Saturday, 29 June 2019

वर्षा ऋतू - पावसाळा

आरोग्यासाठी आयुर्वेद
**वर्षा ऋतू - पावसाळा**
1) आयुर्वेद शास्त्राप्रमाणे ह्या ऋतुमध्ये  पृथ्वी पासून निर्माण होणारी वाफ, पाऊस, व पाणी आंबट (अम्ल) गुणाचे होत असल्याने नैसर्गिक पणे शरिरातील पाचनशक्ति मंदावते.
2) पचनशक्ति मंदावल्यामुळे वात पित्त व कफाचे आजार होण्याची, वाढण्याची शक्यता असते
3) म्हणून पावसाळ्यात पाचन शक्ती वाढवणाऱ्या आहार व औषधांचा उपयोग करावा
4) विशेषतः बस्ती उपचार करुन घ्यावे
5) बस्ती झाल्यावर, शरिर शुद्ध झाल्यावर जुन्या तांदुळा भातासोबत कुळीथ/मुग/चना/तुर ह्यांची रस्सेदार उसळ खावी
6) मांसाहारी असल्यास गावरान कोंबडी/बकरा किंवा जंगली प्राण्यांच्या मांसरस/सूप किंवा पातळ रस्साभाजी जुन्या तांदळाच्या भातासोबत खावी
7) उकळलेले पाणी प्यावे
8) आंबट,खारट, गोड असे पदार्थ खावेत. परंतु पचायला हलके असे पदार्थ खावे
9) ह्या ऋतुत नदीचे पाणी पिऊ नये
10) दिवसा अजिबात झोपू नये
11) अधिक व्यायाम करु नये
12) हिंग्वाष्टक चुर्ण, दाडिमाष्टक चुर्ण,आमपाचक वटी, शंख वटी, अविपत्तिकर चुर्ण इत्यादी औषधांचा उपयोग आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
13) ऋतुनुसार आहारा विहारात बदल, बस्ती करुन घेतली तर आरोग्य टिकुन राहण्यास मदत होते.

पाळीच्या तक्रारी

पाळीच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रथम पचनाच्या तक्रारी दुर करा.
पाळीच्या तक्रारीचा पोटाची तक्रार शी IBS(इरीटेबल बाबेल सिन्ड्रोम)  खुप जवळचा संबंध आहे
इरीटेबल बाबेल सिन्ड्रोम (Irritable Bowel Syndrome) हा पाचनसंबंधीचा आजार आहे.ह्याची लक्षणे आयुर्वेदातील ग्रहणी ह्या रोगाप्रमाणे आहेत.

ह्या रोगाची कारणे
1 तणाव
2 विशिष्ट खाद्य पदार्थो ची अतिसंवेदनशीलता
3जन्मजात
4 काहींना शस्त्रक्रिया नंतर हा आजार होतो
5औषधी स्टीराइड्स (steroids) एंटीबायोटिक (Antibiotics) इत्यादिने
6 संक्रमण
7 आनुवंशिकता

ह्या रोगाची लक्षणे लक्षण
1पोट दुखणे
2अनियमित,असमाधानी , वारंवार द्रव किंवा कठीण मलप्रवृत्ति , आव पडणे,
3पोट फुगणे, जड वाटणे
4 कधी कधी मळमळणे

नैसर्गिकपणे पाळी येण्याच्या आदल्या  दिवशी इस्ट्रोजन व प्रोजेस्टेराॅन ह्यांचे शरिरातील प्रमाण एकदम कमी होते. त्यामुळे पाळीच्या 1 ते 2 दिवसापूर्वी पोट फुगणे, जड वाटणे, द्रवमलप्रवृत्ती किंवा कठीण मलप्रवृत्ति ही लक्षणे निर्माण होतात.
ज्यावेळी पाळी येते तेव्हा ह्या हार्मोन्स चे प्रमाण खुपच कमी झालेले असते. तेव्हा IBS असणाऱ्यांमध्ये पाळीच्या वेळी पोटात दुखणे, मळमळणे, असाधारण मलप्रवृत्ति अशा तक्रारी वाढतात.

म्हणून प्रथम पचन सुधारा, मग मलप्रवृत्ति सुधारते व पाळीच्या तक्रारी सुद्धा कमी होतात.

गुळ


1) योग्य पद्धतीने ने बनवलेले स्वच्छ व मातीरहित गुळ खाल्ले असता मुत्र(urine) व पुरिष (stool) ची मात्रा वाढते.
2) जुने गुळ ह्दयाच्या स्वास्थ्यासाठी चांगले आहे.
3) नविन गुळ कफ वाढवतो व अजीर्ण करणारे आहे.
4) गुळ योग्य पद्धतीने  न बनवल्यास,खडे,माती असल्यास आतड्यात कृमी,तसेच रक्त, मज्जा(bone marrow ) वसा(fat tissue) व मांसपेशींमध्ये कृमी व कफाचे आजार होतात.

संदर्भ :-अष्टांगहृदय सूत्रस्थान   5/47-48

मध

*********************************
मध नेहमी थंड वापरावे.
मध कधीही गरम करु नये. गरम केल्यास किंवा गरम पाण्यात, आहारीय पदार्थासोबत घेतल्यास ते विषाप्रमाणेआहे.
****************************** *****.

