Wednesday, 17 April 2019

गुळवेल

गुळवेल

सर्वांनी घरी लावावी अशी बहुगुणी वेल “गुळवेल”

1) गुळवेलीच्या काढयात तूप मिसळून पिल्यास वाताचे आजार नाहिसे होतात.
2) गुळवेलीच्या काढयात गुळ मिसळून पिल्यास बद्धकोष्ठता नष्ट होते.
3) गुळवेलीच्या काढयात खडीसाखर टाकून पिल्याने पित्ताच्या तक्रारी कमी होतात.
4) मध मिसळून काढा घेतल्यास कफाच्या तक्रारी कमी होतात.
5) एरंड तेल मिसळून हा काढा घेतल्यास भयंकर वातरक्त,Gout नष्ट होतो.
6) शुंठी चुर्ण ह्या काढ्यात एकत्र करुन पिल्याने आमवात, सांधेदुखी,Rheumatoid arthritis बरा होतो.

संदर्भ –भै.र. (पा.नं 591)

***प्रत्येक व्यक्तीला आजारानुसार पथ्य पाळले तर लवकर गुण येतो. आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधी योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...