Monday, 27 January 2020

महिलांनो केस गळतात? केस पातळ झालेत? वय 40-50वर्षे आहे?

  1. वयाच्या ह्या कालावधीत शरीरातील हार्मोन्स मध्ये खूप बदल होतो त्यामुळे अनेक शारीरिक रचनात्मक व क्रियात्मक बदल होतो. पाळी जातांना केसांचा पोत बिघडतो, ते पातळ होतात व गळतात. केस धुतांना, विंचरताना मोठ्या प्रमाणात, गुच्छात गळून पडतात. 
  2. तरुण असतांना आपल्या शरिरातील योग्य प्रमाणात असलेल्या इस्ट्रोजन व प्रोजेस्टेराॅन मुळे केस दाट राहतात व भरभर वाढतात. पण पाळी जाण्याचे वय आले की हे हार्मोन्स कमी होतात,व testosterone नावाचे हार्मोन वाढते त्यामुळे डोक्यावरचे केस पातळ होतात, गळतात व काही स्त्रियांना चेहऱ्यावर केस येतात. 
  3. Testosterone ह्या हार्मोन ने डोक्याची केसांची मुळे(Hair follicles) संकुचित होतात व त्यामुळे केसांची वाढ खुंटते, गळतात, पातळ होतात. परंतु चेहऱ्यावर, हनुवटीवर केस येतात. 
  4. ह्याशिवाय शारिरीक व मानसिक तणाव, आजारपण, पोषक तत्त्वांची कमतरता, थायरॉइड असंतुलन इत्यादी कारणे असतील तर आणखीनच भर पडते.


आयुर्वेदिक उपचार
  1. तणाव कमी करा. 
  2. नियमीत व्यायाम करा. 
  3. केसांना नियमीतपणे आयुर्वेदिक तेल औषधी लावा जेणेकरून केसाची मुळे मजबुत होतील. 
  4. आयुर्वेदिक औषधांनी शिरोधारा, शिरोबस्ति घ्या
  5. आयुर्वेदिक तज्ञाकडून पंचतिक्त क्षीरबस्ति घ्या
  6. केसांसाठी  केमिकल्स शक्यतोवर वापरु नका, फार गरम ड्रायर, राॅडस् वापरु नका
  7. बाहेर जातांना केसांचे प्रदुषणापासून संरक्षण करा
  8. संतुलित आहार घ्या. आहारात देशी गायीचे तूप ठेवा. 
  9. आयुर्वेदिक रसायन औषधी घ्या. 

Who has reduced immunity?


Peoples with :-
1) More obese body (अतिस्थुल) 
2) More emaciated body (अतिकृश) 
3) Having loose muscle, abnormal blood and bone tissues(अन्यनिविष्टमांसशोणितास्थीनि) 
4) Weak( दुर्बल)
5) Nourished with unhealthy food ( असात्म्याहारोपचिता)
6) The intake of  less quantity food regularly (अल्पाहार) 
7) Having feeble mind (अल्पसत्व)

Ref - Charak Samhita Sutrasthana 28/7

MEMORY (स्मृति)

Do you want to sharpen your memory? 

"Remember these 8 points and follow it by heart." 

Acharya Charak says, there are   eight factors to bring about a good memory:

  1.  Knowledge of cause of a thing (निमित्त ) 
  2.  Knowledge of form of a thing (रुपग्रहणात) 
  3.  Knowledge of similarity( सादृश्यात्) 
  4.  Knowledge of contrast (विपर्यात्)
  5.  Concentration of mind(सत्वानुबंधात्) 
  6.  Practice(अभ्यासात्) 
  7.  Knowledge of Metaphysical knowledge (ज्ञानयोगात्) 
  8.  Seeing, listening and experiencing to something again and again (पुनःश्रुतात, दृष्टश्रुतानुभूतानां) 


Reference :Charak Samhita Sharirsthan 1/148-149

Wednesday, 1 January 2020

TO MAINTAIN YOUR HEALTH

Massage your foot daily :

Acharya Charak has described importance of daily foot massage.
Ref :Charak Samhita Sutrasthan 5/90-92
***************************************
  1. By massaging oil on the feet, roughness, immobility, dryness, tiredness and numbness goes away instantly. 
  2. It increases softness, strength and steadiness of feet 
  3. The eye sight becomes clear. 
  4. It relieves vitiated Vata. 
  5. It prevents from sciatica, cracking of feet, constriction of vessels and ligaments of feet. 

