Monday, 4 May 2020

दम्याचा त्रास टाळण्यासाठी

आज जागतिक अस्थमा/दमा दिवस आहे.

श्वास चालू असणे हे जिवंतपणाची लक्षण आहे.
श्वासाला अडथळा येऊ नये, पुढे पावसाळ्यात व हिवाळ्यात दम्याचा त्रास होऊ नये म्हणून आताच कामाला लागा व काही आयुर्वेदिक औषधे घ्या.
  • रोज प्राणायाम करा, नस्य करा. 
  • संपूर्ण अंगाला हळूवार तेल चोळून नंतर व्यायाम करा
  • गरम पाण्यात मीठ घालून  ते पाणी तोंडात मावेल एवढ्या प्रमाणात अर्धा ते एक मिनिट धरुन ठेवा(गंडुष) असे 5ते 6 वेळा करा.
  • त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करा(कवल) अशाप्रकारे गंडुष व कवल केल्याने कफ निघून जाऊन श्वासाचा मार्ग मोकळा होतो.
  • रात्री रोज एक चमचा एरंड तेल रात्री झोपतांना कोमट पाण्यात घ्या. रोजच्यारोज मलप्रवृत्ति होणे आवश्यक आहे 
  • च्यवनप्राश / चित्रकहरितकी अवलेह/द्राक्षावलेह ह्यापैकी कोणतेही, सकाळी उपाशीपोटी घ्या. 
  • नेहमी ताजे अन्न खा. आठवड्यातून 2दिवस उपवास केला तर उत्तमच. उपवासात फलाहार डाळींब, पपई,मनुका मोसंबी, सफरचंद घ्या.
  • दिनचर्येचे योग्य पालन करा.तहान लागल्यावर घोटभर पाणी प्यावे. विनाकारण घटाघटा ग्लासभर पाणी एकदम पिऊ नये. 
******** AC चा वापर करु नका,दूध, दही व त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका.

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...