक्राची वाढ करण्यासाठी हे तूप रोज वैद्यकीय सल्ल्यानुसार 10ml प्रमाणात रोज घ्यावे 
  3. शरीराची ओजशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील तूपाचा रोजच्या आहारात समावेश करावा 
  4. गर्भिणी अवस्थेत रक्तस्राव होणे, गर्भपात होण्याची शक्यता वाटत असल्यास दूर्वा रस मधसाखरेतून दिल्यास फायदा होतो. म्हणूनच दूर्वा ला प्रजास्थापनी  म्हणतात.(प्रजा म्हणजे गर्भ) 
  5. गर्भ धारणा करण्याआधी  3महिने दुर्वा पासून तयार केलेले तूप वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. त्यामुळे गर्भाशय शुद्ध, रोगविरहीत होते. व उत्तम गर्भधारणा होते. 
  6. गर्भिणी अवस्थेच्या पहिल्या 3महिन्यात  दूर्वा तूप रोज 10ml घेतल्यास गर्भपात होण्याची शक्यता कमी होते व गर्भ दृढ, स्थिर होतो. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD

(Prasutitantra Streeroga) 8766740253

केसांच्या आरोग्यासाठी


  1. कुठलाही आजार नसतांना जर केसांचा पोत पातळ झाला असेल, केस तूटत असतिल, गळत असतिल तर त्याचे मुख्य कारण वारंवार निरनिराळ्या हेअर स्टाईल करणे, नेहमी च केस रंगवणे, केसांमध्ये असलेला ओलावा कमी होणे, रोजच्या जीवनातील तणाव व वंशपरंपरागत हे आहेत. 
  2. म्हणून केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नेहमी केसांचे चांगल्या प्रकारे कंडीशनिंग करावे.
  3. झोपण्याच्या ऊशीच्या आतील कापूस व कव्हर पूर्ण सूती वापरावे.
  4. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी भृंगराजासव, रसायन कल्प, ताप्यादी लोह, नवायस लोह अशी औषधे पोटातून ह्यावी
  5. केस धुण्याआधी केसांचा गुंता काढून मग केस गार पाण्याने धूवावे. केस धुण्यासाठी शिकेकाई वापरत असाल तर व्यवस्थित गाळून घ्यावे. शांपू वापराचा झाला तर अगदी Mild वापरावा. 
  6. ड्रायर वापरत असाल तर cool वर ठेवावे. वेळ लागतो पण केस खराब होत नाही 
  7. केस विंचरताना केस तूटणार नाही ह्याची काळजी घ्यावी. अगदी मूळापासून टोका पर्यंत भराभरा न विंचरता आधी जाड कंगव्याने गुंता काढून घ्यावा

Vd Pratibha Bhave 

BAMS MD

( Prasutitantra Streeroga)

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...