Tuesday, 28 December 2021

स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी वनस्पती मंजिष्ठा (Rubia cardifolia)

1) मंजिष्ठा ही वात पित्त व कफ ह्या तिघांना समस्थितीमध्ये ठेवणारी  औषधी वनस्पती आहे. 

2) रक्तातील चिकटपणा नष्ट करुन रक्तवाहिन्यांमधिल गाठी वितळवून मार्ग मोकळा करते. रक्त शुद्ध करणारे आहे

(#detoxification).

त्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो.  त्वचेच्या निरनिराळ्या आजारात (#skin diseases) उपयोगी आहे. मुरुम, वांग, तसेच कांती सुधारण्यासाठी मंजिष्ठा चुर्ण लोण्यात मिसळून लेप करतात तसेच मंजिष्ठा व सारीवा काढा पिण्यासाठी देतात. 

3) गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला सूज येणे, विकृत होणे(#endometrial hyperplasia, #adenomyosis),  पाळीच्या वेळी पोटात दुखणे(#dysmenorrhea), ह्यासाठी मंजिष्ठा चा चांगला उपयोग होतो. 

4) गर्भाशयात रक्तवाहिन्या संकुचित असल्यामुळे गर्भवाढ नीट होत नसेल तर गुळवेल व मंजिष्ठा एकत्र काढयाने फायदा होतो. 

5) गर्भाशयाला, गर्भाशय मुखाला(#uterus, #cervix) सूज येऊन अंगावर पांढरे अधिक प्रमाणात जात असेल (leucorrhoea), तर मंजिष्ठा काढा चंद्रप्रभा वटी सोबत दिल्याने गुण येतो. 

6) Leucorrhoea हा pathological असो किंवा physiological असो, दोन्ही अवस्थेत मंजिष्ठा उपयोगी आहे. 


Vd Pratibha Bhave 

BAMS, MD Ayu

Obstetrics and gynecology

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...