- कुठलाही आजार नसतांना जर केसांचा पोत पातळ झाला असेल, केस तूटत असतिल, गळत असतिल तर त्याचे मुख्य कारण वारंवार निरनिराळ्या हेअर स्टाईल करणे, नेहमी च केस रंगवणे, केसांमध्ये असलेला ओलावा कमी होणे, रोजच्या जीवनातील तणाव व वंशपरंपरागत हे आहेत.
- म्हणून केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नेहमी केसांचे चांगल्या प्रकारे कंडीशनिंग करावे.
- झोपण्याच्या ऊशीच्या आतील कापूस व कव्हर पूर्ण सूती वापरावे.
- केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी भृंगराजासव, रसायन कल्प, ताप्यादी लोह, नवायस लोह अशी औषधे पोटातून ह्यावी
- केस धुण्याआधी केसांचा गुंता काढून मग केस गार पाण्याने धूवावे. केस धुण्यासाठी शिकेकाई वापरत असाल तर व्यवस्थित गाळून घ्यावे. शांपू वापराचा झाला तर अगदी Mild वापरावा.
- ड्रायर वापरत असाल तर cool वर ठेवावे. वेळ लागतो पण केस खराब होत नाही
- केस विंचरताना केस तूटणार नाही ह्याची काळजी घ्यावी. अगदी मूळापासून टोका पर्यंत भराभरा न विंचरता आधी जाड कंगव्याने गुंता काढून घ्यावा
Vd Pratibha Bhave
BAMS MD
( Prasutitantra Streeroga)
No comments:
Post a Comment