Sunday, 26 May 2019

मेनोपॉज (MENOPAUSE )

1) स्त्रियांनामध्ये  डिंबग्रंथी इस्ट्रोजन नावाचे स्त्राव निर्माण करणे बंद करते, तेव्हा एक वर्षापर्यंत रजःप्रवृत्ति  झाली नाही तर मेनोपॉज आला असे म्हणतात. साधारणतः 45 - 55 या वयात मेनोपॉज येतो. 

2) कॅन्सर ट्रिटमेंट ने, गर्भाशय - डिंबग्रंथी शस्त्रक्रिया करुन काढून टाकल्यास  वयाच्या आत मेनोपॉज येतो. ह्यालाच कृत्रिम मेनोपॉज म्हणतात(treatment-induced menopause) 


मेनोपॉज लक्षणे:-

प्रत्येक स्त्रीला निरनिराळे लक्षण दिसून येतात. 

जसे

1) अंगातून गरम वाफा आल्यासारखे वाटणे

2) रात्री खूप घामाघूम होणे

3) झोप न येणे

4) पाळीचा मार्गात जंतूसंसर्ग, कोरडेपणा, खाज येणे, दुखणे

5) मुत्रमार्ग जंतूसंसर्ग होणे

6) चिडचिड पणा वाढणे, मनस्थितीत बदल

7) वजन वाढणे

8) नैराश्य येणे

9) हाडांची झिज होऊ लागते, त्यामुळे हाडे ठिसूळ होतात 

10) ह्दयविकार होण्याची शक्यता वाढते.


उपचार
  • योग, प्राणायाम, मसाज, व्यायाम, आसने, सूर्यनमस्कार नियमितपणे करावे. 

  • आहारात दुध(देशी गायीचे ), तूप आहारात असावे

  • शिरोधारा, प्रतिमर्श नस्य, बस्ती, स्नेहन स्वेदन घ्यावे

  • रसायन चिकित्सा घ्यावी

  • आमलकी, शतावरी, गुडूची, गोक्षुर, अश्वगंधा, गुग्गुळ, शिलाजीत इत्यादी औषधी  

  • झोप येत नसल्यास जटामांसी, तगर, सर्पगंधा यासारखी औषधांचा वापर केला जातो 

  • औषधी तेलांचा योनीपिचू ने कोरडेपणा, खाज,दाह, शूल कमी होतो

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...