- It is available all over in India.
- It improves quality and quantity of sperm.
- Useful in male and female infertility due to quality of eggs
- It is Vrishya and Rasayan.
- Useful in paralysis, parkinsonism and other Vata disorders
- Also useful in preeclampsia to control hypertension and oedema and it is useful to gain wt of fetus.
Friday, 24 July 2020
बला/चिकणा (Sida cardifolia)
आयुर्वेदिक गुण असलेली एक भाजी
पातूर भाजी/मत्स्याक्षी /इंद्राणी (Alternanthera sessilis)
- पावसाळ्यात शेतात उगवणारी औषधी वनस्पती आहे.
- हिची भाजी कांदा मिरची घालून शिजवून बनवावी. तांदुळजाच्या भाजीप्रमाणे बनवावी.
- पित्ताशयातील खडे वितळवणारी आहे. Gallbladder stones वितळवणारी आहे. तसेच पचनाच्या तक्रारी दूर होतात.
मी खाल्ली. तुम्ही सुद्धा खा
Thursday, 18 June 2020
Heel Pain
Ayurvedic treatment :
- Local Treatment : Agnikarma, Massage with medicated oils, Lepa, Swedan-Pottali
- Panchkarma : Basti and Virechana
- Medicines : Trayodashanga Guggul, Maha at vidhwans, Simhanad guggul, Mahayograj guggul, Panchtikta ghrita guggul, Maharasnadi kwath etc.
- Proper Diet and Lifestyle
उन्हाळ्यात तुमचा चेहरा चमकदार व तुकतुकीत ठेवण्यासाठी
- आंघोळीच्या वेळी चेहऱ्याला साबणाऐवजी दही व डाळीचे पीठ एकत्र करुन लावा.
- चेहरा दिवसातून 4ते 5वेळा स्वच्छ पाण्याने धुवा
- तहान लागल्यावर भरपूर पाणी प्या.
- लिंबू सरबत, कोकम सरबत,मोरावळा, फळांचा रस, फळे, देशी गायीचे दूध ह्यापैकी जे जमेल ते घ्या
- आठवडय़ातून 2वेळा हळद, सारीवा, लोध्र ह्याचा लेप चेहऱ्याला लावा
- रोज पोट साफ होईल ह्याकडे लक्ष द्या
- रात्री निश्चिंतपणे झोप घ्या. जमल्यास धमासा फांट घ्या.
Monday, 4 May 2020
दम्याचा त्रास टाळण्यासाठी
आज जागतिक अस्थमा/दमा दिवस आहे.
श्वास चालू असणे हे जिवंतपणाची लक्षण आहे.
श्वासाला अडथळा येऊ नये, पुढे पावसाळ्यात व हिवाळ्यात दम्याचा त्रास होऊ नये म्हणून आताच कामाला लागा व काही आयुर्वेदिक औषधे घ्या.
- रोज प्राणायाम करा, नस्य करा.
- संपूर्ण अंगाला हळूवार तेल चोळून नंतर व्यायाम करा
- गरम पाण्यात मीठ घालून ते पाणी तोंडात मावेल एवढ्या प्रमाणात अर्धा ते एक मिनिट धरुन ठेवा(गंडुष) असे 5ते 6 वेळा करा.
- त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करा(कवल) अशाप्रकारे गंडुष व कवल केल्याने कफ निघून जाऊन श्वासाचा मार्ग मोकळा होतो.
- रात्री रोज एक चमचा एरंड तेल रात्री झोपतांना कोमट पाण्यात घ्या. रोजच्यारोज मलप्रवृत्ति होणे आवश्यक आहे
- च्यवनप्राश / चित्रकहरितकी अवलेह/द्राक्षावलेह ह्यापैकी कोणतेही, सकाळी उपाशीपोटी घ्या.
- नेहमी ताजे अन्न खा. आठवड्यातून 2दिवस उपवास केला तर उत्तमच. उपवासात फलाहार डाळींब, पपई,मनुका मोसंबी, सफरचंद घ्या.
- दिनचर्येचे योग्य पालन करा.तहान लागल्यावर घोटभर पाणी प्यावे. विनाकारण घटाघटा ग्लासभर पाणी एकदम पिऊ नये.
******** AC चा वापर करु नका,दूध, दही व त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका.
गर्भिणी अवस्थेतील STRECH MARKS (STRIAE GRAVIDARUM) साठी
गर्भिणी अवस्थेत त्वचेवर विशिष्ट प्रकारच्या रेषा उठतात. गर्भिणी च्या व गर्भाच्या वाढत्या वजनामुळे पोटावरची त्वचा ताणली जाते त्यामुळे पोटाशिवाय इतर ठिकाणी सुद्धा असे Strech marks निर्माण होतात.
ह्याशिवाय aldosterone नावाचे हार्मोन चे प्रमाण गर्भिणी अवस्थेत वाढते त्यामुळे हे त्वचेवर बदल घडून येतात असे आधुनिक शास्त्राचे मत आहे. त्यावर बदाम तेल लावावे असे सांगितले आहे.
