पाळीच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रथम पचनाच्या तक्रारी दुर करा.
पाळीच्या तक्रारीचा पोटाची तक्रार शी IBS(इरीटेबल बाबेल सिन्ड्रोम) खुप जवळचा संबंध आहे
इरीटेबल बाबेल सिन्ड्रोम (Irritable Bowel Syndrome) हा पाचनसंबंधीचा आजार आहे.ह्याची लक्षणे आयुर्वेदातील ग्रहणी ह्या रोगाप्रमाणे आहेत.
ह्या रोगाची कारणे
1 तणाव
2 विशिष्ट खाद्य पदार्थो ची अतिसंवेदनशीलता
3जन्मजात
4 काहींना शस्त्रक्रिया नंतर हा आजार होतो
5औषधी स्टीराइड्स (steroids) एंटीबायोटिक (Antibiotics) इत्यादिने
6 संक्रमण
7 आनुवंशिकता
ह्या रोगाची लक्षणे लक्षण
1पोट दुखणे
2अनियमित,असमाधानी , वारंवार द्रव किंवा कठीण मलप्रवृत्ति , आव पडणे,
3पोट फुगणे, जड वाटणे
4 कधी कधी मळमळणे
नैसर्गिकपणे पाळी येण्याच्या आदल्या दिवशी इस्ट्रोजन व प्रोजेस्टेराॅन ह्यांचे शरिरातील प्रमाण एकदम कमी होते. त्यामुळे पाळीच्या 1 ते 2 दिवसापूर्वी पोट फुगणे, जड वाटणे, द्रवमलप्रवृत्ती किंवा कठीण मलप्रवृत्ति ही लक्षणे निर्माण होतात.
ज्यावेळी पाळी येते तेव्हा ह्या हार्मोन्स चे प्रमाण खुपच कमी झालेले असते. तेव्हा IBS असणाऱ्यांमध्ये पाळीच्या वेळी पोटात दुखणे, मळमळणे, असाधारण मलप्रवृत्ति अशा तक्रारी वाढतात.
म्हणून प्रथम पचन सुधारा, मग मलप्रवृत्ति सुधारते व पाळीच्या तक्रारी सुद्धा कमी होतात.
No comments:
Post a Comment