Sunday, 19 August 2018

आयुर्वेद शास्त्रानुसार भोजनाचे नियम

आयुर्वेद शास्त्रानुसार भोजनाचे नियम:- अ.हृ.८/३३-३८

1) वेळेत जेवावे. निरोगी मनुष्याने
 जेवण साधारणतः दिवसातून दोन वेळा करावे.सकाळी भूक लागल्यावर साधारणतः 9-11च्या दरम्यान व सायंकाळी सूर्यास्ताच्या आत जेवण करावे.
2) जेवण मनाला अनुकूल असावे.
3) अन्न ताजे,पवित्र असावे.
4) शरिराला हितकारक असावे.
5) स्निग्ध,उष्ण, पचायला हलके असावे.
6) भोजनात सहाही प्रकारच्या चवी असाव्यात.सहा चवी म्हणजे गोड,आंबट,खारट,कडु,तिखट,तुरट.
इतर चवींपेक्षा गोड चवींच्या पदार्थांचा अधिक समावेश करावा.
7) फार लवकर लवकर किंवा अतिशय संथपणे जेवण करु नये.
8) आंघोळ झाल्यावर भूक लागली की जेवावे.
9) हात,पाय स्वच्छ धुऊन एकान्तस्थानी शांतपणे जेवावे.
10) स्वतः जेवण करण्यापूर्वी आपल्यावर अवलंबून असणारे घरातील व्यक्ति, घरातील पाळीव प्राणी व पक्षी ह्यांना भोजन देऊन तृप्त करावे.
11) देवता,अतिथी,वडिलधारी,बालक,गुरुजन ह्यांना भोजन देऊन,मग स्वतः अन्न ग्रहण करावे.
12) आपले आरोग्य व प्रकृतिचा विचार करुन त्यानुसार खाद्यपदार्थ निवडावे.
13) भोजनाची निंदा न करता,न बोलता प्रसन्न चित्ताने जेवण करावे.
14) भोजनात द्रवपदार्थांचे आधिक्य असावे.
15)  भोजन नेहमी मनोनुकुल,प्रियजनांच्या सोबत घ्यावे.
16) प्रिय,दयाभाव असणाऱ्या व निर्मळ,स्वच्छ असणाऱ्या व्यक्तिकडुन बनवलेले भोजन ग्रहण करावे.
17) पथ्यकर व अपथ्यकर पदार्थ एकत्र करून खाऊ नये.
18) आधी खाल्लेले अन्नाचे पचन झाल्यावरच जेवण करावे.
19) अवेळी जेवण करु नये.जेवणाच्या वेळा ठरवून टाकाव्या.
20) खुप कमी  किंवा अधिक प्रमाणात भोजन करु नये.पचेल एवढे व पोटाचे 3भाग आहेत असे गृहीत धरून 2/3भाग जेवावे व 1/3शिल्लक ठेवावा.तडस जाईल एवढे जेऊ नये.

*अशा आयुर्वेदिक पद्धतीने
जेवण केल्यास रोगांपासून संरक्षण मिळते******

स्तन्यशोधक कषाय

स्तन्यशोधक कषाय

स्तन्य=दुध 

1) हे आयुर्वेदिक औषध दुधाची शुद्धी करत असल्यामुळे हयाला स्तन्यशोधक कषाय असे म्हणतात.
2) हे आयुर्वेदातील काढा प्रकारातील औषध आहे. बाळाला दुध पाजणाऱ्या आईचे दुधात दोष उत्पन्न होऊ नये व उत्पन्न झाले असल्यास ते दोष दूर करण्यासाठी फार उपयोगी आहे.
3) आयुर्वेद शास्त्राच्या मते आईच्या अंगावर दुध पिणारे बाळ सारखे आजारी पडत असल्यास दुध दुषित असणे हे एक कारण असते.कधी कधी दुधाची प्रत चांगली नसल्याने बाळ चांगले बाळसे देखील धरत नाही.
4) ह्या आयुर्वेदिक औषधाने दुधातील दूषित वात, पित्त, कफाची शुद्धी होते.
5 )ह्या औषधात पाठा, देवदार, चिरायता, मोरवेल, कुटकी, सारीवा, गुळवेल, सुंठ, नागरमोथा, तगर, इंद्रयव, ही रस, रक्त शुद्ध करणारी औषधी वनस्पती आहेत .

