आयुर्वेद शास्त्रानुसार भोजनाचे नियम:- अ.हृ.८/३३-३८
1) वेळेत जेवावे. निरोगी मनुष्याने
जेवण साधारणतः दिवसातून दोन वेळा करावे.सकाळी भूक लागल्यावर साधारणतः 9-11च्या दरम्यान व सायंकाळी सूर्यास्ताच्या आत जेवण करावे.
2) जेवण मनाला अनुकूल असावे.
3) अन्न ताजे,पवित्र असावे.
4) शरिराला हितकारक असावे.
5) स्निग्ध,उष्ण, पचायला हलके असावे.
6) भोजनात सहाही प्रकारच्या चवी असाव्यात.सहा चवी म्हणजे गोड,आंबट,खारट,कडु,तिखट,तुरट.
इतर चवींपेक्षा गोड चवींच्या पदार्थांचा अधिक समावेश करावा.
7) फार लवकर लवकर किंवा अतिशय संथपणे जेवण करु नये.
8) आंघोळ झाल्यावर भूक लागली की जेवावे.
9) हात,पाय स्वच्छ धुऊन एकान्तस्थानी शांतपणे जेवावे.
10) स्वतः जेवण करण्यापूर्वी आपल्यावर अवलंबून असणारे घरातील व्यक्ति, घरातील पाळीव प्राणी व पक्षी ह्यांना भोजन देऊन तृप्त करावे.
11) देवता,अतिथी,वडिलधारी,बालक,गुरुजन ह्यांना भोजन देऊन,मग स्वतः अन्न ग्रहण करावे.
12) आपले आरोग्य व प्रकृतिचा विचार करुन त्यानुसार खाद्यपदार्थ निवडावे.
13) भोजनाची निंदा न करता,न बोलता प्रसन्न चित्ताने जेवण करावे.
14) भोजनात द्रवपदार्थांचे आधिक्य असावे.
15) भोजन नेहमी मनोनुकुल,प्रियजनांच्या सोबत घ्यावे.
16) प्रिय,दयाभाव असणाऱ्या व निर्मळ,स्वच्छ असणाऱ्या व्यक्तिकडुन बनवलेले भोजन ग्रहण करावे.
17) पथ्यकर व अपथ्यकर पदार्थ एकत्र करून खाऊ नये.
18) आधी खाल्लेले अन्नाचे पचन झाल्यावरच जेवण करावे.
19) अवेळी जेवण करु नये.जेवणाच्या वेळा ठरवून टाकाव्या.
20) खुप कमी किंवा अधिक प्रमाणात भोजन करु नये.पचेल एवढे व पोटाचे 3भाग आहेत असे गृहीत धरून 2/3भाग जेवावे व 1/3शिल्लक ठेवावा.तडस जाईल एवढे जेऊ नये.
*अशा आयुर्वेदिक पद्धतीने
जेवण केल्यास रोगांपासून संरक्षण मिळते******
No comments:
Post a Comment