- तरुण मुलींसाठी, गर्भिणींसाठी, गर्भासाठी व लहान बाळांसाठी वापरण्यात येणारे अतिशय महत्वाचे आयुर्वेदिक औषध आहे
- रक्तप्रदर, श्वेतप्रदरात रक्त कमी झाल्यामुळे थकवा आल्यासारखे वाटते अशावेळी हे औषध अतिशय उपयुक्त आहे.
- लहान मुलांना(वय 1 वर्षानंतर) माती खाल्ली की कृमी होतात,रक्त कमी होते. अशावेळी कृमींची औषधीसोबत लघुमालिनी वसंत व मंडुर भस्म दिल्याने आरोग्य सुधारते. ह्या औषधाला 'बालमित्र' सुध्दा म्हणतात.
- अन्न पचनाच्या तक्रारी सुध्दा ह्या औषधाने दूर होतात
- श्वेतप्रदर,cronic cervicities मध्ये लोध्रासवासोबत दिल्यास गुण येतो
- गर्भाशयात गर्भ योग्य प्रकारे न रुजल्यामुळे किंवा मानसिक अस्वास्थ्यामुळे वारंवार गर्भपात होत असल्यास ह्या औषधाने तक्रारी थांबतात
- हे औषध जास्त दिवस व अधिक प्रमाणात दिल्यास तोंड येणे, घश्यात आग होणे ही लक्षणे निर्माण होऊ शकतात. अशावेळी हे औषध बंद करुन प्रवाळभस्म व गुळवेलसत्व देतात.
संदर्भ :वैद्य गंगाधरशास्त्री गुणे
No comments:
Post a Comment