हया औषधाचा उपयोग :-
1) बाळाचे पोट साफ न होणे
2) वारंवार सर्दी, खोकला, ताप येणे
3) बाळाच्या त्वचेवर पुरळ, चट्टे उठणे
4) बाळ सारखे किरकिर करणे
5) बाळाचे वजन न वाढणे
6) आईला स्तन जड वाटणे, दुखणे, कणकण वाटणेह्या तक्रारींसाठी होतो.

-वरील तक्रारी असतील तर आईला हे औषध 10ml दिवसातून 2वेळा पाणी घालून, जेवणानंतर घ्यावे.
-हे औषध वरिल पद्धतीने साधारणतः दीड ते दोन महिने घ्यावे.

****हे औषध बाळाला देऊ नये*****

Saturday, 28 July 2018

रजोनिवृत्ती नंतरचा रक्तस्त्राव

रजोनिवृत्तिनंतरचा रक्तस्त्राव:-
  साधारणतः 45-50 वर्षे  हया वयात पाळी चे येणे पुर्णपणे थांबते.पाळी एक वर्ष पर्यंत आली नाही तर रजोनिवृत्ती (menopause) आहे असे समजावे.
****त्यानंतर मात्र अंगावर जाऊ लागले तर लगेच डॉक्टरांकडे दाखवावे.लपवू नये ,तसेच घरगुती उपाय करु .
रजोनिवृत्ती नंतर अंगावर लाल जाण्याची कारणे:-
1)Polyps/ग्रंथी: -गर्भाशयात , गर्भाशयाच्या मुखाशी  मृदु कोंबासारखी वाढ दिसून येते. 
हयामुळे कधी थेंब थेंब तर कधी भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होतो . मुख्यतः स्पर्श झाल्यास अधिक प्रमाणात होतो.
2)पाळी गेल्यावर  गर्भाशयाच्या संबंधीत हार्मोन्सची मात्रेत बदल होतो . गर्भाशयाच्या आतील थर जाड झाल्यामुळे  कधीकधी रक्तस्त्राव होतो.कधीकधी आतील थराच्या रचनेत विकृत बदल होऊन कॅन्सर ची शक्यता असते .
3)कधी कधी पाळी गेल्यावर गर्भाशयाच्या आतील थराचे पोषण होत नाही,ते खूपच पातळ होते, त्यामुळे सुद्धा रक्तस्त्राव होतो
3)पाळीच्या मार्गाचे (vagina)पोषण स्त्रीविशिष्ट हार्मोन्स ने होत असते.मेनोपॉज मुळे हा मार्ग रुक्ष होतो.तेथील त्वचा पातळ (Thin) होते त्यामुळे जंतुसंसर्गाने,स्पर्शाने, आघाताने रक्तस्त्राव होतो.
4)औषधी  -रक्त पातळकरणाऱ्या औषधीं, हार्मोन्स,टॅमोक्सिफेन,

*****रक्तस्त्राव कशामुळे होतो हे शोधण्यासाठी सोनोग्राफी, गर्भाशयाचा आतील स्तराची दुर्बिणीतून तसेच मायक्रोस्कोपखाली तपासणी करणे.याद्वारे रक्तस्त्रावाचे कारण समजते*****

***उपचार-आधुनीक शास्त्रानुसार***
 रक्तस्त्राव होण्याला जे कारण असेल त्याप्रमाणे उपचार केले जातात.जसे
-गर्भाशयाचा आतला थर जाड झाला असेल , ग्रंथी/polyps असतिल  तर  तो खरडून काढुन हार्मोन्स च्या गोळ्या देतात.तसेच रक्त स्त्राव थांबायचे औषध देतात.
-गर्भाशय आतिल अस्तर, (endometrium) पाळीच्यामार्गाची त्वचा  पातळ झाली असेल तर हार्मोन्स च्या गोळ्या देतात . जंतुसंसर्ग असल्यास तशी औषध देतात
-कॅन्सर असल्यास शस्त्र क्रिया, केमोथेरपी,रेडियेशन आवश्यकता असेल त्याप्रमाणे केले जाते.

