Tuesday, 28 December 2021

हिवाळ्यात लघवीच्या तक्रारी (cystitis)

1) हिवाळ्यात  थंड व कोरडे वातावरण असते

2) तहान लागत नाही त्यामुळे पाणी कमी पिल्या जाते

3) थंडीमुळे घाम येत नाही व त्यामुळे मुत्रप्रवृत्ती वाढते. 

4) मुत्र अधिक निर्माण होत असल्यामुळे वारंवार लघविला जावे लागते. 

4) पाणी  पिणे कमी असेल व थंडी आहे म्हणून चहा कॉफी अधिक घेतली तर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते(dehydration) व लघवी गडद रंगाची  होते. व आग होते.

5) मुत्रप्रवृत्ती केली नाही तर जंतूसंसर्ग होतो. 


वरील तक्रारी निर्माण होऊ नये म्हणून निरोगी व्यक्तिने पुढिलप्रमाणे वागावे. 

***********

1) हिवाळ्यात वातावरण थंड व कोरडे असते म्हणून गरम व स्निग्ध

 (जसे दूध, तूप, खीर, डिंकलाडू, बासुंदी इ. ) असे पदार्थ घ्यावे. 

2) बाहेर पडतांना गरम कपडे घालावे. कान, छाती, डोके व मान गार पडणार नाही ह्याची विशेष काळजी घ्यावी. 

3) सकाळी ब्रश केल्यावर व संध्याकाळी जेवणाआधी 1तास, 1 ग्लास कोमट पाण्यात 15ml साजूक तूप टाकून प्यावे. 

4) रोज म्हशीचे कींवा देशी गायीचे दूध प्यावे. 

5) ऋतु नुसार मिळणारी फळे खावी. भरपुर पाणी प्यावे. ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवावी. भरपूर मुत्रप्रवृत्ती झाली म्हणजे  जंतू बाहेर पडून जातात व लघवीच्या तक्रारी निर्माण होत नाही.


Vd Pratibha Bhave 

BAMS, MD Ayu 

(obstetrics and gynaecology) 

8766740253

No comments:

Post a Comment

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...