1) ब्राम्हमुहुर्तावर उठावे. म्हणजे साधारणतःसकाळी 4.00 - 5.30 किंवा सुर्योदयापूर्वी 45 मिनीटे
2) त्यानंतर मलमूत्र विसर्जन करावे
3) खदिर, करंज, अपामार्ग, कडुनिंब, बाभुळ, बकुल, अर्जुन, वड ह्यापैकी जे मिळेल त्या वनस्पती च्या कोमल काडीने दाताला इजा होणार नाही अशा पद्धतीने दात स्वच्छ घासावे.
4) जीभ धातूच्या किंवा वरिल वनस्पतींच्या लवचिक पट्टी ने स्वच्छ करावी. ह्यामुळे केवळ जीभ स्वच्छ होते असे नव्हे तर पचनशक्ति सुद्धा वाढते. त्यानंतर चांगली चुळ भरुन मुख स्वच्छ करावे.
5) आठवडय़ातून एक वेळा रसांजन नावाचे औषध डोळ्यात घालावे. त्यामुळे डोळ्यातील कफ निघून जातो व नेत्र ज्योती उत्तम राखली जाते
6) त्यानंतर निरोगी व्यक्तीने क्रमाने खालील गोष्टी कराव्या
नावन / नस्य – nasal drops),
गण्डूष – mouth gargles,
धूम – inhalation of smoke, and
ताम्बूल/विडा - chewing betel leaves.
7) त्यानंतर संपुर्ण अंगाला रोज तेल लावावे किंवा मालिश करावी.
कान, डोके,व पावलांना विशेषतःमालिश करावी
8) तेल मालिश झाल्यावर शरिरशक्तिनुसार व्यायाम करावा
9) व्यायामानंतर आयुर्वेदिक औषधी चुर्ण सर्व शरिरावर चोळावे
10) त्यानंतर अगदी कोमट पाण्याने रोज आंघोळ करावी. पाय, नाक, कान अशा मलमार्गाची रोज स्वच्छता करावी. शरीर, वस्त्र सुगंधीत करावी. सुंदर, स्वच्छ व सभ्यतापूर्ण केशभूषा व वेषभूषा करावी.
11) स्नान झाल्यावर नियमानुसार भोजन करावे.
12) पुन्हा मल मुत्र प्रवृत्ती उत्पन्न झाल्यास ते थांबवू नये.
13) त्यानंतर सुखप्राप्तीसाठी धर्माचरणाने अर्थ, धन प्राप्ती साठी कार्य करावे. कामावर जावे. गरीब, रोगी, दु:खी व्यक्तींना यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करावा.
14) बाहेर पडतांना पायात चप्पल/जूता/पादत्राणे घालावे. छत्री असावी.
15) नेहमीच केस, नख, दात, मिशी व्यवस्थित कापलेले असावे.
संदर्भ :-अ. ह्र. सू. अ. 2
16) भूक लागल्यावर खावे व तहान लागल्यावर च पाणी प्यावे
17) रात्री चे भोजन सूर्यास्ताच्या आत घ्यावे
18) रात्री 9 ते11 च्या दरम्यान झोपावे.
No comments:
Post a Comment