आयुर्वेदात ह्याला किक्किस म्हटले आहे व त्यासाठी उत्तम उपचार सांगितले आहेत.
- गर्भामुळे उत्पीडित वात, पित्त व कफ हे दोष हृदयात जाऊन तेथून संपूर्ण शरिरात पसरुन किक्किस निर्माण करतात
- त्या ठिकाणी खाज येणे हे प्रमुख लक्षण सांगितले आहे
- खाज येत असल्यास चंदन, खस एकत्र वाटून त्याचा लेप लावावा
- किक्किस वाढू नयेत म्हणून कण्हेर च्या पानांने सिद्ध तेल हळूवारपणे त्वचेवर जिरवावे.
- त्यानंतर पटोल, निंब, मंजिष्ठा, तुलसी ह्या पानांचे चूर्णे हलक्या हाताने त्वचेवर चोळावे
- दारुहरिद्रा व जेष्ठमधाचा थंड काढा अवयवांवर शिंपडावा.
- शतावरी, जेष्ठमध अशा औषधींनी सिद्ध लोणी किंवा औषधीयुक्त लोणी बोराच्या काढ्यात मिसळून आवश्यकतेनुसार प्यायला द्यावा.
- किक्किस ला खाज आली तरी खाजवून नये. खाजवल्याने त्वचा खराब होऊ शकते
- आहारात मधुर रसप्रधान पदार्थ जसे दूध, लोणी, भात, खजुर, अंजिरी, नारळ, बदाम अशा पदार्थांचा समावेश असावा. आहार पचायला हलका असावा कमी, तेल व कमी मीठ असलेला असावा.
- पाणी आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणात प्यावे.
Ref च. सं. शा 8/32,अ.हृ.शा1/58-62
टीप:- वरील सर्व उपाय शास्त्रीय असले तरी आयुर्वेदिक तज्ञाकडून करुन घ्यावे.स्वतः उपाय करु नये.
तसेच strech marks निर्माण होऊ नये म्हणून गर्भधारणा होण्यापूर्वी च पंचकर्म करुन घ्यावे
औषधीयुक्त दिव्याची वात
घरातील वातावरण विषमुक्त करण्यासाठी औषधी वाती घरच्या घरी तयार करा
- घरातील पातळ जुने स्वच्छ सूती कापड घ्या. 8से.मी. लांबी व 6 से. मी. रुंद अशा आकारात कापून घ्या.
- घरात कापूर, कडूनिंब, मिरे, सुंठ, पिंपळी, मोहरी, लवंग, हळद, वेखंड, संत्री साल, ओवा, दालचीनी, तेजपान, राळ ह्यापैकी जेवढ्या प्रकारच्या औषधी मिळतील तेवढी घ्या. ती थोडे पाणी घालून वाटून किंवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या
- त्या मिश्रणातून थोडेसे घेऊन अगदी पातळ थर होईल असे कापडाच्या सर्व बाजूने एकसारखे पसरवून घ्या
- त्यानंतर त्या कापडाला अळू वडीप्रमाणे वळून वात तयार करा.
- अशाप्रकारे सर्व औषध उपयोग करुन वाती तयार करा.साधारणतः 1चमचा औषधापासून वरिल प्रमाणाने वाती केल्यास 6वाती तयार होतात
- सर्व वाती ऊन्हात कडक वाळवून घ्या
- ह्या वातीचा दिवा सकाळी व संध्याकाळी घरात लावा. जितका वेळ हवे असेल त्याप्रमाणे तेल टाका. दिव्यासाठी करंज तेल, एरंड तेल, निंब तेल, गोडे तेल, खोबरेल तेलात कापूर टाकून अशा प्रकारे जे उपलब्ध असेल ते तेल वापरा.
- दिवा विझल्यावर धूर होतो तो संपूर्ण घरात पसरु द्या. त्यामुळे वातावरण शुद्धी होते
- स्वतः ची काळजी घ्या व इतरांना रोगरहित करण्यासाठी प्रयत्नशील रहा.
Subscribe to:
Posts (Atom)
Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)
1) काले – Food should be taken at the proper time, 2) सात्म्ये-food should be familial, acceptable 3) शुचि – it should be clean 4) हितं -...
-
बाळंतकाढा (प्रसूति झाल्यावर घ्यायचे अतिशय महत्त्वाचे आयुर्वेदिक औषध):- *बाळंतकाढा नंबर1: प्रसूति झाल्यावर प्रथम दिवसांपासून ते 10व्य...
-
FOR ACIDITY - AYURVEDIC MEDICINES Common causes of acidity 1) Stress: Hectic lifestyle and stress can lead to unhealthy or irregul...
-
वातप्रधान दोषों में अथवा केवल वात के कारण होनेवाले रोगों में बस्ति दी जाती है l पंचकर्मोमे ‘बस्ति’चिकित्सा श्रेष्ठ, अग्रणी है l #बस्ति शरीर...