Tuesday, 28 December 2021

सूतिका अवस्थेतील मानसिक अस्वास्थ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार (puerperal blues and depression)

1) आयुर्वेदानुसार प्रसूति झाल्यावर वात वाढतो. तसेच आराम मिळाला नाही, झोप नीट झाली नाही, मदतीला कुणी मनासारखे नसेल तर पित्त सुद्धा वाढते. 

2) वात व पित्त दोन्ही वाढल्याने चिडचिड होणे, झोप न येणे, उदासपणा, विनाकारण चिंता वाटणे, अंगावरचे दूध कमी होणे अशा तक्रारी निर्माण होतात. 

3) वात पित्त अशा शरीर प्रकृती चे प्रकार असतात त्याचप्रमाणे मनाच्या सुद्धा सात्विक, राजसी, तामसी अशा प्रकृती असतात. तामसी प्रकृतीच्या स्त्रियांमध्ये मानसिक अस्वास्थ निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असते

4) अस्वास्थ निर्माण होऊ नये म्हणून सूतिका परीचर्या(do and don't during puerperium) चे पालन करावे 

5) भरपूर विश्रांती घ्यावी.पौष्टीक आहार घ्यावा. मालिश साठी बला तेल /लाक्षादी तेल/धान्वंतरम तेल वापरावे. ह्यामुळे वात कमी होते,मानसिक व शारीरिक थकवा कमी होतो. 

6) सूतिकेने पाणी नेहमीच गरम वापरावे. आमटीमध्ये शुंठी,  मिरे वापरावे. आहारात रोज 15ते 20ml तूप असावे. 

7) जागरण करु नये. मोबाईल, टी. व्ही, लॅपटॉप असे डोळ्यांना त्रास देणाऱ्या गोष्टींपासून दूर असलेले बरे. कानाला त्रास होईल अशा आवाजापासून दुर रहावे.

8) शांततामय वातावरणात रहावे 

9) रोज  माथ्याला, तळपायाला तेल लावावे. कानात कापसाचे बोळे ठेवावे म्हणजे वातापासून संरक्षण मिळते. 

10) गरजेनुसार दशमुलारीष्ट, बाळंतकाढा, प्रतापलंकेश्वर, अश्वगंधा, जटामांसी, शतावरी, धमासा, वातकुलांतक रस अशा औषधाने मनस्वास्थ उत्तम ठेवता येते. 


Vd Pratibha Bhave 

BAMS. MD, Ayu

Obstetrics and gynecology

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...