गर्भिणी अवस्थेत त्वचेवर विशिष्ट प्रकारच्या रेषा उठतात. गर्भिणी च्या व गर्भाच्या वाढत्या वजनामुळे पोटावरची त्वचा ताणली जाते त्यामुळे पोटाशिवाय इतर ठिकाणी सुद्धा असे Strech marks निर्माण होतात.
ह्याशिवाय aldosterone नावाचे हार्मोन चे प्रमाण गर्भिणी अवस्थेत वाढते त्यामुळे हे त्वचेवर बदल घडून येतात असे आधुनिक शास्त्राचे मत आहे. त्यावर बदाम तेल लावावे असे सांगितले आहे.
आयुर्वेदात ह्याला किक्किस म्हटले आहे व त्यासाठी उत्तम उपचार सांगितले आहेत.
- गर्भामुळे उत्पीडित वात, पित्त व कफ हे दोष हृदयात जाऊन तेथून संपूर्ण शरिरात पसरुन किक्किस निर्माण करतात
- त्या ठिकाणी खाज येणे हे प्रमुख लक्षण सांगितले आहे
- खाज येत असल्यास चंदन, खस एकत्र वाटून त्याचा लेप लावावा
- किक्किस वाढू नयेत म्हणून कण्हेर च्या पानांने सिद्ध तेल हळूवारपणे त्वचेवर जिरवावे.
- त्यानंतर पटोल, निंब, मंजिष्ठा, तुलसी ह्या पानांचे चूर्णे हलक्या हाताने त्वचेवर चोळावे
- दारुहरिद्रा व जेष्ठमधाचा थंड काढा अवयवांवर शिंपडावा.
- शतावरी, जेष्ठमध अशा औषधींनी सिद्ध लोणी किंवा औषधीयुक्त लोणी बोराच्या काढ्यात मिसळून आवश्यकतेनुसार प्यायला द्यावा.
- किक्किस ला खाज आली तरी खाजवून नये. खाजवल्याने त्वचा खराब होऊ शकते
- आहारात मधुर रसप्रधान पदार्थ जसे दूध, लोणी, भात, खजुर, अंजिरी, नारळ, बदाम अशा पदार्थांचा समावेश असावा. आहार पचायला हलका असावा कमी, तेल व कमी मीठ असलेला असावा.
- पाणी आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणात प्यावे.
Ref च. सं. शा 8/32,अ.हृ.शा1/58-62
टीप:- वरील सर्व उपाय शास्त्रीय असले तरी आयुर्वेदिक तज्ञाकडून करुन घ्यावे.स्वतः उपाय करु नये.
तसेच strech marks निर्माण होऊ नये म्हणून गर्भधारणा होण्यापूर्वी च पंचकर्म करुन घ्यावे
No comments:
Post a Comment