1) डोळ्यांसाठी उत्तम आहे
शरिरातील गाठी फोडणारे आहे
2) तहान भागवणारे आहे
3) कफचे संतुलन राखते
4) शरिरातील विषारी तत्व बाहेर काढणारे आहे
5) उचकी येत असल्यास उपयोगी आहे
6) प्रमेह, मधुमेह, मत्रवहस्रोतसाचे आजार, त्वचारोग, कृमी, उलट्यांचा त्रास असणे, दमा, प्राणवह स्रोतसाचे आजार, खोकला, सर्दी ह्यासाठी उपयोगी आहे.
7) जखम लवकर भरुन येण्यासाठी उपयोगी आहे.
*मधापासून बनवलेली साखर मधाप्रमाणेच गुण असलेली आहे.
मध रुक्ष गुणाचे असल्यामुळे वात वाढण्याची शक्यता असते.

संदर्भ :अष्टांगहृदय सूत्रस्थान 5

उकळून गार केलेले पाण्याचे गुणधर्म


1) हे पाणी शरिरात चिकटपणा निर्माण होउ देत नाही
2) पचायला हलके असते
3) पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांनी असे पाणी पिल्याने फायदा होतो 4)परंतु रात्री पाणी उकळून सकाळी पिणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही,कारण त्याने शरिरात वात, पित्त व कफ यांचे संतुलन बिघडतेसं

संदर्भ :अष्टांगहृदय सूत्रस्थान 5

गरम पाणी पिल्याने होणारे फायदे

  • भूक वाढते.
  • अन्नाचे पचन होण्यासाठी मदत होते
  • कंठाचे आरोग्य सुधारते
  • गरम पाणी पचायला हलके असते
  • बस्ति (urinary bladder )  स्वच्छ होण्यासाठी मदत होते
  • गरम पाणी पिल्याने उचकी थांबते
  • गॅसेस होणे, पोट दुखणे, खोकला, कफ, सर्दि, पडसे, दमा ह्या आजारात गरम पाणी पिल्याने बरे वाटते.
  • पंचकर्माची चिकित्सा घेत असताना गरम पाणी पिणे आवश्यक असते.


संदर्भ वाग्भट सूत्रस्थान 5/ 16-17

MALE INFERTILITY


नवायस लोह

रक्त सुधारण्यासाठी उत्तम औषध
1) रक्ताची (Haemoglobin) ची कमतरता असल्यास दूधातून देतात
2) कृमी झाल्यास वावडिंग चुर्ण व मधातून दिले जाते
3) हृदय रोगात अर्जुन सालीच्या काढ्यासोबत देतात
4) रक्त कमी होऊन अंगावर सुज आल्यावर पुनर्नवा च्या पाल्याच्या रसातून घेतल्यास सुज कमी होते व रक्त सुधारते
5) प्लिहा (Spleen) ला सुज येऊन वारंवार ताप येत असेल तर ह्या औषधाने गुण येतो.
6) ह्या औषधाने यकृत (liver) चे कार्य सुधारते
7) ह्याशिवाय अर्श, भगंदर, ह्या आजारात उपयोग केला जातो

AYURVEDIC - ACCORDING TO ACHARYA VAGBHATT

Drinking water in between meals – healthy habit
Drinking water after meals – causes obesity
Drinking water before meals – causes emaciation, weakness

(आचार्य वाग्भट सू. 5) 

VAGINAL CANDIDIASIS

Vaginal yeast infections, also known as candidiasis. At healthy vagina there is presence of  bacteria and some yeast cells. But when the balance of bacteria and yeast changes, the yeast cells can multiply.
 *Vagina candidiasis  aren’t considered a sexually transmitted,  but Sexual contact can spread it.

*Signs and symptoms of vaginal candidiasis **

-Swelling around the vagina.
-Vaginal itching
- burning urination and coitus .
-dyspareunia
-soreness
-rash
-redness

**Causes vaginal candidiasis infections:**
1)The fungus Candida is a naturally occurring microorganism in the vagina.
2) Lactobacillus bacteria keeps its growth in check. But if there’s an imbalance ,these bacteria won’t work effectively. This leads to an overgrowth , which causes the symptoms of vaginal candidiasis infections.
3)Several factors can cause a yeast infection, including:
-Antibiotics lowers the amount of Lactobacillus, or good bacteria, in the vagina
-Pregnancy
-uncontrolled diabetes
-weak immune system
-Improper diet  including a lot of sugary foods.
-hormonal imbalance .
-stress
-lack of sleep

Diagnosis:
-medical history.
-Vaginal  examination..
- Lab tests are usually done for women who have chronic infections .

*Treatment:*
Treatments are generally determined based on the severity of  symptoms.
Simple infections
For simple yeast infections, infection usually prescribe   antifungal cream, ointment, tablet, or suppository. Treatment is advisable for both partners.

**AyurvedicTreatment for Vaginal Candidiasis:********************

PREVENTION:
-follow Ayurvedic regimen of diet
-follow Rutucharya
-wear cotton fabrics with comfortable fittings.
-keep undergarments clean and dry.
-avoid chemicals like deodorant, scented and synthetic sanitary pads.

*Ayurvedic medicines*
1)Nimb tail10ml+Karanja tail10ml+Nirgundi tail 10ml /per rectal route for three days.
2)Followed by Panchtikta kheer basti for 7,11,15day as disease demands
3)Wash vagina and it’s surrounding areas with Triphala and Haridra ,Nimb /Panchvalkal decoction two times a day.
4)After wash soak it completely and apply Yashtimadhu ghreeta/Shatavari ghreeta/Shatadhauta ghreeta two times a day
5)Tab Sukshma Triphala vati 1tab three times a day.
6)Ampachka vati 2bd two times a day after

*****It is  Kaph and pitta predominant disease with Krimi. Area of occurance is Vata. Ayurveda adviced to do krumighna(कृमीघ्न) teatment.***********

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...