आयुर्वेदिक उपचार:-
1) जंतुसंसर्ग असल्यास आयुर्वेदिक औषधी पोटातून घेणे तसेच बाहरुन लावणे
2) योनीधावन,धुपन
3) अवगाह,निरुह व उत्तरबस्ति
4) औषधी पिचू (Tampon )
5) कॅन्सर असल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया

“वारंवार मुत्रप्रवृत्ति”

“वारंवार मुत्रप्रवृत्ति”

-साधारणत: सर्वांना 2लिटर पाणी पिल्यावर सरासरी 24 तासात 6-7वेळा मुत्रप्रवृत्तिसाठी जावे लागते.
-खरेतर व्यक्तिपरत्वे पाणी पिण्याचे प्रमाण कमी जास्त असते, त्यामुळे मुत्रप्रवृत्ति कमी-अधिक प्रमाणात होते.
-परंतु एखाद्या  व्यक्तित मुत्रप्रवृत्ती वाढुन  दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो असेल ,रात्री झोपेतुन उठून जावे लागत असेल ,तर ते शरिरातील बिघाड झाल्याचे दर्शवते.
**लहान मुलांच्या मुत्राशयाचा आकार छोटा असल्याने ,तसेच मुत्राशयाच्या मांसपेशी कमजोर असल्याने वारंवार मुत्रप्रवृत्ति होते,ती त्यांच्या साठी  स्वाभाविक आहे,तो आजार नव्हे.

****वारंवार मुत्रप्रवृत्ति ची कारणे*****
1) प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे, म्हणजेच तहान लागली नसतांनाही पाणी पिणे
2) चहा,कॉफी,कॅफिनयुक्त द्रवपदार्थांचे अधिक सेवन करणे 
3) अल्कोहलयुक्त पेय
4) मधुमेह,किडनिचे आजार,मुत्राशयाचे आजार
5) मुत्रवह संस्थानात जंतूसंसर्ग होणे
6) गर्भिणी अवस्था
7) चिंता,भीती
8) योनीमार्गात जंतुसंसर्ग
9) मुत्राशयाच्या पेशीं ची संवेदनशीलता वाढणे
10) मुत्रमार्ग अरुंद होते
11) मुत्राशयाजवळ किंवा मुत्राशयात अर्बुद/गाठी निर्माण होणे
12) मुत्राशयाचा कॅन्सर
13) मेंदूचे आजार 
14) मुत्र बाहेर काढून टाकणाऱ्या औषधी घेणे
15) पचनसंस्थान चे आजार
इत्यादी  कारणांमुळे वारंवार मुत्रप्रवृत्ती होते

***उपाय/उपचार***
1)वारंवार मुत्रप्रवृत्ति असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करावी
2) लॅबमध्ये urine test, blood sonography तपासणी ने वारंवार मुत्रप्रवृत्ति चे कारण शोधले जाते.जे कारण असेल त्याप्रमाणे औषध दिल्या जाते.

***वारंवार मुत्रप्रवृत्ति होऊ नये म्हणून उपाय****
1) संतुलित आहार घ्यावा
2) तहान लागली तरच पाणी प्यावे
3) दिनचर्या चांगली ठेवावी
4) व्यसनाधीनता नसावी
5) अति प्रमाणात गोड खाऊ नये
6) रोजच्या रोज पोट साफ होईल याकडे लक्ष द्यावे
7) नियमित सूर्यनमस्कार करावा
8) वारंवार मुत्रप्रवृत्ति बरोबर मुत्रप्रवृत्तिच्यावेळी जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वाताचे आजार (Diseases due to imbalance in Vata)

वाताचे आजार
1-आपल्या शरिरातील सर्व क्रिया वात,पित्त व कफ यांच्यामुळे घडतात
2-वात हा क्रियाशील आहे.पित्त व कफाच्या क्रिया वातावर अवलंबून आहेत.
3-शरिररुपी मशिन वात चालवतो.मनाचे,ज्ञानेंद्रिय,कर्मेन्द्रियांचे कार्य वातामुळेच घडून येतात. 
4-परंतु वात बिघडला कि शरिराचे सर्व तंत्रच बिघडते व निरनिराळे आजार निर्माण होतात.

