- दूर्वा चांगली स्वच्छ धुऊन वाटून पिळून रस काढावा. अंगावर अधिक प्रमाणात पाळीत रक्त जात असल्यास 5ml एवढ्या प्रमाणात साखर व मध मिसळून घ्यावे. रक्तस्राव कमी होतो.
- एक भाग तूप व त्याच्या 4पट दुर्वा रस घेऊन फक्त तूप राहिल एवढे आटवावे. पुरुषांमध्ये शुक्राची वाढ करण्यासाठी हे तूप रोज वैद्यकीय सल्ल्यानुसार 10ml प्रमाणात रोज घ्यावे
- शरीराची ओजशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील तूपाचा रोजच्या आहारात समावेश करावा
- गर्भिणी अवस्थेत रक्तस्राव होणे, गर्भपात होण्याची शक्यता वाटत असल्यास दूर्वा रस मधसाखरेतून दिल्यास फायदा होतो. म्हणूनच दूर्वा ला प्रजास्थापनी म्हणतात.(प्रजा म्हणजे गर्भ)
- गर्भ धारणा करण्याआधी 3महिने दुर्वा पासून तयार केलेले तूप वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. त्यामुळे गर्भाशय शुद्ध, रोगविरहीत होते. व उत्तम गर्भधारणा होते.
- गर्भिणी अवस्थेच्या पहिल्या 3महिन्यात दूर्वा तूप रोज 10ml घेतल्यास गर्भपात होण्याची शक्यता कमी होते व गर्भ दृढ, स्थिर होतो.
Vd Pratibha Bhave
BAMS MD
(Prasutitantra Streeroga) 8766740253
No comments:
Post a Comment