दिनांक 04/04/2025 ला त्या माझ्या क्लिनिक ला आल्या. माझ्या पेशंट च्या सासुबाई आहेत
पुण्यात विमाननगर येथे राहतात
वय 65वर्षे वजन 74kg
**********
गुडघे भयंकर दुखतात अशी तक्रार होती.
इतर कुठलाही आजार नाही.
-कधी कधी गुडघे सुजतात म्हणाल्या.
-आयुर्वेदिकखूप औषधे उपचार घेतली पण गुण नाही .
-इंग्रजी गोळ्यांनी तात्पुरते बरे वाटते,पण पुन्हा दुखू लागतात.
-त्त्यांच्या x ray तपासणी त हाडांची भरपूर झीज झालेली दिसली.
-गुडघ्याच्या हाडांमध्ये सुद्धा झीज झालेली दिसली.
-पाठीच्या कमरेची मणके झीज झाल्यामुळे चालताना गुडघ्यावर भार पासून चालण्याची ढब सुद्धा केली बदलली. अगदी थोडी सूज होती
*आयुर्वेद मते हा वार्धक्यामुळे होणारा #संधिवात आहे**.
**************
-स्नेहन स्वेदन करुन बस्ती करणे ही मुख्य चिकित्साआहे.
–वार्धक्य व प्रचंड #उन्हाळा असल्यामुळे ते शक्य नाही. -आयुर्वेदात अतिशय उष्ण ऋतुमध्ये ते वर्ज्य सांगितले आहे
************
डॉक्टर ,काहीतरी करुन माझी गुडघेदुखी लगेच थांबवा असे ती म्हणाली.
*मग दोन्ही गुडघ्यांना (leech)जलौका लावल्या.
त्रिफळा गुगगुळ व चंद्रप्रभा दिल्या. आधीच्या सर्व औषधे बंद करायला सांगितले.
19/04/2025 ला भेटायला बोलावले.
40% चाळीस टक्के गुडघेदुखी थांबली असे त्यांचे म्हणणे आहे. सूज नाही
आता गरज भासली तर पुन्हा leech लावणार
आता पावसाळ्यात बस्ती करणार.
************
आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी अनेक पद्धती आहेत.
काल, अस्थि इत्यादी दूष्य,वय, व्याधीस्वरूप,
आपले राहण्याचे ठिकाण देश,
बल, प्रकृति, अग्नि, रुग्णाचे सत्व, त्याचे सात्म्य इत्यादींचा विचार करुन आयुर्वेदिक वैद्य औषधे देतो.
त्यामुळे लवकर गुण येतो व आरोग्य टिकून राहते. #Side effects पासून रक्षण होते.
#आयुर्वेदाचा स्वीकार करावा व सुखकर आयुष्य जगावे
****************
वैद्या प्रतिभा भावे
8766740253
No comments:
Post a Comment