Wednesday, 1 January 2020

"च्यवनप्राश"

  1. तारुण्य व प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी हे प्रसिध्द आयुर्वेदिक औषध आहे . निरोगी मनुष्यासाठी आरोग्य टिकवणारे व रोगी मनुष्याचे रोग दूर करणारे आहे. 
  2. हे औषध गर्भिणी, बालक, तरुण स्री, पुरुष व वृध्दांसाठी उपयोगी आहे. गर्भाशयाचे आजार, शुक्र, वीर्याच्या तक्रारी दूर करुन सुदृढ अपत्यप्राप्ती साठी दिल्या जाते. 
  3. पचनशक्ति, वय ह्याचा विचार करुन हे औषध सर्व ऋतुंमध्ये घ्यावे. 
  4. ह्या औषधात जवळपास 40 आयुर्वेदिक वनस्पती वापरल्या आहेत. आवळा हा त्यातील प्रमुख आहे. 
  5. ह्या औषधाने शरीरातील सर्व अवयव स्वच्छ होतात,पोट साफ होते. अजीर्ण, पोट गच्च होणे, मलबद्धता ह्या तक्रारींसाठी सकाळी च्यवनप्राश व सायंकाळी जेवणानंतर द्राक्षासव घ्यावे. 
  6. हृदयरोग, छातीत धडधडणे, खोकला, दमा, वातरक्त (gout), कफरोग, वातरोग, अम्लपित्त (Acidity ), पित्तरोग, मुत्ररोग, शुक्ररोग, क्षयरोग ह्या आजारांत हे औषध वापरले जाते. 
  7. बुद्धी, स्मरणशक्ती, स्फुर्ती, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिले जाते. 
  8. हे औषध नियमीतपणे खाल्ले तर केस गळणे, पिकणे, त्वचेवर सुरकुत्या येणे, अशी वार्धक्याची लक्षणे लवकर निर्माण होत नाही. 
  9. मृगशृंग नावाचे औषध च्यवनप्राश सोबत दिल्याने हाडे मजबूत होतात. 
  10. लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी, धष्टपुष्ट करण्यासाठी, भूक वाढण्यासाठी हे अतिशय गुणकारी आहे. 
  11. शरिरातील रक्त कमी झाल्यास लोहभस्म, अभ्रकभस्म, मण्डुरभस्म च्यवनप्राश सोबत दिल्याने रक्त वाढते
  12. च्यवनप्राश मध्ये मकरध्वज, अभ्रकभस्म, मृगशृंग भस्म, चांदी - सोने वर्क, केशर इत्यादी औषधी  मिसळल्यावर त्याला स्पेशल च्यवनप्राश म्हणतात. ह्याने लवकर गुण येतो.

**टीप: 
चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश गडद लाल रंगाचा, चवीला गोड आंबट, सुगंधीत असतो.निरोगी मनुष्याने आपले आरोग्य टिकवण्यासाठी पंचकर्म करुन त्यानंतर हे औषध घ्यावे. 

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...