Sunday, 26 May 2019

प्रसूतीनंतरचे मानसिक आजार

काही स्त्रियांना प्रसूतिनंतर भीती, उदासपणा, काळजी, अस्वस्थपणा, थकवा, असमाधानी वाटत असते. पहिल्याच खेपेची असेल तर असे वाटणे साहजिकच आहे  परंतु ह्यामुळे दैनंदिन व्यवहारात अडचणी येत असतिल तर त्याला मानसिक आजार म्हणतात(postpartum depression).

ह्या आजाराची कारणे
1 मानसिक थकवा
2) गर्भिणी अवस्थेतील आजारपण
3) गर्भिणी अवस्थेचा ताण
4) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल
5) सामाजिक
6) बाळ आजारी असणे
7)  इस्ट्रोजन व प्रोजेस्टेराॅन ची मात्रा प्रसूतीनंतर एकाएकी कमी होत असल्याने
8) प्रसूतिनंतर व्यवस्थित झोप न होणे, संतुलित आहार न मिळेणे
9) हायपोथायराॅड
10) पूर्वीपासूनच मानसिक विकार कुटुंबात असल्यास

लक्षणे:-
व्यक्तिसापेक्ष आहेत
  1. नित्याची कामे करण्यास अडचणी येणे
  2. विनाकारण राग येणे, चिडणे
  3. स्वभावात लहरीपणा
  4. एकाग्रता भंग
  5. कामात मन नसणे
  6. आनंदाचा अभाव
  7. खाण्यात, आहारात अनियमितता
  8. भूक कधी खूप तर कधी अजिबात नाही
  9. संपूर्ण अंगात दुखणे भरणे
  10. विनाकारणच रडावसं वाटणे
  11. वजनात अचानक बदल
  12. झोप न येणे
  13. लोकांशी, नातेवाईक, मित्रमंडळींचा त्रास वाटणे
  14. आत्मविश्वास कमी होणे
  15. बाळाची अतिशय काळजी वाटणे

ही लक्षणे काही आठवडाभरात कमी होतात परंतु योग्य औषध उपचार केले नाही तर खूप दिवस ही लक्षणे शरीरात राहून मानसिक आजार जडतो.

उपचार :
आजाराच्या तीव्रता नुसार उपचार केले जातात
आधुनिक शास्त्रानुसार समुपदेशन, मानसोपचार, औषधी, ECT. औषधी जसे- Brexanolone . ही औषधे दुधातून बाळाच्या शरिरात जातात त्यामुळे वाईट परिणाम होतो.
**********************************************
प्रसूतीनंतरचे मानसिक आजारासाठी आयुर्वेदिक चिकित्सा
1) आजार होऊ नये म्हणून :-
- गर्भधारणेपुर्वी पंचकर्म करुन घ्यावे.
- गर्भाधान पद्धतीने गर्भधारणाकरावी
- गर्भिणी परिचर्या नुसार आचरण करावे
- प्रसूति झाल्यावर  सूतिका परिचर्येचे पालन करावे

2) आजार झाल्यास
- शिरोतैलपिचू-श्रीगोपालम तेल
- सर्वांग स्नेहन बला तेल
- बाळंत काढा
- आहारात घृत, अहळीव,खाकस,खारीक, बदाम ह्याचा समावेश
- औषध वातकुलांतक, मकरध्वज, ब्राम्ही, शंखपुष्पी, जटामांसी, लवंग, तगर, प्रतापलंकेश्वर, अभ्रकभस्म, सुवर्णमाक्षिक, रौप्यभस्म, सौभाग्यशुंठीपाक, दशमुलारीष्ट

वरिल चिकित्सेचा बाळावर वाईट परिणाम होत नाही उलट फायदाच होतो.

**टीप  आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने चिकित्सा घ्यावी. **

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...