बाहवा/आरग्वध (Cassia fistula Linn.)

गुण:- बाहवाच्या शेंगाच्या  आतील मगज आयुर्वेदात औषधी म्हणून उपयोगी आहे. हे गुणाने थंड, स्निग्ध व पित्त कमी करणारे  आहे.  
'***************
  1. मधुमेह/प्रमेह(diabetes) ह्या आजारात पोट साफ होत नसेल तर आरग्वध (बाहवा) शेंगातील मगज वापरतात. 
  2. हे औषध पोटातील साठलेला मल ,कफ,पित्त मुरडा न आणता  बाहेर काढतो. 
  3. हे औषध ताकत नसलेल्या, जीर्ण रोग्याला सुध्दा वापरता येणारे आहे. 
  4. तापात पोट साफ होत नसेल तर हे औषध दिल्या जाते. 
  5. मद्य सेवन करणाऱ्या लोकांना मलबद्धता (constipation), पोटात आग पडणे, पोटा व्रण (ulcers) होणे ही लक्षणे निर्माण झाल्यास  ह्या औषधाने चांगला गुण येतो. 
  6. त्वचा रोग, अंगावर लाल पुरळ येणे, खाज, कृमी अशा तक्रारींसाठी  हे औषध गुणकारी आहे. 

"च्यवनप्राश"

  1. तारुण्य व प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी हे प्रसिध्द आयुर्वेदिक औषध आहे . निरोगी मनुष्यासाठी आरोग्य टिकवणारे व रोगी मनुष्याचे रोग दूर करणारे आहे. 
  2. हे औषध गर्भिणी, बालक, तरुण स्री, पुरुष व वृध्दांसाठी उपयोगी आहे. गर्भाशयाचे आजार, शुक्र, वीर्याच्या तक्रारी दूर करुन सुदृढ अपत्यप्राप्ती साठी दिल्या जाते. 
  3. पचनशक्ति, वय ह्याचा विचार करुन हे औषध सर्व ऋतुंमध्ये घ्यावे. 
  4. ह्या औषधात जवळपास 40 आयुर्वेदिक वनस्पती वापरल्या आहेत. आवळा हा त्यातील प्रमुख आहे. 
  5. ह्या औषधाने शरीरातील सर्व अवयव स्वच्छ होतात,पोट साफ होते. अजीर्ण, पोट गच्च होणे, मलबद्धता ह्या तक्रारींसाठी सकाळी च्यवनप्राश व सायंकाळी जेवणानंतर द्राक्षासव घ्यावे. 
  6. हृदयरोग, छातीत धडधडणे, खोकला, दमा, वातरक्त (gout), कफरोग, वातरोग, अम्लपित्त (Acidity ), पित्तरोग, मुत्ररोग, शुक्ररोग, क्षयरोग ह्या आजारांत हे औषध वापरले जाते. 
  7. बुद्धी, स्मरणशक्ती, स्फुर्ती, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिले जाते. 
  8. हे औषध नियमीतपणे खाल्ले तर केस गळणे, पिकणे, त्वचेवर सुरकुत्या येणे, अशी वार्धक्याची लक्षणे लवकर निर्माण होत नाही. 
  9. मृगशृंग नावाचे औषध च्यवनप्राश सोबत दिल्याने हाडे मजबूत होतात. 
  10. लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी, धष्टपुष्ट करण्यासाठी, भूक वाढण्यासाठी हे अतिशय गुणकारी आहे. 
  11. शरिरातील रक्त कमी झाल्यास लोहभस्म, अभ्रकभस्म, मण्डुरभस्म च्यवनप्राश सोबत दिल्याने रक्त वाढते
  12. च्यवनप्राश मध्ये मकरध्वज, अभ्रकभस्म, मृगशृंग भस्म, चांदी - सोने वर्क, केशर इत्यादी औषधी  मिसळल्यावर त्याला स्पेशल च्यवनप्राश म्हणतात. ह्याने लवकर गुण येतो.

