Tuesday, 17 September 2019

"तारुण्य - युवावस्था टिकवण्यासाठी"

      आयुर्वेदातील रसायन औषधी 
1) जी औषधी, रोगांचा नाश करुन वृद्धावस्था येऊ देत नाही त्यांना रसायन म्हणतात. 
2) ही औषधी घेण्याआधी वमन विरेचन इत्यादी पंचकर्माने शरीर शुद्ध करुन घ्यावे लागते. जसे मळलेल्या कपड्यांना रंगात टाकले तर त्यावर योग्य प्रकारे रंग चढत नाही त्याचप्रमाणे शरीर शुद्धी केल्याशिवाय रसायन औषधाने योग्य गुण येत नाही. 

*****रसायन औषधी******

       हरितकी रसायन 
1) वर्षा ऋतुत(जून जुलै)  हिरडा चुर्ण सैंधव मीठातून खावे. 
2) शरद ऋतुत (आॅगस्ट, सप्टेंबर) हिरडा चूर्ण साखरे सोबत घ्यावे. 
3) हेमंत ऋतुत(आक्टोबर, नोव्हेंबर)  हिरडा चूर्ण शुंठी सोबत घ्यावे. 
4) शिशिर ऋतुत(डिसेंबर, जानेवारी)  हिरडा चूर्ण पिंपळी सोबत घ्यावे. 
5) वसंत ऋतुत(फेब्रुवारी, मार्च)  हिरडा चूर्ण मधासोबत घ्यावे. 
6) ग्रीष्म  ऋतुत(एप्रिल, मे)  हिरडा चूर्ण गुळासोबत घ्यावे. 

*************आयुर्वेदात अशी अनेक रसायन औषधी सांगितलेली आहेत आयुर्वेदिक वैद्याच्या मार्गदर्शनाने तरुणांनी ती नियमित घ्यावी व आपले स्वास्थ्य आरोग्य टिकवावे******************

निरोगी मनुष्यासाठी दिनचर्या

1) ब्राम्हमुहुर्तावर उठावे. म्हणजे साधारणतःसकाळी 4.00 - 5.30 किंवा सुर्योदयापूर्वी 45 मिनीटे
2) त्यानंतर मलमूत्र विसर्जन करावे
3) खदिर, करंज, अपामार्ग, कडुनिंब, बाभुळ, बकुल, अर्जुन, वड ह्यापैकी जे मिळेल त्या वनस्पती च्या कोमल काडीने दाताला इजा होणार नाही अशा पद्धतीने दात स्वच्छ घासावे. 
4) जीभ धातूच्या किंवा वरिल वनस्पतींच्या लवचिक पट्टी ने स्वच्छ करावी. ह्यामुळे केवळ जीभ स्वच्छ होते असे नव्हे तर पचनशक्ति सुद्धा वाढते. त्यानंतर चांगली चुळ भरुन मुख स्वच्छ करावे. 
5) आठवडय़ातून एक वेळा रसांजन नावाचे औषध डोळ्यात घालावे. त्यामुळे डोळ्यातील कफ निघून जातो व नेत्र ज्योती उत्तम राखली जाते
6) त्यानंतर निरोगी व्यक्तीने क्रमाने खालील गोष्टी कराव्या 
    नावन / नस्य – nasal drops),
     गण्डूष  – mouth gargles,
    धूम  – inhalation of smoke, and
    ताम्बूल/विडा - chewing betel leaves.
7) त्यानंतर संपुर्ण अंगाला रोज तेल लावावे किंवा मालिश करावी. 
कान, डोके,व पावलांना  विशेषतःमालिश करावी
8) तेल मालिश झाल्यावर  शरिरशक्तिनुसार व्यायाम करावा
9) व्यायामानंतर आयुर्वेदिक औषधी चुर्ण सर्व शरिरावर चोळावे
10) त्यानंतर अगदी कोमट पाण्याने रोज आंघोळ करावी. पाय, नाक, कान अशा मलमार्गाची रोज स्वच्छता करावी. शरीर, वस्त्र सुगंधीत करावी. सुंदर, स्वच्छ व सभ्यतापूर्ण केशभूषा व वेषभूषा करावी. 
11) स्नान झाल्यावर नियमानुसार भोजन करावे.
12) पुन्हा मल मुत्र प्रवृत्ती उत्पन्न झाल्यास ते थांबवू नये. 
13) त्यानंतर सुखप्राप्तीसाठी धर्माचरणाने अर्थ, धन प्राप्ती साठी कार्य करावे. कामावर जावे. गरीब, रोगी, दु:खी व्यक्तींना यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करावा. 
14) बाहेर पडतांना पायात चप्पल/जूता/पादत्राणे घालावे. छत्री असावी. 
15) नेहमीच केस, नख, दात, मिशी व्यवस्थित कापलेले असावे. 
संदर्भ :-अ. ह्र. सू. अ. 2
16) भूक लागल्यावर खावे व तहान लागल्यावर च पाणी प्यावे
17) रात्री चे भोजन सूर्यास्ताच्या आत घ्यावे
18) रात्री 9 ते11 च्या दरम्यान झोपावे.

