Tuesday, 28 December 2021

सूतिका अवस्थेतील मानसिक अस्वास्थ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार (puerperal blues and depression)

1) आयुर्वेदानुसार प्रसूति झाल्यावर वात वाढतो. तसेच आराम मिळाला नाही, झोप नीट झाली नाही, मदतीला कुणी मनासारखे नसेल तर पित्त सुद्धा वाढते. 

2) वात व पित्त दोन्ही वाढल्याने चिडचिड होणे, झोप न येणे, उदासपणा, विनाकारण चिंता वाटणे, अंगावरचे दूध कमी होणे अशा तक्रारी निर्माण होतात. 

3) वात पित्त अशा शरीर प्रकृती चे प्रकार असतात त्याचप्रमाणे मनाच्या सुद्धा सात्विक, राजसी, तामसी अशा प्रकृती असतात. तामसी प्रकृतीच्या स्त्रियांमध्ये मानसिक अस्वास्थ निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असते

4) अस्वास्थ निर्माण होऊ नये म्हणून सूतिका परीचर्या(do and don't during puerperium) चे पालन करावे 

5) भरपूर विश्रांती घ्यावी.पौष्टीक आहार घ्यावा. मालिश साठी बला तेल /लाक्षादी तेल/धान्वंतरम तेल वापरावे. ह्यामुळे वात कमी होते,मानसिक व शारीरिक थकवा कमी होतो. 

6) सूतिकेने पाणी नेहमीच गरम वापरावे. आमटीमध्ये शुंठी,  मिरे वापरावे. आहारात रोज 15ते 20ml तूप असावे. 

7) जागरण करु नये. मोबाईल, टी. व्ही, लॅपटॉप असे डोळ्यांना त्रास देणाऱ्या गोष्टींपासून दूर असलेले बरे. कानाला त्रास होईल अशा आवाजापासून दुर रहावे.

8) शांततामय वातावरणात रहावे 

9) रोज  माथ्याला, तळपायाला तेल लावावे. कानात कापसाचे बोळे ठेवावे म्हणजे वातापासून संरक्षण मिळते. 

10) गरजेनुसार दशमुलारीष्ट, बाळंतकाढा, प्रतापलंकेश्वर, अश्वगंधा, जटामांसी, शतावरी, धमासा, वातकुलांतक रस अशा औषधाने मनस्वास्थ उत्तम ठेवता येते. 


Vd Pratibha Bhave 

BAMS. MD, Ayu

Obstetrics and gynecology

स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी वनस्पती मंजिष्ठा (Rubia cardifolia)

1) मंजिष्ठा ही वात पित्त व कफ ह्या तिघांना समस्थितीमध्ये ठेवणारी  औषधी वनस्पती आहे. 

2) रक्तातील चिकटपणा नष्ट करुन रक्तवाहिन्यांमधिल गाठी वितळवून मार्ग मोकळा करते. रक्त शुद्ध करणारे आहे

(#detoxification).

त्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो.  त्वचेच्या निरनिराळ्या आजारात (#skin diseases) उपयोगी आहे. मुरुम, वांग, तसेच कांती सुधारण्यासाठी मंजिष्ठा चुर्ण लोण्यात मिसळून लेप करतात तसेच मंजिष्ठा व सारीवा काढा पिण्यासाठी देतात. 

3) गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला सूज येणे, विकृत होणे(#endometrial hyperplasia, #adenomyosis),  पाळीच्या वेळी पोटात दुखणे(#dysmenorrhea), ह्यासाठी मंजिष्ठा चा चांगला उपयोग होतो. 

4) गर्भाशयात रक्तवाहिन्या संकुचित असल्यामुळे गर्भवाढ नीट होत नसेल तर गुळवेल व मंजिष्ठा एकत्र काढयाने फायदा होतो. 

5) गर्भाशयाला, गर्भाशय मुखाला(#uterus, #cervix) सूज येऊन अंगावर पांढरे अधिक प्रमाणात जात असेल (leucorrhoea), तर मंजिष्ठा काढा चंद्रप्रभा वटी सोबत दिल्याने गुण येतो. 

6) Leucorrhoea हा pathological असो किंवा physiological असो, दोन्ही अवस्थेत मंजिष्ठा उपयोगी आहे. 


Vd Pratibha Bhave 

BAMS, MD Ayu

Obstetrics and gynecology

शिरोधारा



1) ह्या थेरपीमध्ये आयुर्वेदिक औषधांची कोमट धार कपाळावर साधारणपणे 30ते 60मिनीटे सोडल्या जाते. 

2) ही धार कपाळावर पडतांना कंपने निर्माण होतात(vibrations) 

3) ह्या कंपनांमुळे Electromagnetic waves निर्माण होतात. ह्या waves मेंदुतील cerebral cortex व hypothalamus पर्यंत पोहचतात. त्याचा परीणाम मेंदु व त्याच्याशी निगडीत केंद्रीय नाडी प्रणाली वर होतो.

 4) ताणतणावामुळे निर्माण होणारे मानसिक व शारीरिक आजार, ब्लडप्रेशर वाढणे, झोप न येणे, हार्मोनस् असंतुलन, हृदयात धडधडणे ह्या आजारात शिरोधारा करायला हवी. 

5) IIT team from the Department of Applied Mechanics and Department of Engineering Design. 

येथे 5डिसेंबर 2021ला प्रयोगशाळेत सुद्धा शिरोधारा मेंदुशी निगडित आजारात उपयोगी आहे हे सिद्ध झाले आहे.


