घरातील वातावरण विषमुक्त करण्यासाठी औषधी वाती घरच्या घरी तयार करा
- घरातील पातळ जुने स्वच्छ सूती कापड घ्या. 8से.मी. लांबी व 6 से. मी. रुंद अशा आकारात कापून घ्या.
- घरात कापूर, कडूनिंब, मिरे, सुंठ, पिंपळी, मोहरी, लवंग, हळद, वेखंड, संत्री साल, ओवा, दालचीनी, तेजपान, राळ ह्यापैकी जेवढ्या प्रकारच्या औषधी मिळतील तेवढी घ्या. ती थोडे पाणी घालून वाटून किंवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या
- त्या मिश्रणातून थोडेसे घेऊन अगदी पातळ थर होईल असे कापडाच्या सर्व बाजूने एकसारखे पसरवून घ्या
- त्यानंतर त्या कापडाला अळू वडीप्रमाणे वळून वात तयार करा.
- अशाप्रकारे सर्व औषध उपयोग करुन वाती तयार करा.साधारणतः 1चमचा औषधापासून वरिल प्रमाणाने वाती केल्यास 6वाती तयार होतात
- सर्व वाती ऊन्हात कडक वाळवून घ्या
- ह्या वातीचा दिवा सकाळी व संध्याकाळी घरात लावा. जितका वेळ हवे असेल त्याप्रमाणे तेल टाका. दिव्यासाठी करंज तेल, एरंड तेल, निंब तेल, गोडे तेल, खोबरेल तेलात कापूर टाकून अशा प्रकारे जे उपलब्ध असेल ते तेल वापरा.
- दिवा विझल्यावर धूर होतो तो संपूर्ण घरात पसरु द्या. त्यामुळे वातावरण शुद्धी होते
- स्वतः ची काळजी घ्या व इतरांना रोगरहित करण्यासाठी प्रयत्नशील रहा.
No comments:
Post a Comment