1) ह्या झाडाला मधुगन्ध, सिंहकेसरक असेही म्हणतात.
2) ह्याची फुले, फळे, बिया, साल ह्या सर्वांचा औषधासाठी उपयोग होतो
3) दात हलत असतिल तर सालीच्या चुर्णाने दात घासावे तसेच सालीच्या काढ्याने #गंडुष #कवल करावे.
4) सालीचा काढा तुरट असल्यामुळे पित्त कफ कमी करणारे पण वात वाढवणारे आहे. तसेच मलप्रवृत्ति व मुत्रप्रवृत्ति कमी करणारे आहे
5) दिवसातून अनेकवेळा मलप्रवृत्ति होण्याची जुनाट सवय असेल तर बकुळीच्या सालीचा काढा मधातून दिल्या जातो.
6) मलप्रवृत्ति मधून रक्त येत असेल, रक्तातीसार असेल तर ह्याची पिकलेली फळे खाल्ली तर उपयोग होतो.
7) मधुमेही रुग्णांनी आवर्जून पिकलेली फळे खावी. वारंवार होणारी मुत्रप्रवृत्ति सुद्धा ह्याने कमी होते
9) पित्त वाढल्याने, उन्हाळ्यात उष्णतेने जीव व्याकुळ झाला असेल, तहान लागली असेल तेव्हा बकुळीची फुले उकळत्या पाण्यात टाकून झाकून ठेवावी. गार झाल्यावर मध व साखर घालून प्यावी.
10) फुले मिळतिल तेव्हा साखरेच्या पाकात शिजवून ठेवावी. खोकल्यात उपयोग होतो.
11) बकुळीच्या बीयांच्या आतील मगज मुत्राचे प्रमाण वाढवणारे आहे. उन्हाळी लागली असेल, Burning micturition, cystitis मध्ये उपयोग होतो.
Ref: वैद्य गो. आ. फडके
टीप : स्वतः च्या मनाने प्रयोग करु नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रकृति, आजार इत्यादीं चा विचार करुन योग्य प्रमाणात औषध घेणे महत्त्वाचे असते.
-हे चुर्ण आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते.
-आपल्या परीसरात प्रत्येकाने किमान 10 औषधी वनस्पती लावायला हवीत असा प्रत्येकाने निर्धार करायला हवा असे वाटते.
Vd Pratibha Bhave
BAMS MD
Prasutitantra Streeroga
8766740253
No comments:
Post a Comment