*******वात बिघडण्याची कारणे:-
1) थंड,रुक्ष,सूकलेले पदार्थ खाणे
2) कडु, तिखट,तुरट पदार्थ अधिक खाणे.ठेचा,खर्डा खाणे

3) कमीखाणे, वारंवार उपवास करणे
4) नेहमीच रात्री जागरण करणे
5) चिंता,शोक, भीती वाटणे
6) खुप धावपळ, अतिप्रमाणात व्यायाम करणे
7)  पंचकर्माचा अतिरेक करणे 
8) खूप प्रमाणात वाहन चालवणे, ,वाहनांवरुन पडणे , रक्तस्त्राव होणे
9) नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या वेगांना अडवणे/धरुन ठेवणे. जसे शिंका,मुत्र 

10) न पचू शकणारे पदार्थ रक्तात मिसळले जाणे
11) मर्माघात होणे
12) ढगाळ व पावसाळ्यातील वातावरण

*विकृतपणे वाढलेला वात ज्याठिकाणी रिकामी जागा आहे तेथे जाऊन निरनिराळी लक्षणे/विकार/व्याधी निर्माण करतो.
लक्षणे
1)हातपाय,इतर सांधे दुखणे,आखडणे.सांध्यांचा घासण्याचा आवाज येणे.
2) रोमांच उभे राहणे
3) डोकं भणभणने,जड पडणे
4)बडबड वाढणे
5)लंगडत चालणे,हातापायाला मुंग्या येणे,सुज येणे 
6) पायाला गोळे येणे, हातापायांची आग होणे,
7)पाय,कंबर,पाठ,मान आखडपणे,दुखणे
8) पायांच्या शिरा ओढल्याप्रमाणे दुखणे.गृध्रसी/sciatica
9)अंगात ताकद नसल्यासारखे वाटणे
10) पक्षाघात(paralysis)
11) पाळीच्या तक्रारी, वारंवार गर्भपात,गर्भाची वाढ खुंटणे,गर्भ न राहणे, योग्य वयाच्या  आधीच मेनोपॉझ येणे
12)हिस्टेरीया/योषापस्मार
13) पोटात वात धरल्यासारखे वाटते
अशी अनेक लक्षणे निर्माण होतात.
 संपूर्ण शरीरात अव्यहातपणे वाहणाऱ्या वायुचा  मार्ग कधीकधी शरिरातील घनरुप व द्रवरुप घटकांमुळे अडतो.जसे कफ, पित्त, रक्त,मांस,मेद,अस्थि,मज्जा,शुक्र,मल,मुत्र,उदक,लसिका इत्यादी.अशावेळी वातासोबत जो शरीरघटक असेल व ज्याठिकाणी असेल ती लक्षणे निर्माण होतात.

****उपचार/उपाय****
1)उष्ण,स्निग्ध ,गोड,आंबट,सैंधव मीठ युक्त पदार्थ खावे
2)मांस सूप, उडीदडाळीचे वडे,कढण तूप घालून प्यावे
3)अश्वगंधा घृत घ्यावे
4) बलातेल,महानारायण तेल,प्रसारणीतेल, इत्यादी ने  मालिश करावी,शेक घ्यावा
5) दशमुळ ,बला मुळ दुधात शिजवून प्यावे
6)तेलाचे बस्ति घ्यावे(enema with oil)
7)पोटात वात असल्यास नाभीला एरंडेल लावावे.हिंग्वाष्टक चुर्ण जेवताना घ्यावे
8)पोट रोज साफ राहिल असे बघावे
9) पावसाळ्यात उकळून कोमट पाणी प्यावे
10) पावसापासून व थंडी पासून शरिराचे रक्षण करावे.

