आरोग्यासाठी आयुर्वेद
**वर्षा ऋतू - पावसाळा**
1) आयुर्वेद शास्त्राप्रमाणे ह्या ऋतुमध्ये पृथ्वी पासून निर्माण होणारी वाफ, पाऊस, व पाणी आंबट (अम्ल) गुणाचे होत असल्याने नैसर्गिक पणे शरिरातील पाचनशक्ति मंदावते.
2) पचनशक्ति मंदावल्यामुळे वात पित्त व कफाचे आजार होण्याची, वाढण्याची शक्यता असते
3) म्हणून पावसाळ्यात पाचन शक्ती वाढवणाऱ्या आहार व औषधांचा उपयोग करावा
4) विशेषतः बस्ती उपचार करुन घ्यावे
5) बस्ती झाल्यावर, शरिर शुद्ध झाल्यावर जुन्या तांदुळा भातासोबत कुळीथ/मुग/चना/तुर ह्यांची रस्सेदार उसळ खावी
6) मांसाहारी असल्यास गावरान कोंबडी/बकरा किंवा जंगली प्राण्यांच्या मांसरस/सूप किंवा पातळ रस्साभाजी जुन्या तांदळाच्या भातासोबत खावी
7) उकळलेले पाणी प्यावे
8) आंबट,खारट, गोड असे पदार्थ खावेत. परंतु पचायला हलके असे पदार्थ खावे
9) ह्या ऋतुत नदीचे पाणी पिऊ नये
10) दिवसा अजिबात झोपू नये
11) अधिक व्यायाम करु नये
12) हिंग्वाष्टक चुर्ण, दाडिमाष्टक चुर्ण,आमपाचक वटी, शंख वटी, अविपत्तिकर चुर्ण इत्यादी औषधांचा उपयोग आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
13) ऋतुनुसार आहारा विहारात बदल, बस्ती करुन घेतली तर आरोग्य टिकुन राहण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment