Tuesday, 17 September 2019

महिलांनो जाग्या व्हा

"महिलांनो जाग्या व्हा
आपल्या मुलामुलींना भारतीय पद्धतीने बनवलेला आहार द्या. भावी पिढी निरोगी बनवा"

*******************************************
2 sep 2019,  Times of India मध्ये एक बातमी वाचली.
"Bristol, England  येथील 18 वर्षांचा मुलगा अंध झाला." 

 ****तो अंध का  झाला हे खूप महत्वाचे आहे. 

तेथील डॉक्टरांनी केलेल्या परिक्षणांमध्ये असे आढळले कि, वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून त्याचा आहारत रोज तळलेले मासे, चिप्स व  प्रिंगल्स  (Kellogg), पांढरा ब्रेड, हॅम स्लाईस, साॅसेज  हेच पदार्थ होते. त्यामुळे त्याला वयाच्या 15 वर्षी बहिरेपणाआला व 18व्या वर्षी तो आंधळा झाला.
*अशा प्रकारच्या आहाराने लठ्ठपणा, ह्दयरोग, कॅन्सर असे आजार होतातच पण ह्याशिवाय आपले ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय निर्बल व दुर्बल होतात. 
*भारतीय आहार हा प्रदेशानुसार निरनिराळा आहे. सणवारांच्या निमित्ताने अनेक खास पदार्थ बनवले जातात.
*भारतीय आहारात गोड, तिखट,आंबट,खारट,कडू,तुरट अशा सर्व चवींच्या पदार्थांचा समावेश आहे. ह्यालाच आयुर्वेदात षड्रसात्मक आहार म्हणतात. स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक आहे.
*भारतीय परंपरेलाच अनुसरून पाककृती ने खाद्यपदार्थ बनवून  कुटुबाला स्वास्थ्य, आरोग्य प्रदान करा.

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...