पित्ताचे आजार (Imbalance of Pitta and it's diseases)

पित्ताचे आजार:-

प्राकृत(normal) पित्ताचे कार्य पचनक्रिया करणे आहे.शरिरातील उष्णता पित्तामुळे च असते.अन्नाचे पचन, त्वचेचा प्रभा, शौर्य बुद्धी,उर्जा , प्रसन्नता, दृष्टी,क्रोध,मोह,हर्ष,सुख,दु:ख, इच्छा,द्वेष हे सर्व पित्तावर अवलंबून असतात.
पित्त बिघडले कि वरिल कार्य बिघडतात.जसे पचनाच्या तक्रारी,स्वभावात बदल, दृष्टी दोष, नैराश्य,उत्साह न वाटणे, चेहऱ्यावर वांग येणे,विचारांची गुंतागुंत वाढते, निर्णय न घेता येणे, बुद्धीचा तल्लखपणा कमी होणे इत्यादी.

पित्त बिघडण्याची कारणे:-
1)तिखट, आंबट, खारट, उष्ण, जळजळ निर्माण करणारे व तीक्ष्ण पदार्थ खाणे
2)मद्य का सेवन
3) क्रोध, ताप, अग्नि, भय, श्रम करणे 
4)विषम भोजन करणे म्हणजे जेवणाचे नियम आयुर्वेदात सांगितले आहेत ते न पाळणे
 4)उन्हात/उष्णते जवळ बराच वेळ काम करणे
पित्ताच्या आजाराची लक्षणे:-
1गरम वाटणे,आग होणे,उकळल्यासारखे,अंगातून वाफा निघणे ,शरिरात आतून दाह होणे, खूप घाम येणे,वास येणे
2)आंबट ढेकर येणे,छातीत जळजळ होणे, खुप तहान लागणे
3)रक्त मांस चिकट होणे
4)त्वचेला खाज येणे,भेगा पडणे,
5)नाक,गुद,गर्भमार्ग ,मुख इत्यादी बाह्य मार्गाद्वारे रक्त पडणे
6)शरिरावर गांधी उठणे,त्वचेचा वर्ण बदलणे
7) शरिरावर व आतील मार्गात फोड,पुरळ येणे
8) डोळ्यापुढे अंधारी येणे इत्यादी

उपचार/उपाय
1)गोड,कडु,तुरटी,थंड अश्या औषधींचा वापर केला जातो.जसे अडुळसा,निंब, गुळवेल, शतावरी, नागरमोथा,चंदन,भोपळा, जेष्ठमध
2) थंड गुणांच्या तेलाने चोळणे ,जसे चंदनादीतेल, चंदन बलालाक्षादीतेल
3)कामदुधा,सूतशेखर,चंदनासव,भूनिम्बादी काढा,महासुदर्शन काढा 
3) विरेचन ह्या पंचकर्माने मुळातून विकृत पित्त बाहेर काढून टाकले जाते त्यामुळे लवकर फायदा होतो व आजार मुळातून जातो

वजन वाढु नये म्हणून

वजन कमी करण्यासाठी -
1)भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये
2) तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये
3) आहारात साखर,मैदा,चीज,बटर ,तळलेले पदार्थ खाऊ नये
4)दिवसा झोपू नये
5)रोज नियमीतपणे सोसेल एवढा व्यायाम/सुर्यनमस्कार  करावा
6)रोज नियमीतपणे मलमुत्रप्रवृत्ति होईल याकडे लक्ष द्यावे
7) मनःस्वास्थ्यासाठी योग,प्राणायाम करावा

औषध:-
1)हिरडा चुर्ण मधातून  
2) त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात 
3) औषधी युक्त सूप
4)आमपाचक वटी
5)मेदोहर गुग्गुळ,कांचनार गुग्गुळ,
 6)उद्वर्तन- औषधी चुर्ण संपुर्ण शरिरावर चोळणे 
7) पंचकर्म,वमन,लेखन बस्ति 
******डॉ. च्या सल्ल्या ने घ्यावे******

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...