गर्भसंस्कार म्हणजे काय?
चांगल्या गुणांनी युक्त,सशक्त, निरोगी अपत्यप्राप्ती व्हावी ह्यासाठी उपाय, उपचार करणे ह्याला गर्भसंस्कार म्हणतात.
ह्यात दोन भाग पडतात
1)गर्भ धारणा होण्यापूर्वी- स्त्री व पुरुष दोघांसाठी
2)गर्भ धारणा झाल्यावर-फक्त गर्भिणी साठी
--------गर्भधारणेच्या आधी बीज शुद्धी केली जाते
.त्यासाठी आयुर्वेद पद्धतीने दोघांचीही तपासणी केली जाते.परंपरेने येणाऱ्या आजाराविषयी ,तसेच काही तब्येतीच्या तक्रारी असतील ,पुर्वी शस्त्रक्रिया केल्या असतील,तसेच रक्तलघविच्या तपासण्या करुन त्याप्रमाणे औषधी पंचकर्म, शिरोधारा, उत्तरबस्ति असे उपचार केले जातात.
**बीज चांगले तर फळ चांगली असण्याची शक्यता वाढते.त्यामुळे बीजशुद्धी अतिशय महत्त्वाची आहे.
-----गर्भधारणा झाल्यावर आईच्या आहाराचा, विहाराचा,औषधांचा, वातावरणाचा,आवाजाचा, मानसिक भाव, संगीत इत्यादींचा बरावाईट परिणाम गर्भावर होत असतो.
गर्भाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी ,तसेच बाळंतपण सुखरूप व्हावे यासाठी मातेला आहार,आसने,प्राणायाम,योग,संगित, निरनिराळ्या कलेत रुची निर्माण ,पोटावर स्ट्रेच मार्कस् येऊ नये म्हणून अभ्यंग, आठव्या महिन्यात बस्ति,पिचू असे उपचार केल्या जातात.
ह्या सर्व उपायांनी , सुखरूप प्रसूति होऊन सुदृढ़ बाळ जन्माला येण्याची शक्यता वाढते.
No comments:
Post a Comment