आयुर्वेदातील रसायन औषधी
1) जी औषधी, रोगांचा नाश करुन वृद्धावस्था येऊ देत नाही त्यांना रसायन म्हणतात.
2) ही औषधी घेण्याआधी वमन विरेचन इत्यादी पंचकर्माने शरीर शुद्ध करुन घ्यावे लागते. जसे मळलेल्या कपड्यांना रंगात टाकले तर त्यावर योग्य प्रकारे रंग चढत नाही त्याचप्रमाणे शरीर शुद्धी केल्याशिवाय रसायन औषधाने योग्य गुण येत नाही.
*****रसायन औषधी******
हरितकी रसायन
1) वर्षा ऋतुत(जून जुलै) हिरडा चुर्ण सैंधव मीठातून खावे.
2) शरद ऋतुत (आॅगस्ट, सप्टेंबर) हिरडा चूर्ण साखरे सोबत घ्यावे.
3) हेमंत ऋतुत(आक्टोबर, नोव्हेंबर) हिरडा चूर्ण शुंठी सोबत घ्यावे.
4) शिशिर ऋतुत(डिसेंबर, जानेवारी) हिरडा चूर्ण पिंपळी सोबत घ्यावे.
5) वसंत ऋतुत(फेब्रुवारी, मार्च) हिरडा चूर्ण मधासोबत घ्यावे.
6) ग्रीष्म ऋतुत(एप्रिल, मे) हिरडा चूर्ण गुळासोबत घ्यावे.
*************आयुर्वेदात अशी अनेक रसायन औषधी सांगितलेली आहेत आयुर्वेदिक वैद्याच्या मार्गदर्शनाने तरुणांनी ती नियमित घ्यावी व आपले स्वास्थ्य आरोग्य टिकवावे******************
No comments:
Post a Comment