1) केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ज्या औषधांचा उपयोग केला जातो त्यांना केश्य औषधी म्हणतात
2) शरिरात वात पित्त कफाचे संतुलन असेल तर केसांचे आरोग्य चांगले राहते
3) प्राकृत कफ कमी झाल्याने तसेच रस, रक्त, अस्थि असे घटक कमी झाल्याने केस गळतात, रुक्ष होतात,तुटतात. अश्यावेळी दूध, तूप, डिंक, लोह, सुवर्णमाक्षिक, आवळा, जेष्ठमध, विदारिकंदादीऔषध ह्याने केस वाढतात व मजबुत होतात.
4) रसवहस्रोतसात अडथळा निर्माण झाल्याने केसांना पोषण पोहचत नाही. जसे PCOS, मधुमेह, प्रमेह, लठ्ठपणा, त्वचारोग इत्यादी. ह्यात माका, निर्गुंडी ह्या औषधाने केसांचे आरोग्य सुधारते.
5) आयुर्वेदमते केसांची निर्मिती अस्थिंपासून(bones) होते. त्यामुळे अस्थि चे आरोग्य सुधारले तर केस सुध्दा तंदुरुस्त होतात. यासाठी आमलकी, गुडूची, नागरमोथा ही औषधे पोटातून दिली जातात.
6) केस पांढरे होत असल्यास ते काळे रंगविण्यासाठी बेहडा, माका, निर्गुंडी, कोरांटा ह्याचा उपयोग केला जातो.
No comments:
Post a Comment