महिलांनो जाग्या व्हा

"महिलांनो जाग्या व्हा
आपल्या मुलामुलींना भारतीय पद्धतीने बनवलेला आहार द्या. भावी पिढी निरोगी बनवा"

*******************************************
2 sep 2019,  Times of India मध्ये एक बातमी वाचली.
"Bristol, England  येथील 18 वर्षांचा मुलगा अंध झाला." 

 ****तो अंध का  झाला हे खूप महत्वाचे आहे. 

तेथील डॉक्टरांनी केलेल्या परिक्षणांमध्ये असे आढळले कि, वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून त्याचा आहारत रोज तळलेले मासे, चिप्स व  प्रिंगल्स  (Kellogg), पांढरा ब्रेड, हॅम स्लाईस, साॅसेज  हेच पदार्थ होते. त्यामुळे त्याला वयाच्या 15 वर्षी बहिरेपणाआला व 18व्या वर्षी तो आंधळा झाला.
*अशा प्रकारच्या आहाराने लठ्ठपणा, ह्दयरोग, कॅन्सर असे आजार होतातच पण ह्याशिवाय आपले ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय निर्बल व दुर्बल होतात. 
*भारतीय आहार हा प्रदेशानुसार निरनिराळा आहे. सणवारांच्या निमित्ताने अनेक खास पदार्थ बनवले जातात.
*भारतीय आहारात गोड, तिखट,आंबट,खारट,कडू,तुरट अशा सर्व चवींच्या पदार्थांचा समावेश आहे. ह्यालाच आयुर्वेदात षड्रसात्मक आहार म्हणतात. स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक आहे.
*भारतीय परंपरेलाच अनुसरून पाककृती ने खाद्यपदार्थ बनवून  कुटुबाला स्वास्थ्य, आरोग्य प्रदान करा.

बुद्धीवर्धक औषधे

  • बुद्धीवर्धन औषधे  बालपणापासून द्यावी  असे आयुर्वेद सांगतो 
  • आवश्यकतेनुसार बुद्धी वर्धक औषधी निवडावी लागतात 
  • बुद्धीवर्धन करणारी औषधे वेगवेगळ्या गुणांची व चवीचे असतात. 
  • मज्जा धातुक्षयक्षयाची लक्षणे असली तर गोड चवीची औषधी  बुद्धी वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. जसे गाईचे दूध, तूप ,शतावरी अशी औषधे मज्जा धातूचे बृहण करुन बुद्धी वाढवतात. 
  • काही कडू औषधे जसे ब्राह्मी, जटामांसी,  निर्गुण्डी. ही औषधे बुद्धीचा जडत्व कमी करून बुद्धिवर्धनासाठी उपयोगी ठरतात
  • तिखट औषधी साधक पित्त वाढवून बुद्धिवर्धन करतात जसे लसुन, ज्योतिष्मती, वेखंड. 
  • काही रसायन औषधी जसे हिरडा सर्व शरिरातील साठलेला मल बाहेर काढतो. , कफ, मेद नष्ट करतो. त्यामुळे ज्ञानेंद्रियांची शिथिलता दूर होऊन बुद्धिवर्धन होते.

