गुण:- बाहवाच्या शेंगाच्या आतील मगज आयुर्वेदात औषधी म्हणून उपयोगी आहे. हे गुणाने थंड, स्निग्ध व पित्त कमी करणारे आहे.
'***************
- मधुमेह/प्रमेह(diabetes) ह्या आजारात पोट साफ होत नसेल तर आरग्वध (बाहवा) शेंगातील मगज वापरतात.
- हे औषध पोटातील साठलेला मल ,कफ,पित्त मुरडा न आणता बाहेर काढतो.
- हे औषध ताकत नसलेल्या, जीर्ण रोग्याला सुध्दा वापरता येणारे आहे.
- तापात पोट साफ होत नसेल तर हे औषध दिल्या जाते.
- मद्य सेवन करणाऱ्या लोकांना मलबद्धता (constipation), पोटात आग पडणे, पोटा व्रण (ulcers) होणे ही लक्षणे निर्माण झाल्यास ह्या औषधाने चांगला गुण येतो.
- त्वचा रोग, अंगावर लाल पुरळ येणे, खाज, कृमी अशा तक्रारींसाठी हे औषध गुणकारी आहे.
No comments:
Post a Comment