**टीप: 
चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश गडद लाल रंगाचा, चवीला गोड आंबट, सुगंधीत असतो.निरोगी मनुष्याने आपले आरोग्य टिकवण्यासाठी पंचकर्म करुन त्यानंतर हे औषध घ्यावे. 

TULASI PLANT - VERY SPECIAL MEDICINE FOR WOMEN

  • Itching during pregnancy she should apply a paste of van tulsi on the abdomen to get relief.
  • To relieve the pain during pregnancy one should make decoction and drink it. 
  • The women facing lack of milk in their breast for breast-feeding can also get benefited from tulsi. For this,  make a mixture of 20 gm each of tulsi juice and juice of maize leaves. 10 gms of ashwagandha juice and 10 gms of honey should  be added to it. 
  • The intake of tulsi is vital for the strengthening and health of uterus. 
  • Intake of tulsi juice also offers relief from the labor pain. 
  • In addition, it also helps in restoring the irregular periods the cases of women. 
  • Consumption of tulsi juice with rice water also offers relief from Leucorrhea.

Tulsi for Psychological health:
  • It acts on stress hormone cortisol and relieve psychological stress.
  • Mood swings, weight-gain, menstrual issues, a suddenly reduced libido, muscular cramps, fatigue,
  • Tulsi and ginger are empowered to balance the levels of Cortisol in the body. 
  •  Tulsi is also believed to affect the secretion of dopamine and serotonin into the brain. This indirectly enables one to stay stress-free and calm, since these neurotransmitters regulate psychological health .

लघुमालिनी वसंत

  1. तरुण मुलींसाठी, गर्भिणींसाठी, गर्भासाठी व लहान बाळांसाठी वापरण्यात येणारे अतिशय महत्वाचे आयुर्वेदिक औषध आहे 
  2. रक्तप्रदर, श्वेतप्रदरात रक्त कमी झाल्यामुळे थकवा आल्यासारखे वाटते अशावेळी हे औषध  अतिशय उपयुक्त आहे. 
  3. लहान मुलांना(वय 1 वर्षानंतर) माती खाल्ली की कृमी होतात,रक्त कमी होते. अशावेळी कृमींची औषधीसोबत लघुमालिनी वसंत व मंडुर भस्म दिल्याने आरोग्य सुधारते. ह्या औषधाला 'बालमित्र' सुध्दा म्हणतात. 
  4. अन्न पचनाच्या तक्रारी सुध्दा ह्या औषधाने दूर होतात
  5. श्वेतप्रदर,cronic cervicities मध्ये लोध्रासवासोबत दिल्यास गुण येतो
  6. गर्भाशयात गर्भ योग्य प्रकारे न रुजल्यामुळे किंवा मानसिक अस्वास्थ्यामुळे वारंवार गर्भपात होत असल्यास ह्या औषधाने  तक्रारी थांबतात
  7. हे औषध जास्त दिवस व अधिक प्रमाणात दिल्यास तोंड येणे, घश्यात आग होणे ही लक्षणे निर्माण होऊ शकतात. अशावेळी हे औषध बंद करुन प्रवाळभस्म व गुळवेलसत्व देतात. 


संदर्भ :वैद्य गंगाधरशास्त्री गुणे

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...