*****सर्व आयुर्वेदिक औषधे आयुर्वेद तज्ञ कडूनच घ्यावी ********

केसांच्या आरोग्यासाठी

1) केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ज्या औषधांचा उपयोग केला जातो त्यांना केश्य औषधी म्हणतात 
2) शरिरात वात पित्त कफाचे संतुलन असेल तर केसांचे आरोग्य चांगले राहते
3) प्राकृत कफ कमी झाल्याने तसेच रस, रक्त, अस्थि असे घटक कमी झाल्याने केस गळतात, रुक्ष होतात,तुटतात. अश्यावेळी दूध, तूप, डिंक, लोह, सुवर्णमाक्षिक, आवळा, जेष्ठमध, विदारिकंदादीऔषध ह्याने केस वाढतात व मजबुत होतात. 
4) रसवहस्रोतसात अडथळा निर्माण झाल्याने केसांना पोषण पोहचत नाही. जसे PCOS, मधुमेह, प्रमेह, लठ्ठपणा, त्वचारोग इत्यादी. ह्यात माका, निर्गुंडी ह्या औषधाने केसांचे आरोग्य सुधारते. 
5) आयुर्वेदमते केसांची निर्मिती अस्थिंपासून(bones) होते. त्यामुळे अस्थि चे आरोग्य सुधारले तर केस सुध्दा तंदुरुस्त होतात. यासाठी आमलकी, गुडूची, नागरमोथा ही औषधे पोटातून दिली जातात. 
6) केस पांढरे होत असल्यास ते काळे रंगविण्यासाठी  बेहडा, माका, निर्गुंडी, कोरांटा ह्याचा उपयोग केला जातो. 

बहुगुणी एरंड

1) एरंड ह्या वनस्पती चा आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयोग होतो
2) मूळ, पाने, बीज, तेल ह्यांचा उपयोग केला जातो 
3) गर्भाशयाच्या संबंधीत तक्रारीं-साठी एरंडतेल खुप उपयोगी आहे
4) मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असल्यास एरंडतेलात लसूण, सैंधव, हिंग टाकून देतात
4) पोटातील वायू सरत नसल्यास एरण्ड मूळाचा काढा हिंग व सैंधव मीठासोबत देतात 
5) किडनी स्टोन मुळे वेदना होत  असतिल तर एरंड मूळ काढ्यात यवक्षार टाकून घेतल्याने तात्पुरते बरे वाटते 
6) Rheumatoid arthritis मध्ये एरंड तेलाने सांध्यांना मालिश करुन त्याच्या पानांने शेकल्याने वेदना कमी होतात 
7) एरंडबीजमज्जा समभाग शुंठी व खडीसाखर असे रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ले असता आमवात (Rheumatoid arthritis) मध्ये वेदना कमी होतात 
8) वातरोगात एरंडबीजपाक अतिशय उत्तम आहे 
9) दमा,मुळव्याधीत पोट साफ होण्यासाठी एरंडतेल देतात 
10) काविळ मध्ये एरंडपानांचा रस साखर मिसळून देतात 
Ref वैद्य गो. आ. फडके 
*एरंड उष्ण गुणाचे आहे त्यामुळे पित्त वाढले असल्यास दिल्या जात नाही
*एरंडबीज विषारी आहे. त्यामुळे औषधात वापरण्यापूर्वी प्रथम आयुर्वेदिक पद्धतीने त्या शुद्ध केल्या जातात.
*महत्त्वाचे : - वरिल औषधी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. 

स्त्रियांसाठी आयुर्वेद उत्तरबस्ति



1) विवाहित महिलांसाठी करावयाचे पंचकर्मापैकी एक आहे. 
2) प्रजननाच्या तसेच गर्भाशयाच्या तक्रारी साठी हा मुख्यतः उपचार आहे. 
3) उत्तरबस्ति करण्यापूर्वी पंचकर्म करुन शरिरशुद्धी करुन घेणे आवश्‍यक असते. 
4) वारंवार गर्भपात, गर्भ न राहणे, पाळीच्या तक्रारी, अधिक किंवा कमी प्रमाणात रजःस्त्राव होणे व वेळी अवेळी पाळी येणे, गर्भाशयात फायब्राॅइड, गाठी होणे, सूज येणे, यात उपयोग होतो. 
5) अधिक प्रमाणात श्वेत स्त्राव होणे ह्यात चांगला फायदा होतो. 

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...