Vd Pratibha Bhave 

BAMS MD 

Prasutitantra Streeroga

8766740253

बकुल (Mimusops elengi)



1) ह्या झाडाला मधुगन्ध, सिंहकेसरक असेही म्हणतात. 

2) ह्याची फुले, फळे, बिया, साल ह्या सर्वांचा औषधासाठी उपयोग होतो

3) दात हलत असतिल तर सालीच्या चुर्णाने दात घासावे तसेच सालीच्या काढ्याने #गंडुष #कवल करावे. 

4) सालीचा काढा तुरट असल्यामुळे पित्त कफ कमी करणारे पण वात वाढवणारे आहे. तसेच मलप्रवृत्ति व मुत्रप्रवृत्ति कमी करणारे आहे 

5) दिवसातून अनेकवेळा मलप्रवृत्ति होण्याची जुनाट सवय असेल तर  बकुळीच्या सालीचा काढा मधातून दिल्या जातो. 

6) मलप्रवृत्ति मधून रक्त येत असेल, रक्तातीसार असेल  तर ह्याची पिकलेली फळे खाल्ली तर उपयोग होतो. 

7) मधुमेही रुग्णांनी आवर्जून पिकलेली फळे खावी. वारंवार होणारी मुत्रप्रवृत्ति सुद्धा ह्याने कमी होते

9) पित्त वाढल्याने, उन्हाळ्यात उष्णतेने जीव व्याकुळ झाला असेल, तहान लागली असेल तेव्हा बकुळीची फुले उकळत्या पाण्यात टाकून झाकून ठेवावी. गार झाल्यावर मध व साखर घालून प्यावी. 

10) फुले मिळतिल तेव्हा साखरेच्या पाकात शिजवून ठेवावी. खोकल्यात उपयोग होतो. 

11) बकुळीच्या बीयांच्या आतील मगज मुत्राचे प्रमाण वाढवणारे आहे. उन्हाळी लागली असेल, Burning micturition, cystitis मध्ये उपयोग होतो.


Ref: वैद्य गो. आ. फडके

टीप : स्वतः च्या मनाने प्रयोग करु नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रकृति, आजार इत्यादीं चा विचार करुन योग्य प्रमाणात औषध घेणे महत्त्वाचे असते. 

-हे चुर्ण आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते. 

-आपल्या परीसरात प्रत्येकाने किमान 10 औषधी वनस्पती लावायला हवीत असा  प्रत्येकाने निर्धार करायला हवा असे वाटते. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD 

Prasutitantra Streeroga 

8766740253

हिवाळ्यात लघवीच्या तक्रारी (cystitis)

1) हिवाळ्यात  थंड व कोरडे वातावरण असते

2) तहान लागत नाही त्यामुळे पाणी कमी पिल्या जाते

3) थंडीमुळे घाम येत नाही व त्यामुळे मुत्रप्रवृत्ती वाढते. 

4) मुत्र अधिक निर्माण होत असल्यामुळे वारंवार लघविला जावे लागते. 

4) पाणी  पिणे कमी असेल व थंडी आहे म्हणून चहा कॉफी अधिक घेतली तर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते(dehydration) व लघवी गडद रंगाची  होते. व आग होते.

5) मुत्रप्रवृत्ती केली नाही तर जंतूसंसर्ग होतो. 


वरील तक्रारी निर्माण होऊ नये म्हणून निरोगी व्यक्तिने पुढिलप्रमाणे वागावे. 

***********

1) हिवाळ्यात वातावरण थंड व कोरडे असते म्हणून गरम व स्निग्ध

 (जसे दूध, तूप, खीर, डिंकलाडू, बासुंदी इ. ) असे पदार्थ घ्यावे. 

2) बाहेर पडतांना गरम कपडे घालावे. कान, छाती, डोके व मान गार पडणार नाही ह्याची विशेष काळजी घ्यावी. 

3) सकाळी ब्रश केल्यावर व संध्याकाळी जेवणाआधी 1तास, 1 ग्लास कोमट पाण्यात 15ml साजूक तूप टाकून प्यावे. 

4) रोज म्हशीचे कींवा देशी गायीचे दूध प्यावे. 

5) ऋतु नुसार मिळणारी फळे खावी. भरपुर पाणी प्यावे. ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवावी. भरपूर मुत्रप्रवृत्ती झाली म्हणजे  जंतू बाहेर पडून जातात व लघवीच्या तक्रारी निर्माण होत नाही.


Vd Pratibha Bhave 

BAMS, MD Ayu 

(obstetrics and gynaecology) 

8766740253

Importance of Suvarna Prashan Drops

1) It gives rejuvenating effects and tone ups the skin. 

2) It improves immunity in a way so that the child is prevented from bacterial and viral infections. 

3) Regular use of suvarnaprashana helps in such a way that, child gets the best immunity to defeat diseases.

लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक विदर्भातील गोड पदार्थ - गुंजे

 हिवाळ्यात नविन तांदुळा च्या  पिठाची उकड करुन त्याची पाती करुन त्यात कुटलेलेतीळ, गुळ,विलायची खोबरे हे सारण भरुन करंज्यांचा आकार देतात . हया #करंज्या उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घेतात.या  तयार झालेल्या पदार्थाला गुंजे म्हणतात.

गरम गुंजे साजूक तूपात बुडवून खातात.

*गुंजे, लहान मुलांसाठी थंडीत अतिशय पदार्थ पौष्टिक आहे. 


Vd Pratibha Bhave

BAMS MD

Prasutitantra Streeroga

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...